अजब भुताची गजब कहानी

Vikas Jamdade
0

मंगला तुझ भुताटकी बद्दल काय मत आहे ?भुताटकी बद्दल विचारल्यावर मंगला भीती युक्त गडबडली असं का भुत बघितल्या सारखे घाबरली असे गणू म्हणाला.गणू हा स्पाय (गुप्तहेर) असल्याने त्याच्या कडे आलेल्या नवीन केस बद्दल तो मंगला ला बोलत होता.पण मंगला भूतांची केस म्हंटल्यावर पार घाबरली.पण न घाबरल्याचे दाखवुन ती म्हणली मी भूतांच्या गोष्टी ऐकल्या आहे पण प्रत्यक्ष भुत पहिले नाही व अनुभवले नाही.तु असताना भुताला बघायची काय गरज!
यावर गणू म्हणाला तर चल मग येते का भुत बघायला गोव्यतील मोठया वाड्यात तिथे भुताची केस सोडवू व गोवा ट्रिप करू. तिथल्या वाड्याच्या मालकाला वाडा विकायचा आहे पण या भूतांमुळे कोणी जागा खरेदी करण्यास येत नाही व जागे च्या आजुबजुस जाण्यास धजावत नाही.जागा मालक हैरान झाला आहे. तांत्रिक ,मांत्रिक,हकीम झाले पण भुताटकी काही कमी होत नाही.यावर मंगल म्हणाली सर या फंदात कशाला पडता आपल्या कडे अगोदर च्या अनेक केसेस आहेत.त्या बघु मला यात काही विचित्र वाटते.विचार करा.कशाला जोखीम घ्यायची.यावर गणू म्हणाला मला या जागेच्या मालक (मालकीण) ने चेलेंज दिले आहे मी कोणतेही काम आहे घेतले कि ते पूर्ण करतो.हे तुला माहित आहेच.मी उद्या निघनार आहे.तु थांब ऑफीस सांभाळ मी एकटा केस सोडवतो.यावर मंगला म्हणते मी पण येते बघू भुत काय असते.दुसऱ्या दिवशी गणू व मंगला गोव्यात पोचतात.पण त्याना अपेक्षित जागी पोहोचण्यास व पत्ता शोधण्यास खूप वेळ लागतो कारण हा वाडा खरच दाट जंगल परिसरात होता.जाड बुंध्याच्या झाडावर हिरवीगार शेवाळे साचली होती.त्यावर वेली चा गुंता भर घालत होता व भर दुपारी भयाण सावली त्या दाट झाडामूळे वाड्यावर पडत होती.मंगला घाबरली होती.पण गणू सोबत असल्यामुळे शांत होती.वाड्या बाहेर नारळ ,आंबे,फणस इ झाडें होती.वाडा चांगला दगडी बांधकामं केलेला किल्लेवजा मोठा होता बरेच दिवस कोणी राहत नसल्याने मळकट झालेला होता.लाल विटांची तटबंदी गूढतेत भर घालत होती.काही वेळात जागा मालकीण आली व सांगू लागली काही दिवसापासुन वाड्याच्या वरच्या दिवाण खाण्यातून दिवसा व रात्री अचानक आवाज येतात दिवाणखाण्यातील झोपाळा हलतो व करकर आवाज येतो.कर्कश आवाज येतात.त्यामुळे गावकरी या बाजूनं येण्या जाण्यास घाबरतात.आम्हाला हि आत जाण्यास भीती वाटते.गणू म्हणतो मी काय भुत काढणारा मांत्रिक नाही.मी काय करणार! मंगल गणूकडे आश्चर्याने पाहते.मालकीण म्हणते एवढा मोठा वाडा आहे.पण कोणीहि फिरकत नाही.सगळे उपाय केले शेवटी तुमच्या कडे आले व तुम्हाला चेलेंज केले बघू तुम्ही काय करता.तुमचे चेलेंज पूर्ण झाल्या वर बघु गणू म्हणाला पण चेलेंज काय आहे हे मंगला ला कळले नाही. गणू व मंगल ने कामं चालू केले व वाड्याची माहिती घेत होते.वाड्यात किती खोल्या आहेत .दिवाणखाना कुठे आहे.कुणाला कधी आवाज ऐकू आले,भुत कुणी बघितले याची माहिती घेतली.व त्याची भेट घेतली पण त्यांना प्रत्यक्ष भुत पहेलेला एकही साक्षीदार भेटला नाही.पण आवाज ऐकणारे अनेक भेटले.गणू (मालकीण) ला म्हणाला तुम्ही गेला नाहीत बघायला ती म्हणाली वाड्यात अंधारे जिने आहेत त्यातून एक माणुस जाऊ शकतो.लहान दरवाजे आहेत.तसेंच सध्या या अफवा मुळे आत जाण्याची हिम्मत होत नाही गणू हा प्रकार केव्हा पासून चालू झाला.मालकीण दोन महिन्यापासूनच,तुमचे कोणाशी वैर वगैरे,असे नाना प्रश्न विचारतो.गेल्या महिन्यात काहि मुले खेळत या ठिकाणी आली होती तेव्हा त्याचा बॉल वाड्यात पडला तो शोधत मुले दिवाण खाण्यात गेली तर हा आवाज ऐकून जाम घाबरली व गावात चर्चा झाली.व गावकरी हा भुताटकी चा प्रकार बंद व्हावा म्हणून वाडा पाडा असे म्हणत आहेत.गणू म्हणाला आता लाॅजवर जाऊ व रात्री वाड्यात जाऊन बघु म्हणाला सर्वांनी त्यास संमती दिली. रात्री सर्वजण वाड्या बाहेर जमले गणू वाड्याची सर्व बाजूने पाहणी केली .व प्रथम तो आत गेला बाकीचे त्याच्या मागे चालू लागले.हातात टॉर्च घेऊन गणू पुढे जात होता.वाडा जुना असल्याने वटवाघळे चित्कारत होती.घुबड घुमत होते.वातावरण गंभीर होते. सर्व जण दिवाण खाण्या बाहेर आल्यावर दिवाण खाण्यातील झोपाळ्याचा करकर आवाज अचानक आला तसे सर्व जण जाम घाबरले व अंधारात एकमेकांना बिलगले गनुने टॉर्च फिरावल्यावर मालकीनीने गणूला घट्ट धरल्याचे मंगलाने बघितले तसा गणू घाबरला व बाजूला झाला.
शेवटी गनुने हिम्मत करून दरवाजा उघडला तसें काही उंदीर घुशी वगैरे प्राणी पळाले गनुने झोपाळ्यावर पहिले तर कोणी नव्हते पण तो हवेची झुळूक आल्यावर हालत होता व त्याचा आवाज येत होता.ज्या दिवशी मुले वाड्यात आली होती त्या वेळी त्यांनी दिवाणखाण्यातील खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या त्या मूळे हवा आली कि झोपाळा हालत होता व रात्री सर्व शांत झाल्यावर झोपाळ्याचा आवाज मोठा येत होता.गनुने त्याची केस सोडावंली होती .व जागेची मालकीण हि खुश होती तिने गणू व मंगल चे आभार मानले लोकांच्या गैरसमजा मळे तयार झालेली नकली भूतांटकी पासून त्यांची सुटका झाली व त्यांनी गणू व मंगलाचे आभार मानले व गोवा ट्रिप एन्जॉय करण्यास सांगीतले.
🙏धन्यवाद कथा आवडली तर कृपया शेअर करा

Tags

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*