फुलांचे मानवी आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम

Vikas Jamdade
0

  १. झेंडूची फुले


” हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे.  या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव खाली देत आहे. 
झेंडू (नारिंगी किंवा पिवळा):-झेंडूच्या फुलाच्या पाण्याने खोकला जातो. मला याचा खूप फायदा झाला व होत आहे.
 मुंबई च्या  सौ ठाकूर ह्यांनी मला बुधवारी संध्याकाळी फोन करून सांगितले की त्यांचे मुलाचे (वय ६) लघवी तुंबण्याचे ऑपरेशन करायचे आहे. पण गेले महिनाभर त्याचा खोकला थांबत नाही. डॉक्टरांची औषध चालू आहेत उपयोग नाही व खोकला आला की त्रास होतो. डॉक्टर खोकला थांबल्याशिवाय ऑपरेशन करायला तयार नाहीत. काहीतरी औषध सांगा. मी त्यांना विचारले मुंबईत तुम्हाला झेंडू चे फुल मिळेल का? त्या हो म्हणाल्या. मी त्यांना सांगितले, आज एक फुल आणून त्याच्या पाकळ्या एक भांडेभर पाण्यात भिजत घाला, उद्या सकाळी पाकळ्या बाजूला करून ४-४ चमचे पाणी ४-५ वेळा दया. व हे पाणी चालू ठेवा शुक्रवारी संध्याकाळी ४:३० ला फोन आला की मुलाचा खोकला थांबला, मुलाचे ऑपरेशन ठरविले आहे. (लहान मुलांना हे पाणी देतांना त्यात चवीसाठी थोडी साखर घातली तरी चालते.  (वयाप्रमाणे डोस – वय वर्ष १ पर्यंत एक चमचा पाणी, १ ते ६ ४-४ चमचे पाणी, ६ वर्षाचे पुढील सर्वांना अर्धी वाटी पाणी असे असावे).

* माझे मित्र श्री संजय विश्वास हे मुंबई ची तीन दिवसांची ट्रीप करून आले. मी त्यांना फोन केला तेव्हा ते  खूपच खोकत होते, म्हणून त्यांना झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले, ते त्यांनी घेतले.  परत दुसरे दिवशी फोनवर बोलण्याचा योग्य आला त्यावेळी खोकला नव्हता.

* मी ‘निर्माल्य औषध' म्हणून लेख एका मासिकात प्रसिद्ध केला होता. तो वाचून एका ७२ वर्षाच्या गृहस्थानी फोन  करून सांगितले की मला गेली २५ वर्षे खोकला होता, तुमच्या लेखा प्रमाणे झेंडूचे पाणी घेतले व माझा खोकला आता थांबला आहे.

* झेंडूच्या पाण्यानी डोळे धुतले असता डोळ्यातील पाणी, कफ घट्ट होतो व बाहेर पडतो व दिसण्यात सुधारणा होते. असा माझा अनुभव आहे.

* मला स्वयंपाक करताना फोडणीचे गरम तेलाचे थेंब हातावर पडून भाजले. आग खूप होत होती. त्यावर मी झेंडूचे फुलाचे पाणी थोडेसे चोळले. १५ मिनिटात आग थांबली. २ तासांनी मी भाजले आहे हे विसरलोसुद्धा. दुसरे दिवशी फोड आले नाहीत.
