शेअर बाजारातील चांगले सेक्टर (कंपनी)
शेअर खरेदी करण्या अगोदर आपण काही माहिती लक्ष्यात घेणे गरजेचे आहे.सध्या भारतात NSC व BSE Stock Exchenge या दोन्ही मार्केट मध्ये 7400 कंपन्या लिस्टेड आहेत.आज गुढीपाडवा हिंदू वर्षाचा नववर्ष आरंभ दिन आहे.आज लोक नवीन वस्तू सोने जमीन घरे खरेदी करतात. चेत्र महिन्यात झाड फुलांना नवीन पालवी फूटते.नवीन चेैत्यन सगळीकडे असते.अश्या मंगल वातावरणात आपल्या भविष्यकाळा करता योग्य गुंतवणूक करावी.व आर्थिक नियोजनाची गुढी उभारणे आवश्यक आहे.अर्थीक पर्यायांचा विचार केला तर थेट शेअर बाजारातील गुंतवणूक करणे हा पर्याय टॉप प्रायोरटीवर ठेवावा.गुंतवणूकीसाठी किमान 10 ते 15 वर्षाचा दीर्घ कालावधीचा विचार लक्षात घ्यावा.शेअर बाजारात अनेक कंपनी आहेत त्या वेग वेगळया क्षेत्रात कामं करतात त्याची माहिती घेणे गरजेचे आहे.या शेत्राना सेक्टर म्हणतात .जसे ऑइल,वाहन,बँक,FMGC,विमा,वीज निर्मिती,तसेंच यात अनेक प्रकार पडतात जसे वाहन क्षेत्रात बॅटरी,वाहनाचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या,पुढील काळात बॅटरीवर चालणार्या वाहन तयार करणाऱ्या कंपन्या,सौर ऊर्जा निर्मिती करणारे उदयोग या सेक्टर ला चांगले दिवस आहेत किंवा त्यांना महत्व आहे.गेल्या 10 ते 15 वर्षात अश्या दिग्गज कंपनींच्या शेअर ने गुंतवणूकदारांना अनेकपट नफा मिळवून देऊन मालामाल केले आहे त्याची माहिती घेऊ जर वरील माहिती आवडली तर शेअर करा 🙏
1)ऑटोमोबाईल
हे क्षेत्र पुढील काळत चांगला परतावा देणारे आहे व या क्षेत्रातील कंपनींच्या शेअर ने चांगला परतावा दिला आहे.विशेष म्हणजे सद्या पेट्रोल व डिझेल चे भाव सतत वाढत असताना बॅटरीवर चालणार्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्याना महत्व येणार आहेत दिग्गज कंपन्या सद्या ह्यच क्षेत्रात काम करत आहेत.उदाहरण,महिंद्रा,टाटा,हिरो,बजाज,tvs,
2)केमिकल
या क्षेत्रात देखील सतत वाढ होत आहे.घरगुती व औद्यागिक पेंट ,शेती खते,फवारणी औषधे,कॉस्मेटिक्स,सेनेटरी,उत्पादन कंपन्या चांगला रीटर्न देत आहेत.केमिकल क्षेत्रात एशियन पेंट,गुजरात केमिकल,आरती इंडस्ट्रीज,
3)आय टी
सॉफ्टवेयर क्षेत्र हे जागतिक पातळीवर वाढ होणारे क्षेत्र आहे.तसेंच जागतिक अर्थव्यवस्था या क्षेत्रा मूळे वाढत आहे.सद्या सर्व उदयोग किंवा व्यवसाय आय टी शेत्रा वर अवलंबून आहेत यात TCS, विप्रो,इन्फोसिस,टेक महिंद्रा,इत्यादी कंपन्या भारतात कार्यरत आहेत.
4)एनर्जी
हे क्षेत्र सर्व लोकांचे तसेंच उद्योगाची दैनंदिन गरजेची वीज निर्माण करणारे आहे.वीज हि सर्वाच्या गरजेची आहे त्यामुळे ह्या उद्योगात संधी आहेत व या क्षेत्रातील कंपन्यानी चांगला परतावा दिला आहे.तसेंच सौर ऊर्जा निर्मिती करणारे उदयोग यापुढे चांगला परतावा देऊ शकतात. यात tata power, रीलायन्स, अदानी ग्रुप, suzlon energy ह्या कंपनीं कार्यरत आहेत.
5)FMGC
फूड प्रोसेसिंग करणारे उद्योग,तसेंच ग्राहकाना लागणाऱ्या वस्तू तयार करणारे सेक्टर म्हणजे fmgc जशी लोकसंख्या वाढेल तशी मागणी वाढत जाते त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या चांगला परतावा देत आहेत.उदा,हिंदुस्थान uniliver,गोदरेज,tata cansumar
6)NBFC
नॉन बँकिंग फायनांस हे गेल्या अनेक वर्षांपासून वाढले आहे.मुळ बँकिंग सोडून इतर अनेक सेवा देण्याकरिता या कंपन्या कामं करतात.ग्राहकांना कर्जे देणे, सोने तारण कर्ज,विमा विकणे या क्षेत्रातील कंपन्या उदा,बजाज फायनांस, बजाज फीनसर्व, tata कॅपिटल,icici,