बचत आजची गुंतवणूक उद्याची बचतीचे महत्व

Vikas Jamdade
1


🔰बचत

बचत म्हणजे काय ? आपण आपल्या उत्पनातील शिल्लक रक्कम म्हणजे बचत हा सर्वमान्य समज आहे.जेव्हा कधी आपण मित्राबरोबर चर्चा करतो तेव्हा सर्वजण आपल्याला महिन्याच्या खर्चातुन काही रक्कम शिल्लक ठेवावीं असा सल्ला देतात.जेणेकरुन आपली सर्व देणी देऊन आपला दैनंदिन खर्च भागवून जी रक्कम हाती राहील त्यातून बचत करता येईल.परंतु या सर्व गोष्टी आपल्या सद्य परिस्थिति वर अवलंबून असतात.कारण गरीब किंवा श्रीमंत लोक बचत करतात.बचत म्हणजे आपल्या भविष्य काळाची तरतूद असते.

🔰बचत म्हणजे काय?

⭕ सद्य परिस्थितीत आपल्याकडे वापरात नसलेली रोख रक्कम जी आपल्या भविष्यकाळ किंवा अपत्कलिक खर्चाकरिता राखून ठेवतो ती बचत.
⭕हा पैसा असा आहे जो आपल्या गरजेच्या वेळी सहज उपलब्ध होतो.
⭕ आर्थिक संस्था आपल्याला बचतीचे अनेक प्रकार उपलब्ध करून देतात.त्यामध्ये विविध सरकारी बचत योजना व इतर सरकारी योजनाचा पर्याय आहे.आर्थिक मंदिचा काळ पाहिलेले अनेक जण आपल्या भावी काळा करता बचत करतात.
⭕जास्त परतावा देणाऱ्या योजनात आपली बचत गुंतवणूक करतात.उदा.FD, RD,SIP, रोखे,पोस्ट बचत इत्यादी.यामध्ये किमान 3% ते 7% पर्यंत व्याज मिळते.व SIP केल्यावर किमान 12% परतावा मिळतो.

🔰पैसे गुंतवणे म्हणजे काय?

⭕गुंतवणुक म्हणजे आपल्या कडील शिल्लक रोख रक्कमेतुन मालमत्ता खरेदी करणे.ज्या मध्ये आपण कमी जोखीमीत जास्त परतावा मिळवु शकतो कि जो आपल्याला अर्थिक मंदिमधे आपल्याला निश्चित परतावा मिळवुन देते.व अविरत पैश्यचा प्रवाह निर्माण होतो.
⭕व्यवहारिक भाषेत अश्या चांगल्या मालमत्ताना प्रॉडक्टिव असेट म्हणतात.त्यामध्ये बॉण्ड,समभाग,मालमत्ता,इत्यादीचा
समावेश होतो.
⭕या सगळ्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे,आपल्या दैनंदिन खर्चात कर्जाचे हप्ते,तारण ठेवलेल्या बाबी,विमा,विम्याची किंमत,हप्ते,आपल्या दैनदिन वापरातील वस्तू व सेवा आणि त्या वस्तुचा खर्च या सगळ्याचा समावेश होतो.
⭕या सगळ्याची किंमत पुढील सहा महिने कमीत कमी फेडता येईल एवढी बचत करावी लागेल.त्यामुळे एकदा निश्चितीं झाल्यावर आपल्याला कोणतीही अडचण आली किंवा नोकरीं गेली तरी पुढील सहा महिने आपल्याला कोणतीही अडचण न येता आपण आपल्या गरजा भागवु शकतो.
⭕आपल्या आयुष्यातील असे कोणतेही ध्येय, उद्दिष्ट ज्याला पुढील पाच वर्षात खुप मोठ्या रक्कमेची गरज लागणार आहे.ते उद्दिष्ट गुंतवणूक आधारित न ठेवता ते बचत आधारित ठेवावे.कारण छोट्या काळातील गुंतवणूक हि दोलायमान असते.उदा.शेअर मार्केट गुंतवणूक हि दीर्घकाळ ठेवली तर फायद्याचे ठरते

 🔰बचत व गुंतवणूक फरक मुद्दे

⭕जोखीम 

⭕ व बचत या दोन्ही घटकांत जोखीम हा घटक महत्वचा आहे.जेव्हा तुम्ही पैसे एखाद्या बचत खात्यात ठेवतो तेव्हा जोखीम कमी असते.तसेंच त्याचा परतावा हि कमी असतो.
⭕या उलट आपण जर रक्कम एखाद्या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक करतो तिथे जोखीम जास्त असते परंतु परतावा हि जास्त असतो.

⭕परतवा 

आणखी एक मुद्दा म्हणजे परताव्याचा दर किंवा निर्माण होणारा नवीन पैसा.गुंतवणूक करताना आपला हेतू त्यापासून आपल्याला जास्त फायदा मिळावा हा असतो.त्याच वेळेला आपला पैसा सुरक्षीत राहावा हा हेतू असतो.त्या करता गुंतवणूक करताना आपला सखोल अभ्यास असावा.

⭕ संस्था

आपण ज्या संस्थेत गुंतवणूक करणार आहोत ती कधी पासून सेवा देत आहे तिची उद्दिष्टे,तिच्यावर असणारे RBI नियंत्रण असावे.बँकेचे ताळेबंद,नफा पाहावा, बँक विमा हप्ता भरते का ते पाहावे.कारन 5 लाखा पर्यंत ठेवीना आता विमा संरक्षण प्राप्त आहे.




एक टिप्पणी भेजें

1टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*