बच्चन पांडे मूव्ही (चित्रपट) माहिती
कलाकार -
अक्षय कुमार(akshy kumar), कृती सेनन(kruti senan),अर्शद वारसी(arshad warshi),पंकज त्रिपाठी(pankaj tripathi), संजय मिश्रा(sanjay mishra)जॅकलीन फर्नांडीस(jaklin farnandis),अभिमन्यू सिंग(abhimanyu sing)
दिग्दर्शक - फरहाद सामजी(farhad samji)
निर्माता - साजिद नाडियाडवाला
मार्च महिन्याच्या गरम वातावरणात अक्षय कुमार चा बच्चन पांडे चित्रपट रसिकांचे मनोरंजन करण्यास येत आहे.या चित्रपटांत जॅकलीन फर्नांडीज व कृती सेनन अभिनय करत आहेत.या होळी सणात हा चित्रपट रिलीज झाला असून यात अर्शद वारसी व पंकज त्रिपाठी हे रसिकांना हसवण्याकरता येत आहेत.जर अक्षय व टीम ची कॉमेडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली तर हा चित्रपट हाऊसफुल गल्ला जमवण्यात यशस्वी ठरेल. हा चित्रपट तामिळ चित्रपट जिगरथंडा चा ऑफशियल रिमेक आहे.निर्माता साजिद नाडियाडवालाच्या वाढदिवसादिवसाला ह्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला होता.साजिद हे त्याच्या कॉमेडी चित्रपट तयार करण्याकरता प्रसिद्ध आहेत.अक्षयचे प्रथम दमदार व्हिलन रूप पहायला मिळेल.या चित्रपटात अक्षय निर्दयी गुंड असतो.त्याला लोकांना त्रास देणे मारणे यात मजा येत असते.त्याचा एक डोळा दगडाचा असतो.त्याच प्रमाणे त्याचे हृद्ययही दगडाचे आहे असे लोक म्हणतात.या चित्रपटांत जॅकलीन फर्नांडीज हि अक्षय ची प्रेयसी ची भूमिका निभावत आहे.अक्षय व तिची केमेस्ट्री छान जमली आहे.कृती सेनन यात मायरा देवकर हे पात्र निभावले आहे.मायरा यात एक दिग्दर्शक असते कि जी एका गुंडा वर चित्रपट तयार करण्याकरता गुंड शोधत असते तिचा शोध बच्चन पांडे ( अक्षयकुमार ) पाशी थांबतो.बच्चन बघवातील एक खतरनाक नावजलेला कुख्यात गुंडा असतो.मायराला बच्चन पांडे बद्दल सर्व काही माहिती करून घ्यायची असते.त्या करता ती तिचा मित्र विशु (अर्शद वारसी) ची मदत घेते.व बाघवा येथे जाते व तिथुन चालु होते कॉमेडी,सस्पेन्स, ॲक्शन व ड्रामा व तुफान हाणामारी.बच्चन वर मायरा चित्रपट तयार करण्यात यशस्वी होते का हे पाहण्याकरता हा चित्रपट पाहावा.अक्षय या चित्रपटात अँटी हिरो किंवा अँग्री मॅन भूमिका पुन्हा जीव ओतून केली आहे.कृती ने मायरा ची भूमिका योग्य प्रकारे साकारली आहे. अर्शद ने विशूच्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे.जॅकलीन फर्नांडीज ने बच्चनची प्रेयसी मेहबुबा सुफिची भूमिका लक्षात राहते.अक्षय चा हटके अंदाज पाहण्याकरता हा चित्रपट पाहावा.शिवाय पंकज त्रिपाठी,संजय मिश्रा,व प्रतीक बब्बर यांच्या भूमिका आहेत.