ब्रेकअप लव्ह स्टोरी

Vikas Jamdade
0


ब्रेकअप सेलिब्रेशन अर्थात प्रेमभंग दिवस पार्टी

मंगला व विजय हि जोडी जगावेगळी अनोखी आहे.हे तुम्ही मागील ब्लॉग मध्ये बघीतले अहेच.आता त्यांची नवीन कहाणी बघू.मंगला व विजय दरवर्षी आपला ब्रेकअप डे साजरा करतात.केक कापून ,गप्पा मारून,हसत खेळत लोकांना यांचे कुतुहल वाटते व हसू येते त्यांच्या अश्या वागण्याचे. पण ते लक्ष देत नाहीत त्यांच्यां कडे दरवर्षी ते वाट बघतात 26 जून ची आपला ब्रेकअप डे सेलिब्रेट करण्याकरता त्याचे कारणच मोठे रंजक आहे.
मंगला खूप दिवसापासून विचार करत होती घर महत्वाचे का प्रेम यात ती द्विधा मनस्थितीत होती.आपले आई वडील कि प्रियकर यात कोणाला महत्व द्यायचे हे समजत नव्हते.कारण विजय तिला खूप जपायचा जीव लावायचा पण तो गरीब होता व ती मोठया पुढार्याची मुलगी सधन घरची !काहीही झाले तरी आपल्या घरचे विजयला जावई म्हणून स्वीकारायला तयार होणार नहीत हे तिला माहित होते.तरीही ती मागील दोन वर्षा पासून विजयच्या बरोबर होती.पण या आधी कधी तिच्या मनात हा विचार आला नव्हता कारण दहा दिवसा पुर्वी तिची मामे बहिणीने पळून जाऊन लग्न केले होते.त्यावेळी मंगलाचे वडील व पाच सहा लोकांना घेऊन बहिणीला शोधण्याकरता जंग जंग पछाडत होते त्यांना पक्की खबर मिळाल्यावर ते कर्नाटकात गेले व मुलाला जबर मारहाण करून मुलीला परत घरी आणले.
व पुन्हा तिने त्या मुलाला फोन केला तर त्याला जिवंत ठेवनार नाही असे तिला बाजावले व तिचे घाईत लग्न जमवले हे बघुन तिचे अवसान गळाले ती टेन्शन मध्ये आली.हि गोष्ट तिने विजयला सांगायची ठरवली. व विजयच्या भावी भविष्याकरता तिने विजयला नकार देण्याची मानसिक तयारी केली.उया ती विजयला भेटण्याकरता ती त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जाणार होती दोघे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या खडकाजवळ भेटनार होते.भर उन्हात ती व विजय तासंतास गप्पा मारत खडकावर बसत.आज ते पुन्हा भेटले विजय तिच्या वर थोडा नाराज होता कारण ती गेल्या पंधरा दिवसापासून त्याला भेटत नव्हती व त्याचा फोन घेत नव्हती.परंतु थोड्या वेळात त्याच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या.जोडपं बसले म्हणजे त्यांच्या कडे येणारा गजरा विकणारा,पॉपकॉर्न विकणारा आला त्यांनी त्याच्या कडून वस्तू घेऊन त्याला कल्टी मारली.पॉपकॉर्न खात ते गप्पा मऊ लागले.मंगलाने मुख्य विषय काढून त्याला सरळ नकार दिला व पुन्हा भेटू नकोस असे स्पट बजावले.तो अचानक आलेल्या नकारामुळे गडबडून गेला.त्याला दिवसा तारे दिसलें.तिने त्याला मावस बहिणीचा किस्सा सांगितला व आपले प्रेम सफल होणार नाही घरचे तयार होणार नाहीत हे बाजावले.तसेंच आपले हित वेगळे होण्यात आहे असे समजावत राहिली.विजयने त्यांच्या भविष्याकरता बंगलोर येथे जॉब पहिला होता व तो तिला पळवून बंगलोरला जाणार होता त्याचा प्लॅन तयार होता पण बंगलोर म्हणल्यावर तिच्या पाया खालची वाळू सरकली कारण बंगलोर कर्नाटकात आहे व आपण सहज पकडले जाऊ हे तिला माहित होते.वडील आपल्याला सहज पकडून विजयला मारहाण करतील त्याचा राग तिला माहित होता.ते जरी पुढारी असले तरी ते पुरोगामी विचाराचे होते.