श्री क्षेत्र रामलिंग पर्यटनस्थळ माहिती

Vikas Jamdade
0
प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील पांगरी गावातील रामलिंग हे देवस्थान आहे.निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत हे पुरातन मंदिर वसले आहे.हेमांडपंथी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.उस्मानाबाद जिल्ह्यापासून पांगरी गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे बार्शी पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे.तसेच सोलापुरातून एकशे एक किलोमीटर अंतरावर आहे श्री क्षेत्र रामलिंग हे बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत वसले आहे.हा परिसरा अतिशय निसर्गरम्य आहे तसेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे.पावसाळ्यानंतर श्रावणात इथे सर्वत्र हिरवळ असते.आणि माकडांची विशेष वर्दळ असते.येथील धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे.माता सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते.याच ठिकाणी पक्षीराज जटायू रावणाचे युद्ध झाल्याचे मानले जाते.याच ठिकाणी प्रभू रामचंद्र यांनी आपल्या बाणाने पाणी काढले व पक्षी राज जटायू यांना अंतकाळी पाणी पाजले होते व त्याला मोक्ष दिला होता.तसेच प्रभू रामचंद्रांनी भगवान शंकरांची इथेच आराधना केली होती.शिवलिंग स्थापन केले होते.मंदिराच्या आजूबाजूचा सुमारे अडीच हजार हेक्टर परिसर भारतीय वन विभागाच्या अखत्यारीत आहे.तसेच या परिसराला अभयारण्याचा दर्जा आहे,त्याचमुळे लगतच्या परिसरात ससे,काळवीट,मोर,हरीण,लांडगे रानडुक्कर,तरस व अनेक प्रकारच्या पक्षांचा इथे अधिवास आहे या जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात तसेच अनेक प्रकारची वृक्ष आहेत.मंदिराच्या प्रथम पायरीवर गेल्यावर आपल्याला मंदिराचे दर्शन होते तसेच मंदिराला वळसा घालून जाणारी नदी दिसते इथले मुख्य आकर्षण या परिसरातील धबधबा आहे.पावसाळ्यात या धबधब्यास भरपूर पाणी असते.धबधबा ओथंबून वाहत असतो.तसेच पर्यटकांना ट्रेकिंग करण्याकरता डोंगराच्या चारी बाजूने अँगल लावले आहेत त्यामुळे डोंगर परिसरात फिरता येते या ठिकाणी येणारे पर्यटक येथील माकडांना चणे फुटाणे पेढे असे पदार्थ देऊन आनंदीत होत असतात.मंदिरात जाण्यासाठी पूर्व पश्चिम उत्तर भागात दरवाजे आहेत मंदिराच्या पूर्वेस गोमुख तीर्थ आहे.तिथलं जिवंत पाण्याचा जरा अखंड चालू असतो. आपण जर ट्रिपचे नियोजन करत असाल तर उस्मानाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत असणारी आई तुळजाभवानी मंदिर पांगरी गावालगत असणार येरमाळा हे गाव वीस किलोमीटर अंतरावर असून येथे येडाई देवीचे मोठे मंदिर आहे  
🙏 धन्यवाद वरील माहिती आवडली असेल तर शेअर करा👉मल्लिकार्जुन मंदिर माहिती करता क्लिक करा

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*