बाजी पासलकर हे छ्त्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पहिले सेनापती होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्याचे समवयस्क सवंगडी त्यांच्यासोबत होते त्यात बाजी पासलकर , कान्होजीं जेधे,तानाजी मालुसुरे,सूर्याजी मालुसुरे,येसाजी कंक ,सोनोपंत डबीर, हे होते.बाजी पासलकरांनी स्वराज्याचे पहिले युद्ध लढले व त्यात आपले प्राण अर्पुण स्वराज्याच्या उभारणीला आपला हातभार लावला.
बाजी पासलकर हे बारा मावळामधील प्रसिध्द नाव होते.मोठे वतनदार देशमुख होते.मावळामधील मोसे व निगडी हि दोन मोठी गावे व मावळामधील तब्बल 84 खेडी त्याच्या वतनदारीत होती.बाजी अत्यंत शूर,कसलेले योध्ये होते.ते न्याय दानात हि उत्तम होते.ते भांडण तंटे सोडवत.ज्या वेळी जिजाऊ व शिवाजी महाराज पुण्यात आले त्या वेळी त्यांनी कसंब्यातील झांबरे पटलाची जागा घेऊन तेथे लाल महाल बांधला.पुणे व मावळ परिसरातल्या लोकांना जिजाऊ व शिवाजी राजांनी एकत्र केले व बाजी पासलकर यांनी त्यांना युद्धकला, तलवार चालवने, दांडपट्टा,घोड सवारी इ युद्ध कौश्यल्य शिकवले.बाजी पासलकर यांनी बाळ शिवाजीना पूर्ण पुणे, मावळ,सह्याद्री डोंगरदर्या,व परिसर फिरून माहिती करून दिला.शिवाजी राजांनी मावळामधील एक एक किला काबीज करण्यास सुरवात केली.तोरणा त्या नंतर सुभान मंगल,व रोहिडा काबीज केले.विजापूरचा आदिलशहाच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा वाढत होता.शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी ऐकुन आदिलशहा बेचेन होत होता.शिवाजी राजांच्या बंदोबस्त करण्यांकरता आदिलशहाने सन 1648 साली फत्तेखान याला धाडले.फत्तेखानाने जेजुरी जवळील बेलसर गावाच्या परिसरात आपला तळ ठोकला.खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभान मंगल किल्ला हल्ला करून ताब्यात घेतला.माराठ्याचा हा पहिला पराभव होता.शिवाजी राजांनी कावजी मल्हार यांना सुभान मंगल किल्ला काबीज करण्यास पाठवले.त्यांनी एका रात्रीत हा किल्ला काबीज केला त्यांच्या बरोबर बाजी पासलकर,येसाजी कन्क,बाजी जेधे,गोदाजी जगताप यांनी मोठा पराक्रम करून हा किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला.त्या नंतर फत्तेखानाचा सरदार मुसेखान याने पुरंदर वर हल्ला केला व पुरंदर किल्याला वेढा दिला.गडाजवळ मुसे खान व मराठी सैन्यात लढाई झाली.बाजी पासलकर व गोदाजी जगताप यांनी गनिमाची कत्तल केली.गोदजी मुसाखानाला भीडले व त्याचे छाताड फाडले.मुसे खान पडल्यावर फत्तेखान व त्याचे सैन्य घाबरून पाठ दाखवुन पळाले.बाजी पासलकर त्यांचा पाठलाग करू लागले.सासवड येथे बाजींनी खानाला गाठले.आणि हाणामारी कपकापी झाली.बाजी तरुणांना लाजवेल अश्या त्वेशात तलवार चालवत होते.बजीच्या रौद्र रुपाला पाहून फत्तेखानाने सैन्याला फक्त बाजीना लक्ष्य करण्यास सांगितले.मारेकरी बाजीवर सोडले.लढाईत बाजी गनिमांच्या चारी बाजूनी घेरले गेले त्यांच्या पाठीवर एक वार झाला.बाजी अश्याहि स्थितीत लढत होते त्यांच्या उजव्या हातावर वार झाला बाजी वार करणाऱ्याचा प्रतिकार करण्यांकरता हात वर उचलला गनिमाने बजिच्या छातीवर वार केला त्याच वेळा 65 वर्षाचे बाजी पडले.त्यांना होतात्म्य आले.कावजी मल्हार यांना हि बातमी कळताच ते धावत आले व त्यांनी बाजी पासलकर यांना पालखीत बसवले व पालखी सासवडहुन शिवाजी राजांना अखेरचे भेटण्याकरता बाजी आपला प्राण कंठाशी आणून पुरंदरच्या दिशेने निघाले.पुरंदराच्या पायथ्याजवळ राजे बाजींना भेटण्याकरता स्वतः आले.शिवाजी राजांच्या मांडीवर डोके ठेऊन बाजींनी आपला प्राण लिन केला.मराठयानी आपला पहिला रन संग्राम जिंकला परंतु बाजी सारखा सेनापती गमावला.बाजी पासलकरांनी मराठी इतिहासात आपले गौरवपुर्न स्थान निर्माण केले तो दिवस होता.24 मे 1649.