कड्यावरचा गणपती

Vikas Jamdade
0

डोंगराएवढा उंच कड्यावरचा गणपती 
कड्यावरचा निसर्गराजा गणपती पर्यटकांचे आकर्षण आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे... अशी भावना ज्याच्याकडे पाहिल्यावर मनात जागते, अशा गणपतीचे दर्शन माथेरानच्या प्रवासात आपल्याला घडते. मात्र, त्यासाठी नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास करावा लागतो.👉हे हि वाचा श्री क्षेत्र रामलिंग माहिती
निसर्गरम्य डोंगरदऱ्यातून वळणे घेत जाणारी मिनी ट्रेन एका ठिकाणी वळते आणि जणू या मार्गावर कृपाछाया धरलेली गणपतीची ही विशालकाय मूर्ती समोर येते. डोंगरामधूनच साकारलेली तब्बल पाच मजली इमारती एवढ्या उंचीइतकी (५२ फूट) ही गणपतीची मूर्ती पाहताच मनात आपसूकच भक्तीभाव जागतो.
'निसर्गराजा गणपती' म्हणूनही ओळख असलेला हा गणपती आकाराला आला २०१८ मध्ये. डोंगराच्या कड्यावर असल्यामुळे काहीजण त्याला 'कड्यावरचा गणपती' असेही म्हणतात.
नेरळ येथून माथेरानला जाण्याच्या मार्गावर साधारणतः माथेरानच्या आधी दोन किमी अंतरावर हा गणपती आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून या गणपतीच्या स्थानापर्यंत जाता येते. सुमारे अर्धा तास चालल्यानंतर या भव्य कड्यावरच्या गणपतीचे दर्शन होते.या देवस्थानाच्या निर्मितीची कहाणी अनोखी आहे. हे स्थान म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण झालेली कलाकृतीच म्हणावी लागेल. 
नेरळ-माथेरानदरम्यान धावणाऱ्या मिनीट्रेनचे मोटरमन राजाराम खडे यांना प्रत्येक फेरीमध्ये येथे असलेल्या एका उंच कड्यातून गणपतीच आपल्याकडे पाहतोय असा भास होत असे. या कड्याचा आकारही काहीसा तसाच होतो.ते या मार्गावर १९९८ पासून गाडी चालवत. असेच २००४ मध्ये ते नेरळ स्थानकात माथेरानसाठी गाडी घेऊन निघणार तेवढ्यात इंजिनमध्ये अचानक उंदीर घुसला. काही केल्या तो तेथून बाहेर पडेना. अखेरीस ट्रेन सुरू करून ते पुढे निघाले. आता ज्या ठिकाणी गणपतीचे स्थान आहे, त्या ठिकाणी येऊन त्या उंदराने टुणकन खाली उडी मारली. हा दैवी संकेत मानून त्यांनी त्या कड्याकडे पाहिले. तेथे गणपती त्यांना आशीर्वाद देतोय, असा भास झाला. मल्लिकार्जुन मंदिर माहिती
खडे यांनी नेरळ-माथेरानमधील गावकऱ्यांना याबद्दल सांगताच राजाराम खडे यांच्यासह त्या सर्वांनीही या कड्यावर गणपती आकारास आणण्याची मोहीम सुरू केली. काही ठिकाणी लोखंडी पत्रा वापरून, तर काही ठिकाणी खडक तासून हा गणपती आकारास येऊ लागला. २००४ साली सुरू केलेले हे कठीण काम तब्बल चौदा वर्षांनंतर, म्हणजे २०१८ साली पूर्णत्वास आले. या महागणपतीच्या पायाखाली भव्य उंदीरही बनविण्यात आला आहे. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी तेथे लहान मंदिरही आहे. त्यात गणेशाची छोटी मूर्ती ठेवण्यात आली आहे माथेरानच्या डोंगरात एका मोठ्या दगडामध्ये नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची धुरा सांभाळणारे राजाराम खडे यांच्या मध्यातून कड्यावरचा गणपती साकारला गेला आहे. 
