कॉफी टेबल अनोखा प्रेमभंग प्रेमकथा
एक महिना झाला होता विजय केफे मध्ये गेला नव्हता.मिताली जशी दूर गेली तसा त्याने केफे मध्ये जाणं सोडून दिले होते.तसा तो मार्केटिंग जॉब करत असल्याने आठवडा भर बाहेर राहत असल्याने तो व मिताली दर वेळी भेटन्याचे ठिकाण हे केफे होते.त्याचा ठरलेला टेबल,ठरलेला वेटर, ठरलेली कॉफी व ठरलेली वेळ होती.सर्व ठरलेले नियोजित होते.पण विजय तास दीड तास उशिरा यायचा मिताली वाट बघून वैतागुन जायची.कारण विजयचा जॉब तसच होता त्यामुळं त्याचा नाईलाज व्हयचा.वेटर असलेला गणेश हे सर्व पाहत होता.व विजयला वारंवार समजावून सांगत होता.पण विजयचे उशिरा येणे थांबले नाही.पण आज विजय कसंकाय लवकर वेळेवर आला व गणेशने हि दोन कॉफी कप टेबलवर आणून ठेवले.पण आज मिताली विजयबरोबर नव्हती.तो एकटाच होता.विजयला गणेशला काय सांगावे हे कळत नव्हते,आपले ब्रेकअप झाले आहे ?कि मिताली आपल्याला सोडून गेली आहे हे सांगावे हे कळत नव्हते.गणेश शांत होता विजय म्हणाला आज ती येणार नाही आज एकच कप कॉफी दे.विजयला गणेशशी बोलण्याची इच्छा नव्हती त्याने खुनेने त्याला.सांगितले गणू त्याला म्हणाला आज कॉफी माझ्या कडून गणेश म्हणाला मला आपल्याशी काही बोलायचे आहे.विजयला आश्चर्य वाटले कारण इतकी महाग कॉफी हा का पाजत आहे किंवा याला आपल्याला काय बोलायचे आहे कारण मिताली गेल्या पासून त्याने ब्रेकअप विषयी कोणाशी चर्चा केली नव्हती.मिताली ला आपण किती फोन केले मेसेज केले तिने रिप्लाय दिला नाही उलट त्याचा नंबर ब्लॉक केला.तिने आपला निर्णय बदलला नाही.शेवटी वैतागून त्याने प्रयत्न सोडून दिले. त्याला थोडा आधार वाटला.गणेश त्याच्या समोर बसला विजयने त्याला विचारले ती आली होती का या आठवड्यात?गणेशने नाही म्हटले.विजयला तिच्या आठवणी अनावर झाल्या होत्या ती चे हसणे टेबलवर ठेवलेल्या बाईकच्या चावी बरोबर खेळणे,ती त्याला दर आठवड्याला नवीन किचन भेट द्यायची,तिचे त्याचे हात हातात घेऊन भविष्य बघणे,त्याच्या डोळ्यात टक लावून बघणे,लघवी बोलणे,भावी भविष्यातल्या गोष्टी ठरविणे, त्यावर तासंतास चर्चा करणे सर्व आठवत होते.तो भावुक झाला होता गणेश त्याला काही बोलणार एवढ्यात विजय म्हणाला मला सिम्फति दाखवु नको.माझे बरे चालू आहे कुणाच्या जाण्याने आयुष्य संपत नाही.मला तिची गरज नाही.सर्व मुली अश्यच बेवफा असतात.बरे झाले मी लवकर सावरलो.विजयने कॉफीचा हिशेब काढला जवळ जवळ दीड वर्ष तो आणि मिताली दररोज त्या केफे मध्ये कॉफी पिण्यास येत होते.बिलचा हिशेब केला तर लाख रुपये खर्च झाला होता.त्यात एक बाईक सहज आली असती. मुले हळवी असतात मुली कठोर असतात असं विजय बडबडत होता.अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आले.गणू अस्वथ झाला.मिताली व विजय त्या टेबलवर तासंतास बसत बोलत,भांडत,मध्येच विजय रागवून बाहेर जात असे तेव्हा गणेश त्याला बोलाविण्याकरता जात असे.गणेशच्या हातची कॉफी दोघांना आवडत होती.