मोबाईल सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो?
नमस्कार आपण वापरत असलेल्या मोबाईल सिम कार्ड चा एक कोपरा कापलेला असतो.हा कोपरा प्रत्येक सिम देणाऱ्या कंपनींच्या सिम कार्ड मध्ये अढळतो.चला या बाबतीतील माहिती घेऊ.सध्या सिम कार्ड मध्ये जुन्या पद्धतींचे सिम जे मोठया आकाराचे होते.ते सद्या मायक्रो (लहान) अकारात उपलब्ध आहेत.सिम म्हणजे Subscriber Identity Modul (SIM)म्हंटले जाते.सिम कार्ड(COS) चालवणारे इंटिग्रेटेड सर्किट आहे.जे अंतरराष्ट्रीय ग्राहक ओळख (IMSI)क्रमांक व त्यांची माहिती सुरक्षित जपुन ठेवते.या क्रमांकाचा आणखी एक उपयोग म्हणजे मोबाईल किंवा टेलीफोन वर ग्रहकाची ओळख पटवण्याकरता होतो.मोबाईल सिम कार्डाची रुंदी 25 मिमी,उंची लांबी 15 मिमी,आणि जाडी 0.76 मिमी असते.आपण निरखून पहिले असता आपल्याला सिम कार्ड एका बाजूने कट केलेले अढळते.त्याचे कारण जर सिम जर चारी बाजूने सामान असले तर ते मोबाईल मध्ये बसवता ना कसे बसवावे हे कळाले नसते.सिम कार्ड चा एक कोपरा कट केल्याने सिम मोबाईल मध्ये बरोबर बसवता येते.तसेंच चुकीच्या बाजूने सिम बसवण्याचा धोका कमी झाला.सिम कार्ड च्या उजव्या कोपर्यात सिम बसवण्याकरिता सॉकेट असते.सिम कार्ड च्या एका कोपर्यात कट चे चिन्हाचे मुख्य कारण म्हणजे सिम कार्ड व मोबाईल धारकाचा पिन योग्य संपर्क स्थापन करणे.सिम कार्ड चा पिन क्रमांक 1 हा मोबाईल च्या संमधित पिन शी जोडला असणे आवश्यक आहे.त्या शिवाय मोबाईल मध्ये सिम कार्ड नेटवर्क दिसणार नाही.सिम कार्ड मध्ये स्टोरेज असते त्या नुसार 8KB,16KB,32KB,64KB,256KB इत्यादि.सिम कार्डाचा आविष्कार गिज़ेक & देवरीयन्ट याने 1991 या वर्षी केला.जुने सिम कार्ड एटीएम कार्ड च्या आकाराचे होते.सध्या नॅनो सिम हे नवीन प्रकार सिम कार्ड मध्ये लोकप्रिय आहे.(E SIM) e सिम हे सध्यांच्या सिम मध्ये ऍडव्हान्स प्रकार आहे.प्लास्टिक वापर कमी करण्याकरता हे सिम ऍडव्हान्स प्रोग्राम केलेले सिम आहे .हे सिम आपण ऑनलाईन ऑपरेट करू शकतो.