बचतीचे सुरक्षित पर्याय
प्रत्येक माणुस आपल्या आयुष्यात बचत करतो.बचत करावी हि अगदी बाल पनापासून करतो.गल्ला (पिगी बँक) हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.आदिम काळापासून मनुष्य हा बचत करत आहे परंतु काळ परत्वे बचतीचे स्वरूप बदले आहे.व बदलत आहे.पूर्वी सोने चांदी संग्रह करण्याकडे लोकांचा कल होता आज लोकांना बचत करण्याचे अनेकविध मार्ग उपलब्ध आहेत त्याची माहिती घेऊया आवडल्यास शेअर करा व कॉमेंट करा.🙏
1)फिक्स डिपाॅझीट (Fix Deposits)
आपल्या देशात बचत करण्याचा फिक्स डिपाॅझीट(F.D)हा प्रथम क्रमांकाचा पर्याय आहे.भारतातील बँका लोकांकडून पैसे घेऊन त्यावर व्याज देतात.हे व्याज मासिक,तिमही,किंवा वार्षिक असते F. D प्रकारात अनेक प्रकार आहेत.तसेंच बँकावर RBI चे नियंत्रण असल्याने लोकांचा बचत करण्याची पहिली पसंती F.D हिच आहे.तसेंच FD वर बँका 5 लाख रुपयाचे विमा संरक्षण देते.FD च्या व्याजाचा सध्याचा दर हा वार्षिक 5 % इतका आहे.
2)मॅच्युअल फंड(muchul fund)
या प्रकारात macul फंड जारी करणाऱ्या संस्था अनेक लोकांकडून पैसे गोळा करून त्या एकत्रीत रकमेची गुंतवणूक शेअर बाजारात करतात.व त्याचा फायदा लोकांना मिळवून देतात.macual फंडाचे प्रकार पुढीलप्रमाणे.
🔴इक्विटी फंड - या प्रकारात लोकांच्या गोळा केलेल्या पैश्याला जास्त करून इक्विटी शेअर मध्ये गुंतवते हि गुंतवणूक हाय रिस्क प्रकरात असते.यामुळे शेअर धारकाचा तोटा होऊ शकतो.
🔴डेब्ट फंड - या स्कीम मध्ये गुंतवणूक धारकाचे पैसे सरकारी कंपनी,सरकारी रोखे,कार्पोरेट लोन स्कीम मध्ये गुंतवणूक करतात हा प्रकार सुरक्षित असतो व फायदेशीर असतो.व जोखीम कमी असते.
🔴बेलेन्स फंड - या प्रकारात इक्विटी फंड व डेब्ट फंड या दोन्ही फंडात गुंतवणूक केली जाते.कारण जास्त फायदा मिळवणे हे या फंडाचे वैशिष्ट आहे.
🔴मनी मार्केट म्युचुल फंड - याला लिक़्विड फंड म्हणतात.हे फंड कमी कालवधीचे असतात. यातील गुंतवणूक कमी कालावधी करता असते.उदा.deposit certificates,ट्रेजरी पेपर इत्यादी
🔴गिल्ट फंड - हा प्रकारात लोकांचा पैसा हा सरकरी कंपन्यात
गुंतवला जातो त्या मुळे पैसा सुरक्षित राहतो व सरकारी नियत्रंण असल्याने कंपन्या बुडत नाहीत.हा फंड सुरक्षित असतो.
3)lic ची चिल्ड्रन मनी बॅक पाॅलेसी
lic ची चिल्ड्रन मनी बॅक पाॅलेसी हि गुंतवणूक करण्यासाठी चांगला पर्याय आहे.जन्मा पासून ते 12 वर्षापर्यन्त च्या मुला करता हि पॅालेसी आहे.कि जी मुलाच्या 25 वर्षी परिपक्व होते व मुलाच्या शिक्षण लग्न किंवा व्यवसाय करण्याच्या वयात त्यांना भांडवल किंवा निधी उपलब्ध होतो.18,20 किंवा 22 वर्षी 20% मनी बॅक मिळतो हि रक्कम करमुक्त असते.या पाॅलेसी वर कमीत कमी 100000 रकमेचे विमा कव्हर असते.जर पाॅलेसी धारकाचा मुर्त्यू झाला तर पाॅलेसी चे सर्व लाभ मिळतात.
4) पी पी एफ (PPF)
हि भारत सरकार ची महत्वपुर्ण योजना आहे.या योजनेमध्ये भारतातील कोणताही नागरिक समाविष्ट होऊ शकतो.यात समाविष्ट होण्या करता ppf खाते कोणत्याही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफीस येथे खाते काढावे लागेल.किमान दरमहा किमान 500 रु भरून यात आपले खाते काढता येते.या खात्या ची मुदत 15 वर्ष असते.यावर चांगले व्याज मिळते.वार्षिक 150000 इतकी रक्कम आपण भरू शकतो.मे 2022 महिन्यात या खात्या वर 7.5% इतके व्याज दिले गेले.कलम 80 अंतर्गत या खात्या वर इन्कम टॅक्स सूट मिळते.आलं. एक वर्षा नंतर या खात्या वर आपण कर्ज घेऊ शकतो.
5)सुकन्या समृद्धी योजना
हि योजना भारत सरकार पुरस्क्रुत आहे हि योजना मुली करता वरदान आहे.मुलीच्या भविष्यकाळातील शिक्षण, लग्न,या करता 10 वर्षा पर्यंत च्या मुली च्या नावे हे खाते काढता येते.बेटि बचाओ बेटी पढाओ या योजने अंतर्गत हि योजना चालु केली गेली यात वार्षिक 150000 रु भरता येतात व या खात्यावर इन्कम टॅक्स सूट देण्यात येत आहे. या वर वार्षिक 7.6% व्याज दिले गेले आहे.