नेरळ -माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनाचे सारथ्य म्हणून अनेक वर्षे धुरा वाहणारे नेरळ येथील खड़े यांना माथेरानवरून नेरळकडे येतांना एक कडा नेहमी खुणावत असे साधारण 47-50 फूट उंचीच्या या कड्याला असलेला आकार यामुळे त्यांचे हात मिनीट्रेन घेऊन जातांना आणि येतांना प्रवासात त्यांचे हात आपोआप जोडले जात. त्यांनी 2005 मध्ये माथेरानच्या डोंगरात ज्यावेळी प्रचंड भुस्खनन झाले, यावेळी मिनीट्रेन बंद पडली होती. त्यामुळे सतत आपल्याकडे आकर्षित करणार्‍या त्या दगडाच्या कड्यावर खडे पोहचले. तेथे काळ्या पाषाणातील त्या दगडाला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने गणपतीच्या तोंडाचा आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी खडी आणि सिमेंट यांच्या सहाय्याने हात तयार केले. त्या चार हातात गणपती बाप्पाची चार आयुधे देण्यात आली. त्यामुळे बाप्पाचा आकार आल्याचे लक्षात येताच खडे यांनी आपले सहकारी विश्‍वनाथ भोसले आणि राजीव शिंदे यांच्या मदतीने गवंडी काम करून निसर्ग राजा गणपती म्हणजे कड्यावरचा गणपती घडविला. हि सर्व कामे करतांना खडे यांनी लोखंड, सिमेंट, वाळू, खडी आदी वस्तूंची नेरळ माथेरान घाट रस्त्याने तसेच मिनीट्रेन सुरु झाल्यानंतर मिनीट्रेन मधून नेवून पूर्ण केले.नेरळ – माथेरान घाटरस्त्यात आपली दुचाकीवर या वस्तू नेत्यांना पुढे चार किलिमीटर अंतर पायी मिनीट्रेनच्या ट्रॅक ने नेण्याचा प्रयत्न केला. 
47 मीटरच्या दगडी कड्याला गणेशाच्या भक्तीमुळे आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुढे गणेशापुढे मोदक असावा म्हणून,तब्बल साडेपाच फूट उंचीचा आणि एका व्यक्तीच्या कवेत येणार नाही एवढा मोठा मोदक सिंमेंटच्या सहाय्याने तयार करण्यात आला. तर त्या निसर्गराजा गणपतीच्या बाजूला एक कमी जाणवत असल्याचे त्या ठिकाणी भेट देणारे आवर्जून सांगायचे. कारण अगदी लहान आकाराचा असलेला उंदीरमामा म्हणजे मूषकराज हा देखील भलामोठा असावा या हेतूने खडे यांनी तब्बल सात फूट उंचीचा बनविला. एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा मोठ्या आकाराचा उंदीरमामा असावा हि गोष्ट निसर्गराजा गणपती येथे शक्य झाली आहे. त्या कड्यावरचा गणपतीला रंगरंगोटी करण्यासाठी देखील अडचण निर्माण होऊ नये म्हणून लोखंडी शिड्या बनविण्यात आला आहेत. नेरळ ममदापुर येथील बाळू कारले यांनी त्या परिसराला आणि कितीही दूरवरून पाहिले तरी आकर्षक दिसेल असे रंगकाम पूर्ण करून केले आहे.त्यामुळे मिनीट्रेन मधून प्रवास करणारा प्रत्येक पर्यटक त्या गणपती कडे पाहून दगडात कोरलेल्या गणेशाच्या मूर्तीचे कौतुक करावीत असतात. सद्या डी ३ ग्रुप फाऊंडेशनकडून या देवस्थानाची देखभाल करण्यात येते. यामध्ये ४५ सदस्य आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनही इथे अंगारकी साजरी करण्यात येते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*