योग्य शेअर कसे निवडावेत
आपल्या पोर्टफोलियो मध्ये असणाऱ्या शेअर्सचे बाजारभाव वाढल्यावर त्याचा आनंद सर्वाना होणे स्वाभाविक आहे.कारण त्यामुळे मालमत्ता वाढ होते.याउलट भाव कमी झाले कि चिंता वाटते.त्यावेळी आपली मानसिकता द्विधा होते व वाटते आपण निवडलेले शेअर चुकीचे तर नाही ना ?
⭕ असे वाढतात शेअर्सचे भाव -
1)बाजारात सर्वसाधारण तेजी असणे.
2)ज्या इंडेक्स मधील फंड असतात त्या फंडातील शेअर मध्ये तेजी असणे.
3)कंपनीचा तिमाही सहामाही व वार्षिक निकाल चांगला असेल तर बाजार सकारात्मक असणे.
4)कंपनी बाबत सकारात्मक बातमी बाजारात येणे.
5)कंपनीमधे मोठी गुंतवणूक होणे.
6)कंपनी तर्फे बोनस अथवा शेअर्स स्लिफ्त होणे.
7)कंपनीला व्यवसायांची मोठी ऑर्डर मिळणे.व्यवसाय विस्तार होणे.
8)कंपनी मर्ज होणे.टेक ओव्हर होणे.
⭕ असे होतात शेअर्सचे भाव कमी होतात.
1)वरील बाबी जर नकारात्मक बाजूने झाल्या तर शेअर्सचे भाव कमी होतात.परंतु या व्यतिरीक्त आणखी 2 बाबी भाव कमी होण्यास करणीभूत ठरतात.
2)वाढीव भावात नफा वसुली होणे.
3)शेअर मधील सट्टेबाजीचा प्रभाव.
शेअरचे भाव कमी जास्त होणे स्वाभाविक आहे याने आपण आपले मन विचलित न होऊ देता.आपली गुंतवणूक दीर्घकालिन काळांकरता करावी.जेव्हा बाजार पडेल तेव्हा चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करावे.
⭕ खरेदी केलेले शेअर्स कसे योग्य आहेत कसे पाहावे.
जर खालील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर आपण निवडलेले शेअर्स योग्य असतील.
1) ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल दरवर्षी वाढत आहे.
2) कंपनीचा कर पूर्व व कर पश्चात नफा दरवर्षी वाढत आहे.
3) कंपनीचे प्रॉफिट मार्जिन स्थिर आहे किंवा वाढत आहे.
4) कंपनीच्या व्यवसायास भविष्यात चांगले दिवस आहेत.
5) कंपनी प्रमोटर्सने त्यांचा हिस्सा किंवा शेअर्स गहाण ठेवले नाहीत.
6) कंपनीवर कोणतेही मोठे कर्ज नाही . असले तर प्रमाण कमी आहे.
7) कंपनीची बॅलन्स शीट उत्तम आहे.
⭕ चांगले शेअर्स कसे पडताळाल.
1) फंडामेंटल टूल्सचा वापर करून
2)nse किंवा bse च्या वेब साईट वर शेअर बजारातील कंपनी बद्दल पूर्ण माहिती मिळते.
धन्यवाद 🙏