👍रागावलेला बैल :
रागावलेल्या बैलाला सर्वात सोपं असतं आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक अवरोध आला अतिशय सहजपणे डावलून पुढे जाणं या बैला समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, प्राण्याचा, आणि वस्तूंचा थारा या रागावलेल्या बैला समोर लागत नाही म्हणजे बैल तेजीमध्ये धावत सुटतो तो प्रत्येक गुंतवणूकदार एका बैलाप्रमाणे असतो, जो शेअर मार्केटमध्ये प्रत्येक किमतीवर ती गुंतवणूक वाढतच असतो आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला असंच वाटत असतं की मार्केट एखाद्या बैलासारखं वाढावं .
👍अस्वल ( किंवा रागावलेला अस्वल ) :
एखादा रागावलेला अस्वल आपल्या नखांच्या आणि वजनांच्या सहाय्याने मोठ्या प्राण्यांना सहजपणे खाली पाडू शकतो, चपळता न दाखवता एखाद्या वस्तूला खाली ओढण अस्वलाला सोपं जातं | जे गुंतवणूकदार काही कारणामुळे शेअर मार्केट कोसळणार या दृष्टिकोनातून ट्रेडिंग करतात ते सर्व गुंतवणूकदार अस्वलाच्या या स्वभावा प्रमाणे असतात शेअर मार्केट वाढत असलं तर यांना शेअर मार्केटला खाली खेचण्यात जास्त मजा येते किंवा असं म्हणू शकता की जास्त सोपं वाटतं.
आता एक महत्त्वाचा प्रश्न या दोघांपैकी कोण पैसे कमवतो ?
खरं सांगायचं झालं तर दोघेही जेव्हा तेजी असते तेव्हा बुल इन्वेस्टर कमावतो, जेव्हा मंदि असते तेव्हा बियर इन्वेस्टर कमावतो अरेच्या, मग गमावतो कोण ?