 
* माझा मित्र अरविंद जोग याला कफाचा त्रास होता. म्हणून मी त्याला झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले, त्याला खूप फायदा झाला. त्याचे मित्र कॅप्टन विनायक जोशी यांना कफ व खोकल्याचा त्रास झाला, एक्सरे काढल्यावर डॉक्टरांनी सांगितले पूर्ण छाती कफाने भरली आहे. जास्त कफ वाढल्याने ब्रॉन्कायटिस होई, जोग ने त्यांना झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले. जोगवर विश्वास ठेऊन त्यांनी पाणी चालू केले. चार दिवसात कफ कमी झाला. ह्या दिवसात त्यांचे सिगरेट ओढणे चालूच होते. एक महिन्याने जोग च्या सांगण्यावरून पुन्हा एक्स रे काढला, तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले ब्रॉन्कायटिस. अहो छाती तर एकदमच क्लीअर आहे. जोशींनी त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलचा आधीचा एक्स रे दाखवला. डॉ 'ह्याप्रमाणे बरोबर आहे. तुम्ही काय केलेत,' 'एक घरगुती औषध' (जोशींनी झेंडूच्या पाण्याबद्दल सांगितले नाही).  
एका झेंडूच्या (पिवळा किंवा नारिंगी) पाकळ्या एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी गाळून घ्यावे . मोठ्यांसाठी अर्धी वाटी वाटी लहानासाठी ४-५चमचे दिवसातून चार वेळा घेणे.

हा लेख whats app वर व्हायरल झाला आणि हा प्रयोग केल्याने फायदा झाला असे सांगणारे असंख्य फोन आले.
माझ्या संशोधनात झेंडू खोकल्या व्यतिरिक्त आणखी काही आजारांवर उपयोगी पडण्याची शक्यता आहे. ते आजार पुढे देत आहे. ज्यांना ते त्रास असतील व झेंडूचा उपयोग करून पहायची तयारी असेल त्यांनी करून मला अनुभव कळवावेत. ही विनंती.
आजार: फ्लू, डेंग्यू, हिवताप (मलेरिया), सारखी लघवी होणे, सर्दी पडसे, खोकला, डोळ्याचा नं वाढणे, मोतीबिंदू, काच बिंदू, डोळे लाल होणे (डोळे झेंडूच्या पाण्याने धुवावेत),  गर्भाशय कॅन्सर, स्तन दुखणे, फिलोपीन ट्यूब ब्लॉक होणे, ओव्हरी कॅन्सर, वायुकोशाचे त्रास, फुफ्फुसात पाणी होणे, अन्ननलिका दाह व कॅन्सर, मोठ्या आतड्याची शिथिलता, वाट सरकणे ह्या आजारांवर झेंडूचे पाणी उपयोगी पडण्याची शक्यता आहे. बरेच दिवस उपचार करणे आवश्यक आहे. खोकल्यासारखा २-४ दिवसांत गुण येणे अपेक्षित नाही.
२. गुलछडी (निशिगंध)
माझे “फुले आणि आरोग्य” हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे.  या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव खाली देत आहे. 
* निशिगंध * (गुलछडी) निशिगधाचे  फुलाला वास खूप छान असतो. ही फुले  ग्लासभर पाण्यात ३-५ फुले रात्रभर ठेवून सकाळी फुले काढून टाकून ते पाणी अर्धी अर्धी वाटी दिवसातून ४-५ वेळा प्यावे ह्यामुळे पोटातील आव कमी होते, संडासला चिकट बुळबुळीत होत असल्यास थांबते. सर्दी पातळ होते व कमी होते. माझा लेख वाचून एका साताऱ्याच्या डॉक्टरनी प्रयोग केला व फोन केला की, गुलछडीचे पाणी घेतल्याने झोप चांगली झाली. तसेच ह्यामुळे सूज कमी होते. मला जास्त पाव बिस्कीट खाल्ली की संडासला चिकट होते. सर्दी पण होते. त्यामुळे टोस्ट बिस्कीट खाण्यावर बंधन होते. परंतु आता हे पदार्थ यथेच्छ खाऊन त्यावर गुलछडीचे पाणी घेतले की तब्बेत  ठीक राहते. घट्ट झालेली सर्दी पातळ होते. म्हणून सर्दीमुळे होणारी डोकेदुखी कमी होते. कोरडा खोकला कमी होतो. 
