भारतातील लोकल स्टार्स(कलाकार)
आपला भारत देश एक बहुभाषिक देश आहे.आपल्या देशात असामान्य प्रतिभा असलेले अनेक लोक सहज सापडतात.पण त्याची कदर होतेच असे नाही.परंतु आताचा जमाना ऑनलाईन असल्याने सोशल साईट,अॅप,फेसबुक,व्हाट्सएप, इंस्टाग्राम,इत्यादी साईट मुळे व्हिडीओ सहज मोबाईल वर व्हायरल होतात व देशात व विदेशात पसरतात.व एखादा लोकल कलाकार अचानक प्रसिद्ध होतो.सध्या कच्चा बदाम गाण्याची प्रचंड कौतुक(क्रेज़)होत आहे.भुवन बंड्याकर हा कलाकार कोण होता व इतका प्रसिद्ध कसा झाला.भुवन हा रस्त्यावर शेंगा विकत होता तो त्याच्या स्टाइल मध्ये गाणे गात.कोणीतरी व्हिडीओ काडून नेट वर टाकला अन भुवन अचानक प्रसिद्ध झाला.जिथे तिथे त्याचे गाणे गाऊ जाऊ लागले व गाणे व्हायरल झाले.त्यावर टिक टाॅक,इंस्टाग्रामवर रिल्स, तयार झाल्या.काल परवा पर्यंत राणू मंडल नेही असाच धुराळा उडवून दिला होता .राणू लता मंगेशकरांची गाणी अफलातून पणे म्हणत प्रसिद्ध झाली.तसेंच गोविन्दच्या गाण्यावर धुंद पणे डान्स(नृत्य)करणारे डान्सिंग अंकल संजीव श्रिवास्तव हे पण असेच प्रसिद्ध झाले.तर आपण अशाच कलंदर कलाकाराची माहिती पाहूया
1)भुवन बंड्याकर
⭕कुठे राहतो - कच्चा बदाम फेम भुवन बंड्याकर हा पश्चिम बंगालातील बीरभूम जिल्ह्याचा रहिवाशी आहे.तो एक साधा सायकल वर शेंगदाणे विकणारा फिरता विक्रेता तो शेंगा विकताना शेंगांना कच्चा बदाम म्हणत विक्री करतो.
⭕कशामुळे फेमस - भुवन हा त्याच्या कच्चा बदाम कच्चा बदाम गाण्यामुळे फेेेमस झाला.
⭕सध्या काय करतो - भुवन सध्या अचानक प्रसिद्ध झाल्यामुळे तो एक सेलिब्रिटी झाला आहे.तो त्याचे व्हिडीओ व्हायरल करत आहे.त्याने म्युझिक कंपन्या बरोबर करार केले आहेत.अलीकडे त्याचा किरकोळ अपघात झाला असून तो बरा आहे.
2)राणू मंडल -
पश्चिम बंगालातील राणापुर रेल्वे स्टेशन वर गाणे गाऊन भीक मागायची पण अचानक प्रसिद्ध झाली.
⭕कश्यामुळे फेमस - इक प्यार का नगमा हे मोजो कि रवांनी है.या गाण्यामुळे प्रसिद्ध.लता मंगेशकरांची गाणी गाऊन 2019 मध्ये प्रसिद्ध झाली.संगीतकार हिमेश रेशमिया ने गाण्याची संधी दिली.
⭕आता काय करते - राणू मंडल तिच्या वागण्या मुळे प्रचंड ट्रोल झाली व मागे पडली.ती पुन्हा स्टेशन वर भीक मागत आहे.तिच्यावर एक बायोपिक बनत आहे.
3)संजीव श्रिवास्तव-
⭕कुठे राहतो - संजीव मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे राहतो.व भाभा संशोधन केंद्रात प्रोफेसर आहे.नागपूरात प्रियदर्शनी कॉलेजात इंजिनियरींग केले.
⭕कश्यामुळे प्रसिद्ध - 2018 साली गोविंदाच्या डान्सची नक्कल केली व तो व्हिडीओ व्हायरल झाला व संजीव फेमस झाला.गोविंदा व सलमान खान बरोबर स्टेज शेअर केले.रविना टंडनने कौतुक केले.विदिशा मनपा चा ब्रँड अम्बेसिडर आहे.
⭕आता काय करतो - डान्सिंग अंकल सध्या आपले डान्स व्हिडीओ तयार करून यु ट्यूब वर अपलोड करत आहे.पण पूर्वी सारखे व्हिव्ज मिळत नाहीत.
4)डिच्याक पूजा -
पूजा जैन ऊर्फ डिच्याक पुजा हि मूळची उत्तर प्रदेशातील आहे.ती प्रसिद्ध यु ट्यूबर आहे.
⭕कश्यामुळे प्रसिद्ध - 2017 साली सेल्फी मैने लेली या गाण्यामुळे प्रसिद्ध .कर्कश पॉप सॉंग म्हणणे हि तिची ओळख.
⭕आता काय करते - 2017 मध्ये एवढी प्रसिद्ध झाली कि तीला बिग बोस सिझन 11 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली.एका व्यक्तीच्या तक्रारी मुळे तिचे यु ट्यूब अकाउंटवरुन तिचे व्हिडीओ काडून टाकले.तिची लोकप्रियता खालावली.
5)सहदेव दिरडो -
⭕कुठे राहतो - छत्तीसगढच्या सुकमा जिल्हातील नक्सली प्रभावित जिल्ह्याचा रहिवाशी हा मुलगा.
⭕कश्यामुळे प्रसिद्ध - 2019 साली शिक्षकाने बचपण का प्यार हे गाणे म्हणायला लावून ते व्हायरल केले.बादशहा बरोबर सहदेव ने स्टेज शेअर केले.
⭕आता काय करतो - 2021 साली सहदेव चे अपघात झाल्याने तो ऍडमिट होता.सध्या गाणे गाऊन त्याचे व्हिडीओ शेअर करत आहे पण त्याची लोकप्रियता कमी आहे.
वरील माहिती आवडली तर like व शेअर करा.🙏