नमस्कार मित्रांनो आज 20 मे 2022 हा दिवस जागतिक मधमाशी दिवस ,आज आपले पर्यावरण जे टिकून आहे ते निसर्गातल्या असंख्य कीटक व जीवामूळे कारण त्यांच्या कार्या मूळे हे वातावरण टिकून आहे.जर मध माशी नसली असती तर पिकाचे परगीभवन झाले नसते जर परगीभवन झाले नसते तर काही पिकले नसते व तमाम सजीव (मानव) कसा जगला असता.कारण मध माशी मध गोळा करण्याकर्ता अविरत फिरते व असंख्य फुलांना भेट देते व परगीभवन करते कारण तिच्या पायाला परागकण चिटकतात व ते इतर फुलात पसरतात.एक मध माशी दिवसभर सुमारे 40 हजार फुलांना भेट देते.हे मानव जातीवर तिचे उपकार आहेत.दत्त गुरूंनी देखील मधमशी ला आपले गुरु मानले आहे यावरून तिचे महत्व कळते.मध माशीने तयार केलेला मध कधी खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही हे हि निसर्गाचं आश्यर्य आहे.मध हा आरोग्य वर्धक असतो.तसेंच सर्वाना आवडतो.मध खोकल्यावर गुणकारी आहे.
1)मधमाशी चे जीवन
मधमाशी चे जीवनविश्व फारच रंजक आहे.मध माशीचे जीवन तिच्या पोळ्या भोवती फिरते.पोळा म्हणजे तिचे घर त्यात एक राणी माशी असते जीचा थाट असतो.माश्या मध्ये कामंकरी माशी,रक्षक माशी असा प्रकार असतो.नर व कामंकरि माश्या पेक्ष्या राणी माशी तिस पट जास्त काळ जगते.नर व कामकरी माशीच्या 30 पिढ्या संपल्यावर राणी मशिचे एक आयुष्य संपते.जसे नदिचे पाणी दर क्षण बदलते तसें मधमाशी पोळ्यातील माश्यांचे आयुष्य दार महिन्याला एक पिढी संपून दुसरी पिढी तिची जागा घेते.
2)मधमाशीचे प्रकार
A) एपिस मेलिफेरा
हि भारतीय मधमाशीचा प्रकार आहे.हि माशी काटक असते कमी घातक असते.हि स्वतःहून स्थानांतरित होत असते.व आपली जागा बदलत असते.अडचणींच्या ठिकाणी अंधाऱ्या जागी वास्तव्य करते.या मधमाशीच्या एका कुटुंबा पासून 8 ते 19 किलो मध मिळतो.
🐝वसाहत प्रकार
1)राणी माशी -1 ,आयुष्य 2 ते 3 वर्ष
2)कामकरी माश्या -12000 ते 15000 ,आयुष्य 21 दिवस
3)नर माशी - 20 ते 200 ,आयुष्य 24 दिवस
4)मध उत्पादन -प्रति वर्ष 8 ते 10 किलो मध तयार करतात
B)एपिस सेरेना इंडीका
हि युरोपियन माशी आहे हि स्वतःहून स्थानांतर करत नाही. हिचे बॉक्स मध्ये पालन करता येते.हिला कायम फुलोरा लागतो.मुख्यत व्यवसायिक तत्वावर मध उत्पादन करण्याकरता या जा मधमाशीचा वापर होतो.या मधमाशी पासून वार्षिक 20 ते 40 किलो मध उत्पादन होते.
🐝वसाहत प्रकार
1)राणी माशी-1 आयुष्य -2.5 वर्ष
2)कामंकरी माशी -50 ते 60 हजार,आयुष्य -60 दिवस
3)नर माशी -100 ते 1000 आयुष्य-32 दिवस
4) उत्पादन -वार्षिक 20 ते 40 किलो
धन्यवाद पोस्ट आवडली तर कृपया शेअर करा.🙏