अग्निवीर योजना
ग्रामीण व शहरी भागातील तरुण मुलात एक धाडस असते.ते आपले आयुष्य घडावे म्हणून धडपडत असतात. कठोर परिश्रम करण्याची त्यांची तयारी असते.आणि त्यांच्यात शारीरिक सामर्थ्य असते.परंतु त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे ते मोठ्या शहराकडे आकर्षित होतात व आपले गाव सोडून नोकरी करता शहरात जातात.ज्यांना शहरात जाणे जमत नाही ते मोबाईल वर वेळ घालवतात. व बेरोजगार राहतात.कारण लहान गावातील अर्थकारण लहान असल्याने व्यवसाय व नोकरीच्या संधी कमी तयार होतात.शिक्षन पूर्ण करून जर योग्य संधी मिळाली नाही तर स्वतःच्या पायावर कसे उभे राहणार.आपले आयुष्य कसे घडवनार.अश्या तरुणांना संधी देण्याकरता मा. प्रधान मंत्री श्री.मोदी साहेबांनी तरुणांना एक नवी संधी अग्निवीर या महत्वाकांक्षी योजना आणली आहे. त्यावरून सद्या संपूर्ण देशात गदारोळ मजला आहे.व विरोध केला जात आहे.केंद्रीय संरक्षण दलात नोकरी करून देश सेवा करणे प्रत्येक भारतीय माणसाचे स्वप्न असते.जे अग्नीवीर योजना पूर्ण करणार आहे.
अग्नीवीर योजना आहे काय?
17 ते 21 वयोगटातील तरुण मुलांना सैन्य दलात भरती व्हायचे आहे त्याची शैक्षणिक पात्रता,वैद्यकीय तपासणी,आणि शारीरिक चाचणी पूर्ण केल्यावर त्यांना सैन्यात भरती केले जाईल व त्यांना प्रशिक्षण देऊन नंतर त्यांना 4 वर्ष सैन्यात नोकरींची संधी मिळेल.या काळात त्यांना दरमहा 30 ते 40 हजार वेतन मिळेल तसेच त्यांच्या वेतनातुन काही रक्कम कपात केली जाईल त्यात सरकार आपला काही निधी घालून चार वर्षानंतर बाहेर पडताना अग्निवीरांना 11 लक्ष 71 हजार रुपये सेवा निधी म्हणून मिळेल.या कळात अग्नीवीराना प्रशिक्षण मिळेल व त्याच्या अंगी शिस्त लागेल व ते फिट राहतील.व त्यांना इतर ठिकाणी नोकरीच्या संधी मिळतील.
ग्रामीण भागतिल युवकाच्या नजरेतून हि एक सुवर्ण संधी आहे ऐन उमेदिच्या काळत बेकार राहण्यापेक्षा,मोबाईल वर टाईमपास करण्यात,किंवा निवांत राहण्यापेक्षा अग्निवीर होणे केव्हाही चांगले.कारण चार वर्षा नंतर पंचवीसाव्या वर्षी तरुणांना बारा लक्ष रुपये मिळतात व तो नंतर आपला स्वतंत्र व्यवसाय करू शकतो किंवा बँक किंवा अन्य संस्था मध्यें नोकरीं करू शकतो.तसेंच महिंद्रा ग्रुप चे आनंद महिंद्रा यांनीं 10 % कोटा अग्नीवीराना जाहीर केला आहे.तसेंच जर अग्निवीरांना लष्करात पुढे सेवा करायची असेल तर 25% तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल.त्यांना लष्कराशी सबंधीत हिन्दुस्थान अरोनिटिक ,भारत इलेक्ट्रोनिक,व. 16 अन्य सरकारी उपक्रमात कामं करण्याची संधी मिळेल.तसेंच या संस्थात 10 % जागा आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आसाम रायफल,कोस्ट गार्ड,केंद्रिय दले,यात नोकरीच्या संधी मिळेल.संधी नाही म्हणून हताश होणे,किंवा निवांत बसने,मोबाईल वर टाइमपास करणे,या पेक्ष्या अग्निवीर होणे कितीतरी पट चांगले नाही का?
धन्यवाद 🙏