मायग्रेन (सतत डोके दुखणे) चा त्रास असणाऱ्या एका २९ वर्षाच्या मुलाला मी ब्रह्मकमळाबरोबर गुलछडी दिली त्यामुळे त्याचे डोके दुखणे २ दिवसात थांबले.
श्रीकांत जोशी- श्री श्रीकांत जोशी (वय ७३) माझेकडे मधून मधून येतात. एक दिवस ते आले आणि खोकले त्यांचा कफ घट्ट झाला होता. तो पातळ करण्यासाठी मी त्यांना गुलछडीचे पाणी दिवसातून ३-४ वेळ घ्या असे सांगितले, ह्या खोकल्याला गुलछडी आवश्यक आहे. असे सांगितले. करतो म्हणून ते गेले. आणि जवळ जवळ दीड महिन्यांनी आले. माझ्यासमोर रिपोर्ट्सचे ३ कागद टाकले आणि म्हणाले "तारखेनिशी वाचा" ते पुढील प्रमाणे
date - blood urea – S  Creatinine
२०.७.२००९ - ११३ - २.१०
०३.८.२००९ - ६५ - १.५
०७.९.२००९ - ५०- १.४८
अहो जोशी तुम्ही मला गुलछडीचे पाणी घेण्यास सांगितले तेव्हापासून फक्त गुलछडीचे पाणी घेत आहे. इतर कोणतेही औषध घेतले नाही. व माझे blood urea व Creatinine कमी झाले. 
अरविंद जोशी B.Sc
९४२१९४८८९४
ही पोस्ट पूर्वी पाठविलीहोती. ती वाचून काहीजणानी गुलछडीचे पाणी पिऊन क्रिएटीनिन कमी झाल्याचे मला कळवले आहे. एकाने creatinine ५ वरून ३ चे खाली आल्याचेही कळवले.
३.  पारिजातक
पावसाळा सुरू झाला की पारिजातक फुलु लागतो. त्याच्या फुलांचा सडा पडतो. हे फुल नाजुक असते. पांढऱ्या पाकळ्या व लाल किंवा नारिंगी देठ असते. ही फुले सकाळी पडतात व संध्याकाळ पर्यंत सुकून जातात. त्यामुळे सकाळीच गोळा करावी लागतात. एक ग्लास भर पाण्यात १५-२० फुले सकाळी ठेवून रात्री फुले बाजूला करावीत. ह्या पाण्याला पिवळा रंग येतो. हे पाणी अर्धी वाटी रात्री झोपताना व अर्धी वाटी सकाळी अनाशापोटी प्यावे. व उरलेले पाणी दिवस भरात संपवावे. रोज नवीन पाणी करावे.ह्या पाण्याने संडास साफ होऊ लागते. मी ह्याचा अनुभव घेऊन शेजारच्या वहिनी व वर राहणाऱ्या गुजराती ग्रुहस्थाना सांगितला. रोज सकाळी दूध आणताना फुले गोळा करून दोघांना देत होतो. पंधरा दिवसा नंतर फुले देण्याचे थांबवले. त्याचे तिसरे दिवशी दोघांनी फुले मागितली व सांगितले अहो काका ह्या पाण्यामुळे संडास साफ होते व पोट हलके राहते.पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकला ह्यासाठी हे पाणी मस्त उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे.पारिजातकाचे टिंक्चर मी ज्या बायकांची पाळी पुढे मागे होते अशाना दिले. त्यांना खूप फायदा झाला. हे पाळी जाताना होणाऱ्या मोनोपॉजच्या त्रासाला चांगले उपयोगी पडते असा माझेकडील पेशंट चा अनुभव आहे.माझ्या संशोधनातील पारिजातक फुलाचे उपयोग पुढे देत आहे.तोंड येणे, डोळ्याचा नंबर वाढणे, मोतीबिंदू, काचबिंदू, डोळे लाल होणे, सर्दी पडसे, पाळीच्या वेळी पोटात दुखणे, पाळी लांबणे, पाळी लवकर येणे, प्रोस्टेट वाढणे, इसब, काळे डाग, चट्टे उठणे.माझे मित्राचे पत्नीला काचबिंदू झाला म्हणून हे डोळ्यात घालण्यास दिले. दोन महिन्यात काचबिंदू चे प्रेशर खूपच कमी झाले.फुलांची साखर करणे
फुले वर्षभर मिळत नाहीत म्हणून त्यांची साखर करावी.
