बचत करण्याचे अनोखे मार्ग

Vikas Jamdade
0

 

बचत करण्याचे मार्ग

नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी बचतीचे महत्व या विषयावरचा ब्लॉग पहिला आता आपण बचत करण्याचे नानाविध मार्ग पाहुयात.आपण जे कमावतो त्यातील बरीच रक्कम आपल्या दैनंदिन किंवा मासिक खर्च किंवा अचानक येणाऱ्या अडचणी वर खर्च होतो.बचत करण्याचे काही मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

1)प्रथम आपले बजेट निश्चित करावे.

पहिल्यांदा आपल्या दैनंदिन तसेच मासिक खर्च याची यादी करावी.व आपल्या दरमहा येणाऱ्या मासिक उत्पन्न याची तुलना करावी.आपल्या उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम बचती करता राखुन ठेवावी.

2)खर्चाच्या रकमेची वेगवेगळी पाकीटे तयार करणे.

मसिक खर्चाचे रकमेचे पाकीट तयार करून त्यामध्ये संभाव्य खर्चाची रक्कम ठेवावी.जसे पेट्रोल,दूध,लाईट बिल,इत्यादी खर्चाची रक्कम ठेवावी जेणेकरुन आपले खर्च लिमिट मध्ये राहून वारेमाप होणारा खर्च नियंत्रीत राहिल.

3)गरज आहे तेवढया वस्तु खरेदी करणे

आपल्या सर्वांची एक सवय असते कि खरेदी ला गेल्यावर वारेमाप खरेदी करतो.गरज नसणार्या वस्तु खरेदी करतो.जर आपण आपल्याला लागणाऱ्या वस्तूंची यादी करून खरेदी केली तर खर्च कमी होईल.

4)ऑनलाईन खरेदि बजेट मध्ये करावी.

आपण सेल आहे डिस्काऊंट आहे म्हणून खरेदि करतो पण त्या वस्तुची बाजरात काय किंमत आहे हे पाहत नाही.त्या मुळे ऑनलाईन खरेदी करताना किमतीची खात्री करून खरेदि करावी.

5)गॅस व वीज वाचविणे 

आपण गॅस वीज वापरतो पण त्याची बचत करत नाही त्यामुळे आपला खर्च वाढतो.त्यामुळे घरात वापरली जाणारी वीज वाचवुन लाईट बिल कमी करू शकतो. गरज नसताना लाईट वर चालणाऱ्या वस्तू जसे फॅन,टीव्ही,गिझर,एसी, बंद करणे.

6)लाईफस्टाईल खर्चीक नसावी.

आपली जीवनशैली एकदम खर्चीक नसावी.जर आपली जीवनशैली खर्चीक असेल तर आपले पॅाकेट रिकामे व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे खालील गोष्टी जाणून घ्याव्या.
🔴दर आठवडय़ाला हॉटेल मध्ये जाऊन जेवण करणे कमी करा.
🔴दर सहा महिन्याला मोबाईल बदलणे बंद करा.
🔴महाग गोष्टीवर होणारा खर्च कमी करणे.

7)गुंतवणूकी चे विविध पर्याय पाहून पैसे गुंतवणे

🔴बचत खाते
🔴आर डी खाते
🔴टॅक्स सेविंग खाते
🔴इक्विटी फंड 
🔴म्युच्यूअल फंड
🔴सार्वजनिक भविष्य निधी
🔴राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 
🔴डाकघर बचत प्रमाणपत्र
🔴डाकघर अवर्ती जमा
🔴डाकघर मासिक आय योजना
🔴किसान क्रेडिट कार्ड
🔴राष्ट्रीय पेन्शन योजना
🔴प्रधानमंत्री जन धन योजना
🔴अटल पेन्शन योजना
🔴सरकरी रोखे खरेदी
🔴सोने खरेदी 
🔴जागा खरेदी
🔴चिटफंड

8)गरज नसताना कर्ज घेणे टाळा.

काही जण त्यांना गरज नसताना कर्ज घेऊन चैनीच्या वस्तू खरेदि करणे.या करणा करता कर्ज घेतात.कर्ज केव्हा घ्यावे जेव्हा आपल्याला त्याची गरज असते.कारण कर्जाचे व्याज हे जास्त असल्याने बचत न होता तो आपल्या उत्पनावर परिणाम करते.

9)हेल्थ इंन्शुरन्स घेणे.

पराधिन आहे माणूस या जीवनी अशी कविता आहे कारण माणुस जेव्हा निरोगी असतो तेव्हा काम करू शकतो.जर आरोग्य चांगले असेल तर जीवन सुंदर असते.जर अचानक तब्येत बिघडली तर दवाखाना खर्च होतो त्यामुळे अचानक होणाऱ्या हॉस्पिटल खर्चा करता हेल्थ इन्शुरन्स घेणे केव्हाही चांगले.




एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*