मंगलाला चांगले मार्क पडून तिला चांगल्या कॉलेजमधे ऍडमिशन मिळाले होते तरी वडिलांनी घराजवळच्या कॉलेजामधे तिचे ऍडमिशन केले.मंगला घरच्यांच सर्व ऐकत असली तरी तिने एक गोष्ट घरच्याच्या विरोधात केली ती म्हणजे प्रेम विजयच्या डोळ्यात पाणी आले होते कारण मंगलाच्या नकाराचे कारण त्याला समजले होते.तो भावुक झाला होता.त्यालाहि परिस्थितीचे गांभीर्य कळाले होते.त्याने तिचा नकार मान्य केला होता.दोघांनीही आपल्या मोबाईल मधील फोटो, चॅटिंग,डिलीट केल्या दोघे अचानक रडू लागले व खूप वेळ रडत राहिले त्यांना खूप काही आठवत होते चोरून भेटणे,रात्री चॅटिंग करणे, पहिला प्रपोज,या सर्वात वेळ कसा निघून जात होता त्यांना कळले नाही.नेमका तो दिवस भरतीचा होता. समुद्राने रौद्ररूप धारण केले होते.पाणी किनाऱ्यावर वाढत होते किनारा पाण्याने वेढला होता.ते दोघे एवढ विसरले होते कि ते आता किनाऱ्या पर्यंत जाऊ शकत नव्हते कारण समुद्राने आणि त्यांची वाट अडवून धरली होती.त्याच्या मनाप्रमाणे समुद्र अशांत होता.ती घाबरली.किनारा लांब होता व पाण्यातून जाणे म्हणजे आत्महत्या केल्या सारखे होते ते दोघे खडकावर वर सरकत होते व काही मदत मिळते का पाहत होते किनाऱ्यावरिल लोक त्यांना पाहत होते ओरडत होते पण मदत न करता त्याचा व्हिडीओ मोबाईल मध्ये शूट करत होते.थोड्या वेळात खूप गर्दी जमा झाली.व मीडिया वाले हि त्यात सामील झाले.त्यातील काही समजदार लोकांनी NDRF ला फोन केला व सुरु झाले त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन विजय ला त्याच्या पेक्ष्या मंगलाची काळजी वाटत होती व भीती समुद्रा पेक्ष्या लोकांच्या मोबाईलची वाटत होती.दोघे चेहरे लपवत होते पण ते मोबाईल व टीव्ही चॅनल मुले राज्यातिल ब्रेकिंग न्युज झाले होते.त्यांना सर्व जण ओळखत होते.त्यांना यशस्वी पणे किनाऱ्यावर आणले गेले.टीव्ही मूळे दोघाच्या घरचे त्यांना घेण्याकरिता आले होते मंगलाच्या वडिलांनी तिला गाडीत बसवले ती धस्ताउन गाडीत बसली.व निघून गेली.मंगला घरी कोणाच्याही नजरेला नजर देऊ शकत नव्हती. वडिलांच्या राग तिला माहीत होता.आपल्या बहिणीप्रमाने आपली हालत होईल असे तिला वाटत होते.परंतु झाले वेगळे तिच्या व विजयच्या घरच्यांनी बातमी पाहून त्यांचे लग्न पक्के केले होते.व तारीख काढण्याकर्ता बोलणी करत होते.तिला हे एक स्वप्न वाटत होते.कारण त्याचे व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाले होते.जसं समुद्र सर्व गोष्टी पोटात घेतो त्या प्रमाणे वडिलांनी त्याचे प्रेम नाईलाजाने पोटात घेतले होते.काही दिवसाने मंगला विजयचे लग्नं झाले परुंतु त्यांना लग्न तारीखेचे  काही अप्रूप वाटत नाही त्यांना आयुष्यभर आठवणीत राहिली.26 जुन हि तरिख कारण ते करायला गेले होते ब्रेकाअप पण त्यादिवशी खऱ्या अर्थाने ते कायमचे जवळ आले.ते दरवर्षी न चुकता त्यात समुद्रकिनारी खडकाजवळ केक आणून त्याच्या एक होण्याचा दिवस साजरा करतात व समुद्राला धन्यवाद देतात.पण यावेळी समुद्र त्यांना कितीतरी शांत वाटतो.....
धन्यवाद वरील ब्लॉग आवडला तर कुपया लाइक व शेअर करा 🙏👉हा लेख आपल्याला आवडेल कॉफी टेबल एक प्रेम कथा
Tags

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*