एका लहान पातेल्यात वाटीभर पाणी घेऊन त्यात वाटीभर फुले २४ तास ठेवून ते पाणी गाळून घ्यावे. एक वाटीभर पिठीसाखर घेऊन त्यावर हे केलेले पाणी चार पाच चमचे टाकून कालवावे. व ताटलीत ही साखर २-३ दिवस सुकवावी. पुन्हा नवीन पाणी करून पुन्हा ह्या साखरेवर घालावे व सुकवावी. असे २-३ वेळा करणे. ही वाळलेली साखर बाटलीत भरून ठेवावी.
डोस- आर्धा चमचा साखर एका वाटीभर पाण्यात विरघळून ते पाणी पिणे. हा झाला एक डोस.
४. गणपतीला प्रिय कमळ
गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व हृद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो, बायकांच्या रक्तप्रदरावर (जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे. हार्ट वर कमळ जबरदस्त उपयोगी आहे.१९८६ सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे (चौबळाचे) हार्ट ७५%  काम करत नाही. फक्त २५% च काम करते आहे.  मी त्यांना जमेल तेव्हा ताजी कमळे खायला दिली. नंतर कमळे सुकवून केलेल्या गोळ्या दिल्या. चार महिन्यानी एक दिवस मला सकाळी ९ वाजता चौबळांचा फोन आला."ताप आल्यामुळे पूजा नर्सिंग होम मधे आहे. आज सकाळी पावणे आकरा वाजता येऊन भेटा. ''मी म्हटले" अहो सकाळी १०-४५ ला शक्य नाही, वाँटर प्रुफिंगसाठी माणसांना कामाला लावायला जायचे आहे. १२ वाजता येतो.''ते म्हणाले" नाही १०-४५ लाच या. बाकी मला माहिती नाही'' आणि फोन ठेवून दिला. मी पावणे आकराला नाईलाने गेलो. चौबळानी मला बसयला सांगितले व मी सांगे पर्यंत उठायचे नाही असे सांगितले. मी वैतागून बसून राहिलो कामे दिसत होती. पण इलाज नव्हता. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी चौबळाना तपासले. ठीक आहे म्हणून जाऊ लागले. चौबळानी डॉ ना विचारले हार्ट कसे आहे? त्यावर डॉक्टर म्हणाले चौबळ तुमचे हार्ट १००% काम करते आहे. किती वेळा सांगू. का लिहून देऊ. आणि डॉक्टर गेले. नंतर चौबळ मला म्हणाले माझे हार्ट १००% काम करत आहे हे मला तुम्हाला डॉक्टरांच्या तोंडून ऐकवायचे होते. म्हणून त्रास दिला. कारण हे तुमच्या  कमळाच्या गोळ्यामुळे झाले. मी गेली दहा वर्षे डॉ च्या गोळ्या खाल्या पण फायदा नव्हता.आपल्या पूर्वजानी गणपतीला कमळ आवडते सांगून सर्वसामान्याचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. देवाला जे प्रिय ते माणसाला उपयुक्त! त्यांनी धंदा केला नाही म्हणून ते अडाणी होते  का? मला वाटते दर वर्षी गणपतीला कमळ वाहून झाल्यावर दुसरे दिवशी ते कमळ पाण्यात २४तास भिजत ठेवावे. नंतर ते पाणी सर्वानी प्यावे. म्हणजे वर्षभर हार्ट सेफ राहायला मदत होईल. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी रोज कमळाचे सरबत करून प्यावे फायदा होण्याची शक्यता आहे. किमान त्रास नक्की नाही.गेली तीन वर्षे ही माझी पोस्ट वॉटस् अँपवर बरीच व्हयरल झाली. बरेच जणांना  फायदा झाल्याचे त्यांनी कळविले.