जेव्हा विजयला यायला उशीर होत असे तेव्हा गणेश मिताली बरोबर बोलत असे.तिला वाचावयास काही तरी आणून देत असे.त्याच्या मोबाईल वरचे गमतीशीर व्हिडीओ तिला दाखवत असे.त्यामुळे मितलीला विजयची वाट बघणे सुसह्य होत असे.विजय आल्यावर मात्र गणेश तिकडे फिरकायचा नाही.पण दोघे कोणत्याहि करणा करता गणेशला बोलवत असे.मितालीला जर विजयचा शर्टाचा रंग आवडला नाही तर दोघे तंटा सोडावंन्यास गणेशला बोलावत त्यावेळी गणेश पेचात सापडे ?परंतु गणेशचे उत्तर मितालीला अपेशित असेल असंच असायच.यावेळी विजय संतापुन म्हणे हा आपले बोलणे चोरून ऐकतो.तिघे हसून विषय बदलून टाकत परंतु दोघांचीही भांडणाचा तो साक्षीदार असायचा.विजयने कॉफी संपवली व म्हणाला सर्व मुली अश्याच असतात.मला वाटलं कॉफी पिण्यास कधी तरी येईल ती इथे पण आजही आली नाही.सांग गणेश माझ्यात काय कमी आहे ज्यामुळे तीने मला नकार देऊन सोडून दिले.तिच्या साठीच एवढी धावपळ करत होतो पैसे वाचवत होतो.फक्त वेळ देऊ शकलो नाही तिला. तिला कदर नव्हती काय मिळालं मला दुःख देऊन ती कधी सुखी होणार नाही.तिला एखादा मूर्ख नवरा मिळेल व तो तिला किती वेळ देईल.एक मिनिट हि देणार नाही.गणेशने दोघांचे कॉफी कॅप उचलले व विसळुन ठेवले.व दुसरी ऑर्डर घेण्यास गेला.विजय एकटाच बसला होता तो बाहेर बघत होता इतक्यात त्याला बाहेर मिताली दिसली.तो घाईत बाहेर आला व मिताली समोर जाऊन उभा राहिला.मिताली त्याला पाहून हैराण झाली.
विजय तिला रागाने बोलू लागला.हात जोडू लागला विनंती करू लागला.तो थोड्या वेळाने भानावर आला तेव्हा त्याचे लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रा कडे गेले तो अस्वस्थ झाला.तो हैराण होऊन बघत राहिला.दोन आठवडे झाले लग्नाला तु नेहमी उशीर करत होता या वेळीही उशीर केला.नेहमी मी एकटीच तुझी वाट असायचे त्या वेळी गणेश माझी वेळोवेळी काळजी घ्यायचा माझ्या कडे लक्ष द्यायचा एकट वाटू द्यायचा नाही.बोलत रहायचा हळूहळू लक्ष्यात आले तो किती काळजी करतो माझी.त्यामुळे मी त्याला विचारले लग्न करशील माझ्याशी सुरवातीला त्याने साफ नकार दिला.तो तुझा विचार करत होता पण मी म्हंटल विजयचा विषय माझ्या करता कायमचा संपला आहे.तु फक्त माझा विचार करून तुझा निर्णय सांग .तो म्हणाला मी तुला कॉफी पाजू शकतो फक्त घरात त्यावर मी म्हणाले मला तरी कुठे केफेत आयुष्य काढायचं आहे.मला फक्त माझ्या करता वेळ काढणारा जोडीदार पाहिजे.जॉब काय मी पण करतेच कि आता.
मिताली घरून गणेशला आणलेला जेवनाचा डबा देण्याकरिता केफेत गेली.विजय तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिला.विजयचा मोबाईल वाजला विजयची महत्वाची मिटिंग होती.आता विजयला वेळेचं महत्व कळलं होत.त्याला मिटिंग वेळेवर जॉईन करायची होती त्याने बाईकला किक मारली व धूम निघाला.कारण त्याला वेळेची किंमत कळायला फार मोठी किंमत चुकवली होती!
🙏 धन्यवाद
वरील पोस्ट आवडली तर शेअर करा 🙏