पैसे व वेळ वाचविणारे उपयोगी अँप्लिकेशन

Vikas Jamdade
0


वेळ व पैसे वाचविणारे अ‍ॅप

आपले बजेट तयार झाल्यावर पुन्हा बचत करणे अवघड होऊन जाते.जर आपल्याला तंत्रज्ञानांच्या साहाय्याने जर बचत करण्यात मदत झाली तर किती चांगले होईल आपल्या सर्वाकडे मोबाईल फोन आहे.त्याच्या मदतीने आपण आपली वेळ व पैसे वाचवु शकतो अश्यच काही उपायोगी अ‍ॅप बद्दल माहिती आपल्या करता,जर माहिती आवडली तर शेअर करा.🙏

1)जार (JAR)

जार हे बहुपयोगी अ‍ॅप आहे जे सर्वांच्या दैनंदिन बचतीला सोने गुंतवणूकीत बदलते.यात अ‍ॅप वापरकर्ता जेवढी बचत करतो त्यावर त्याला रिवॉर्ड मिळतो हा रिवॉर्ड म्हणजे बचत आहे.हे अ‍ॅप वापर करतना आपण दैनंदिन व्यवहार करताना ऑनलाईन पेमेंट करतो त्या वेळी प्रत्येक व्यवहार राउंड फिगर मध्ये बदलतो व काही रक्कम बचत करतो.हे अ‍ॅप एक प्रकारची पिगीबँकच आहे.यात आपली बचत शुद्ध सोने बॉण्ड मध्ये बदलते.व नकळत बचत होत राहते.

2)डिजीट 

डिजीट अ‍ॅप वापरकर्त्यांच्या बँक अकाउंट ला लिंक केल्या वर हे अ‍ॅप आपल्या मासिक खर्च व उत्पन्नाचे विश्लेषण करते व आपल्याला बचत करण्यात मदत करते.यात दर तीन दिवसाला एक निश्चित धनराशी वापरकर्त्याच्या बचत खात्यात जमा होते.हे पेड अ‍ॅप आहे.हे अ‍ॅप 2015 साली लाँच झाले.हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर 30 दिवस फ्री वापरता येते.

3)मिंट

या अ‍ॅप मध्ये आपल्या बँकिंग व्यव्हाराची प्रत्येक अपडेट वेळेवर मिळते.प्रत्येक खर्चाचे रिअल टाइम स्क्रीन शॉर्ट आपल्याला मिळतात.गुंतवणूकीचे टिप्स मिळतात.हे अ‍ॅप नवीन गुंतवणुकदारांना अत्यंत उपयोगी आहे.

4)क्लेरीटी मनी

हे अ‍ॅप आपल्याला खर्च कमी करणे व बचत वाढवन्याकरता मदत करते.गुंतवणूक कुठे करावी करू नये याची योग्य माहिती हे अ‍ॅप देते.जर आपण एक जागी जास्त गुंतवणूक करत असाल तर अ‍ॅप अलर्ट करते.तसेंच वेळोवेळी दीर्घ कालावधीची गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करते.

5)करंट 

करंट बँकीग अ‍ॅप द्वारे आपण अनेक प्रकारे वित्तिय बचत करू शकतो.यात आपण वित्तीय उद्दिष्ट्ये ठरवू शकतो.जसे सुट्टी किंवा हॉलिडे फंड ठरवून त्यात बचत करू शकतो.हि बचत ऑटोमेटिक केली जाऊ शकते.हे अ‍ॅप युवा लोकांना उपयोगी आहे यात आपण लॉगिन करणे आवश्यक आहे.

6)फोन पे

फोन पे हे भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अ‍ॅप आहे.याचे भारतात 25.80 करोड यूज़र आहेत.हे अ‍ॅप वार्षिक 277 अरब करोड रुपयाचे व्यवहार केले आहेत.हे अ‍ॅप युजर फ्रेंडली आहे.यात प्रत्येक व्यव्हारा मागे रिवॉर्ड मिळतात.व प्रत्येक व्यवहाराची नोंद होते.हे अ‍ॅप बँक किंवा upi id ला लींक असते.हे अ‍ॅप व्यापारी लोकांना ऑनलाईन व्यवहार करण्याकरता क्यु आर कोड देते.

7)गूगल पे

गूगल पे हे देखील covid 19 महामारी काळात लोकांना ऑनलाईन व्यवहार करण्याची सवय लावण्यात मोलाची भर गूगल पे ने लावली.गूगल पे हे युजर फ्रेंडली अ‍ॅप आहे.यांचे व्यवहार सुरक्षित आहे.हे अ‍ॅप प्रत्येक व्यवहारावर रिवॉर्ड देते तसेंच हे अ‍ॅप आपण आपल्या बँक खाते किंवा upi id ला लींक करून चालू करता येते.
या अ‍ॅप शिवाय आपण मनीफाय,ट्रु मनी, expence trakar,हाफ डॉलर, ट्रु बिल इत्यादी अ‍ॅप आपले पैसे व वेळ वाचवन्यात मदत करतात.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*