नमस्कार, गेल्या वर्ष भरापुर्वी मी आपणास भेटलो होतो व मला ह्रदयात 3 ब्लाँकेजेस् असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते असे आपणास सांगीतले होते. त्यावरुन आपण मला रोज 2/2 कमळाच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे मी आपणाकडुन सहा महिने दरमहा गोळ्या घेतल्या व व दररोज सकाळी 2 व रात्रि. 2 अशा सेवन केल्या. व 29.12.18 रोजी मी माझी एँजीओग्राफी करुन घेतली. त्या तपासणीत ते तीनही ब्लाँकेज निघुन गेल्याचे आढळून आले व आपणास ब्लाँकेजेस नाहीत असे तपासणी करणाऱ्या  डाँक्टरांनी  लगेच सांगीतले. व मी टेंशन फ्री झालो. केवळ आपल्या सल्यामुळे व कमळाच्या  फुलांच्या गोळ्यांमुळे माझे ब्लाँकेजेस निघुन गेले आहेत. आपले मनःपुर्वक आभार व धन्यवाद. 
५. करंज फुल
मार्च, एप्रिल मधे करंजाचे झाड फुलते. बारीक पांढरी फुले असतात. निसर्ग ह्या फुलांचा  सडा पाडतो म्हणजे आपल्याला देत असतो.सकाळी 20-25 फुलं ग्लासभर पाण्यात भिजत ठेवून 10-12 तासानी फुले बाजूला करून पाणी वापरता येते. अर्धी वाटी एका वेळेस असे डोस घ्यावेत.ह्या पाण्याने साधाताप, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, चिकन गुण्या, व्हायरलचा ताप उतरायला उपयोग होतो, असा माझा अनुभव आहे.मी २०१६ साली आलेल्या डेंग्यू कम चिकन गुणियाच्या 15-20 लोकांचा ताप ह्याने उतरवला.तीन-चार वर्षा पूर्वी ची केस-- एक 75 वर्षाचे गृहस्थ. डाँ. चे म्हणणे कोमात नाहीत पण हालचाल नाही क्वचित डोळे, हाताच्या बोटांची हालचाल. त्यांना नाक, गळा, लघवीची जागा ह्या ठिकाणी नळ्या घातलेल्या. नळी दर आठ दिवसानी बदलावी लागे. नळी बदलली की इंफेक्शन होई, की ताप व जुलाब होत असत. मी त्यांना तीन फुलांचे अर्क एकत्र करून दिले त्यात एक करंज होता. एक जुलाब थांबण्यासाठी एकदंडी  फुलाचा अर्क दिला. उत्तम गुण आला. औषध संपल्यावर पुन्हा नेताना त्यांच्या मुलाने सांगितले की, हे इंफेक्शन थांबण्या साठी 90,000/- (नव्वद हजार)चे अॅटी बायोटीक देऊनही गुण आला नाही तो तुमच्या  200/- च्या औषधाने आला व येत आहे.माझ्या मित्राच्या मुलाला ताप आला होता. त्या दिवसात करंजाला फुले नव्हती. त्यांना पाने कुसकरून पाणी करून देण्यास सांगितले. त्या पाण्याने पण ताप उतरला.ही फुले सुकवून पावडर करून वापरता येते.ह्या फुलांची साखर करून ऑफ सीझनमधे वापरता येते.साखर करणे.वाटीभर  फुले वाटीभर पाण्यात १२ तास भिजवा. नंतर  ते पाणी गाळून घ्या. एक वाटीभर पिठी साखरेवर ५-६ चमचे गाळलेले पाणी टाकून साखर पूर्ण ओली करा. ही साखर सुकवा. असे चार वेळा करा. प्रत्येक वेळी नवीन पाणी करूंन त्याच साखरेवर घाला. हीतयार झालेली साखर अर्धा चमचा, वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे
६. गुलमोहोर फुल
एप्रिल व मे महिन्यात गुलमोहोर फुलतो. त्याच्या पाकळ्यांचा सडा जमिनीवर पडतो. ह्या 10--15 पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून, सकाळ दुपार व संध्याकाळ हे पाणी पिण्याने उन्हाळ्याच्या उष्णतेचा त्रास व पित्ताचा त्रास कमी होतो.
