नमस्कार मित्रांनो ज्या लोकांना कार्टून्स बघण्याचा नाद आहे किंवा लहानपणी होता.आज लोकांना टीव्ही बघायला ही वेळ नाही.परंतु ज्यांना मिकी माऊस हे कार्टून माहीत नाही असा माणूस निराळा म्हणायला लागेल.कारण ज्या काळात मोबाईल हे उपकरण नव्हते तेव्हा टीव्ही हेच करमणुकीचे साधन होते.तेव्हा मिकी माऊस या कार्टून पात्राने पूर्ण लहान ते वयस्क माणसांना आपल्या करमातीने वेड लावले होते.अगदी लहान ते वडीलधाऱ्या माणसाच्या ओठावर हसू आणलं होत.मिकी माउस हे वाॅल्ट डिसने चे एक पात्र आहे .हे पात्र रुपेरी पडद्यावर अवतरले ते 15 मे 1928 साली.मे 2022 साली या घटनेला 94 वर्षे पूर्ण झाली.हे पात्र प्रथम क्रेझी प्लेन या कार्टून पटात मिकी प्रथम अवतरला पण तो कुणाला आवडला नाही.मिकी चे पात्र असलेला द गीली पिग हा दुसरा भाग वितरक न मिळाल्याने प्रदर्शित झाला नाही.त्या नंतर स्टीम बोट मिनी या चित्रपटात मिकी झळकला.या चित्रपटांला वितरक मिळाल्याने मिकी अमेरिकेत 18 नोव्हेबर 1928 ला झळकला.स्टीम बोट मिली हा मिकिचा प्रथम प्रदर्शित चित्रपट आहे.ह्या चित्रपटात मिकी च्या दोन डोळ्याच्या जागी दोन मोठे काळे ठिपके मिकिला मिळाले व ते आजही कायम आहेत.मिकी चा जन्म अडचणी वर मात करण्याच्या गरजेतून झाला.डिस्ने स्टूडियो खरे तर ओसवाल्ड द लकी रॅबिट हे पात्र तयार करत होते पण यांचे वितरण हक्क युनिवर्सल पिच्चर कडे होते हि बाब वाॅल्ट डिस्ने कंपनी ला डसत होती.त्या मुळे लकी रॅबिट ला पर्याय म्हणून मिकी तयार झाला.1954 साली वाॅल्ट डिस्ने यांनी म्हटले होते कि कोणत्याही साध्या गोष्टी कडे दुर्लक्ष्य करू नये.कारण मिकी चा जन्म एका उंदराच्या करामती मुळे झाला.मिकी पडद्यावर बोलला तो वाॅल्ट डिस्ने यांच्या आवाजात तो सिलसिला 1946 पर्यंत चालू होता.त्या नंतर जिमी मैकडोनाल्ड यांनी मिकिला त्यांचा आवाज दिला.1935 पासून रंगीत कार्टून फिल्म बनवणे सुरु झाल्यावर मिकी रंगीत झाला.मिकिवर पहिले कॉमिक्स बुक 1930 साली प्रकाशित झाले.2013 साली वाॅल्ट डिस्ने चॅनलवर मिकी चे सर्व चित्रपट प्रदर्शित झाले.व टीव्ही वर मिकी ने लोकप्रियतेचा कळस गाठला.1955 साली अमेरिकेत वाॅल्ट डिस्नेलॅण्ड हा भव्य पार्क उभा केला गेला जिथे हजारो लोक भेट देतात.मोबाईल च्या जगात मिकी गेम च्या स्वरूपात उपलब्ध आहे तरी सदर पोस्ट आवडली तर शेअर करा
🙏धन्यवाद