माझी आई व सासुबाई दोघीना पित्ताचा खूप त्रास होता. त्या दोघीना गुलमोहोराचे पाणी रोज दिले. आणि त्याना पित्ताचा त्रास पुढे सहा सात महिने झाला नाही.
माझे संशोधनात  कंपवातावर गुलमोहोर उपयोगी पडेल असे आले. डोंबिवलीच्या एका गृहस्थानी मी सांगितल्या प्रमाणे गुलमोहोराचे पाण्याने कंपवात कमी झाल्याचे फोन करून सांगितले. तसेच माझ्या एका 73 वर्षे वयाच्या मित्राना हे पाणी 3-4 महिने दिले. त्यांना चहा पिताना कप किंवा बशी इतकी हालायची की चहा पिणे नको व्हायचे ते आता व्यवस्थित एका हाताने चहा पितात.आत्तापर्यंत मी बरेच जणांचा पित्ताचा  कंपवाताचा त्रास गुलमोहोराच्या फुलानी कमी केला आहे
गुलमोहोराच्या फुलांचे सरबतही करता येते. बऱ्याच पाकळ्या मिक्सरमधून फिरवून चांगल्या क्रश कराव्यात व पाण्याबरोबर मिसळून चवी प्रमाणे साखर मीठ घालून प्यावे. ह्यामुळे उन्हाळ्यातील गर्मीचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे.
७. शेवंतीच्या फुलाचे उपयोग
भाद्रपद महिना संपत आला की बाजारात शेवंतीची फुले भरपूर प्रमाणात येतात. आश्विन व कार्तिक महिन्यात नैसर्गिकरित्या पित्त वाढत असते. शेवंतीचे पाणी पिण्याने पित्त कमी होते असे माझे संशोधनात आले आहे. ह्या पाण्याने आम्ल पित्त, अॅसिडीटी कमी होते, पोटातील जळजळ थांबते.अनुभव माझे आईला (वय 80) पित्ताचा त्रास 40 वर्ष होता. पित्त उलटून पडायचे. काहीही खाल्ले की उलटून पडायचे. शेवंतीचे पाण्याने खूपच फायदा झाला. सर्व पदार्थ खाऊनसुध्दा उलटी होणे थांबले. त्यामुळे तब्बेत सुधारली.15 वर्षापूर्वी मला बाहेर तिखट व चमचमीत भरपूर खाल्ल्याने पोटात आग व जळजळ खूप होत होती. त्यावेळी माझे संशोधनात शेवंतीचा उपयोग नुकताच कळला होता. म्हणून मी शेवंतीचे पाणी घेतले. पोट शांत झाले. पण पुन्हा असे खायचे नाही असे त्या दिवशी ठरवले. दुसरे दिवशी माझा मुंबईत असणारा मित्र आला. भटकून झाल्यावर त्याने बेडेकरची मिसळ खायचा आग्रह केला. मला जीवावर आले होते पण त्याचे मन मोडणे बरोबर वाटेना. मनात विचार आला शेवंतीचे पाणी आहे ना. चला खाऊन त्याला कंपनी देऊ. चांगल्या दोन प्लेट हाणल्या. रात्री घरी आल्यावर शेवंतीचे पाणी पिण्याचे विसरलो हे सकाळी लक्षात आले पण तेव्हा काहीच त्रास होत नव्हता.एका धंद्यातील गृहस्थ रोज दोन पेग व्हिस्की  घेत असत. त्यांंना दूसरे दिवशी हँगओव्हरचा त्रास व्हायचा असे त्यानी सांगितले व उपाय विचारला. मी त्याना त्यांच्या ब्रँडच्या थोड्याशा  व्हिस्कीत बूडतील एवढ्या शेवंतीच्या पाकळ्या आठ दिवस ठेवून नंतर गाळून ती व्हिस्की रोजच्या व्हिस्कीत एक चमचा मिसळून घेण्यास सांगितले. त्यानी त्याप्रमाणे केले व नंतर भेटल्यावर मला म्हणाले- अहो जोशी  काय औषध सांगितलेत. एकदम मस्त! एंजाॅयमेंट वुईथ नो हँगोव्हर! एकदम टाॅप!!
माझा निर्माल्य-औषध लेख प्रसिध्द झाल्यावर बरेच जणाना मी शेवंतीची साखर दिली. फायदा झाला. काहीना कमी फायदा झाला अशांंना शेवंतीच्या पाकळ्या सुकवून तयार केलेल्या गोळ्या दिल्यावर चांगला फायदा झाला.शेवंतीचे सीझन मधे बरेच वेळा शेवंतीचे पाणी घेतले तर वर्षभर पित्ताचा, अॅसिडीटीचा त्रास होत नाही असा माझा व  इतरांचा अनुभव आहे.पाणी करणे-- एका  (पांढरे किवा पिवळे) फुलाच्या पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी गाळून घेऊन दोन वेळा पिणे.पाकळ्या सुकवून पावडर करून ठेवावी म्हणजे आॅफ सिझनला अर्धा चमचा पावडर पाण्याबरोबर घेऊन फायदा होतो.ताज्या शेवंतीच्या पाकळ्या तीळाचे तेलात तळून तयार केलेले तेल वापरले असता केसात होणारी खाज व कोंडा (Dandrap) कमी होते असा माझा अनुभव आहे.माझे संशोधनात आलेले शेवंतीचे उपयोग पुढील त्रासांसाठी--अॅसिडीटी, यकृत सूज, कोलायटीस, संडासला खडा होणे, गॅसेस अडकणे, दमा, कोरडा खोकला, डोक्यात मुंग्या येणे, उष्माघात, मुत्रपिंड काम न करणे, लघवीला आग होणे, किडनी स्टोन.ह्या त्रासावर शेवंतीचा उपयोग होण्याची शक्यता आहे. उपयोग करून पहाणारे पेशंट नसल्याने अनुभव नाहीत.
ह्याला शास्त्रातील आधार ज्यांना हवा असेल त्यानीच तो शोधावा मला विचारू नये. अनुभव सांगणे माझे काम ते मी केले आहे.
८. ताम्र शेंगी
हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.2005 मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी  बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते.वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4 ते 6 डोस घ्यावेत.ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत. नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
९.  ब्रम्हकमळ
मायग्रेन साठी औषध जून, जुलै महिन्यात ब्रह्मकमळला फुले येतात, ती रात्री उमलतात उजाडल्यावर कोमेजून जातात. ही फुले बारीक तुकडे करून साखरेत घालून बरणीत ठेवावीत, अधून मधून ते कोरड्या चमच्याने ढवळावा. दोन महिन्यात त्याचा गुलकंद तयार होतो. हा ब्रह्मकमळाचा गुलकंद डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. पाव चमचा गुलकंद वाटीभर पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. जरुरीप्रमाणे १-२ डोस घ्यावे. मायग्रेन चा त्रास कमी होतो. हा गुलकंद वर्षभर टिकतो व वापरता येतो.मी ह्या फुलाचा उपयोग करून बरेच जणांचे मायग्ेनचे त्रास कमी केले आहेत. ज्यांचेकडे हे फुल येते त्यानी जरूर गुलकंद करून ठेवावा.
११.  गलांडी
माझे फुलांच्या संशोधनात आलेले गलांडीचे ह्या फुलाचे औषधी उपयोग पुढील प्रमाणे.घसा दूखणे, घशाची सूज व आग, खोकला,स्वरयंत्राचा त्रास,व्हेरीकोज व्हेन्स, हाय बीपी.पाणी करायची पध्दत ह्या एका फुलाच्या पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून घेऊन अर्धी, अर्धी वाटी 4--5वेळा पिणे. रोज नवीन पाणी करणे.मला इंग्रजी नाव माहिती नाही आपल्याला हवे असल्यास आपला आपणच शोध घ्यावा कृपया मला विचारु नये(ही फुले फुलवाल्याचेकडे मिळतात. )
१३.  तीर्थ निर्माल्य औषध
मी गेले वीस वर्षे पुण्यात व पुण्याजवळ मिळणार्या 190 फुलांच्या औषधी उपयोगावर माझ्या पध्दतीने संशोधन केले व करत आहे. ह्या संशोधनातून मला असे लक्षात आले की खास देवाना वाहण्याची जी फुले आहेत ती सर्व  सामान्य व पिरीऑडिकली येणार्या आजारांवर उपयोगी आहेत. त्याची माहिती पुढे देत आहे.झेंडू--कफयुक्त खोकल्यावर उत्तम. सर्दी पडसे, डोळ्याचा नंबर वाढणे,मोती बिंदू, काच बिंदू वर उपयोगी.गुलछडी--बध्दकोष्टता, कोलायटीस, कोरडा खोकला, अंगाला सूज, पायाला सूज, किडनी फेल, क्रिएटेनिन वाढणे, ब्लड यूरिया वाढणे इत्यादी वर उपयोगी.शेवंती-- अॅसिडीटी, पोटातील जळजळ, संडासला खडा होणे, लघवीला आग होणे, कोरडा खोकला, लिव्हरला सूज इत्यादीवर उपयोगी.बिजली--पाळीला पोटात दुखणे, प्रोस्टेट वाढणे, पित्त वाढणे इत्यादीवर उपयोगी.
जास्वंद--कंपवात, मॅनेंन्जायटीस,लिव्हरला सूज, बध्दकोष्टता,कोलायटीस इत्यादीवर उपयोगी.
पारिजातक--तोंड येणे, सर्दीपडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, डोळे लाल होणे, पाळीला पोटात दुखणे, मोनोपाॅजचा त्रास, अंगावर काळे डाग, इसब,चट्टे गाठी उठणे, संडासला साफ न होणे, इत्यादीवर उपयोगी.
गलांडी-- घशासाठी उत्तम.सोनचाफा--पाळी लांबणे, पाळीला गठ्ठे पडणे, गुडघे दुखी, आमवात, हाडाचा क्षय, स्वरयंत्र, थायराॅईड, लघवीली आग होणे इत्यादीवर उपयोगी.दुर्वा-- गर्भाशय, ओव्हरीज, प्रोस्टेट याच्या उष्णतेवर काम करतात, टाच दूखीवर उपयोगी.
 बेल--  बेलामुळे  शरीरातील हीट कमी होते हा मूळव्याध, बी पी, मधुमेहा साठी उपयोगी आहे.फुलाचा औषधी उपयोग करण्यासाठी फुल पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यावे लागते.आपण  देवावर फुले वाहतो ती दूसरे दिवशी पर्यंत तशीच असतात. तो पर्यंत त्यातील औषधी अंश काही प्रमाणात देवाचे मुर्तीला चिकटतो व पूजा करताना तो अंश पाण्यात उतरतो आणि ते पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वजानी त्याला पवित्र ठरवून हे तीर्थ पिण्याची प्रथा पाडली व  समाजाचे आरोग्य सहज राखण्याचाप्रयत्न केला.
आम्ही आधुनिक शिक्षणामुळे तीर्थ पीत नाही टाकाऊ,  अस्वच्छ ठरवतो. आणि स्वत:चाच तोटा करून घेतो.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*