मल्लिकार्जुन मंदिर माहिती सोलापूर
नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सोलापूर शहरातील प्रेक्षणीय अश्या श्री मल्लिकार्जुन मंदिराबद्दल माहिती शेअर करत आहे जी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे जेव्हा आपण सोलापुरात याल तेव्हा हि माहिती आपल्याला उपयोगी पडेल व प्राचीन मंदिराचा इतिहास कळेल.इंग्रज अधिकारी सिमकोक्स 1917 साली सोलापूरातील प्राचीन भुइकोट किल्ला पाहण्यासाठी आला होता.तेव्हा त्याला किल्ल्याच्या उत्तर भागात कोरिव दगडांच्या तटबंदी व खांब दिसलें त्याने पुरातत्वविभागाच्या परवानगीने उत्कखनन केले व त्यांना चालुक्य शैलीतील देखणे अशे मंदिर दिसलें मंदिर थोडेसे भग्नावस्थेत होते तिथे कोणतीही मूर्ति किंवा शिलालेख सापडला नाही.सिमकोक्स याने गावातील लोकाबरोबर चर्चा केल्यावर मंदिराचे रहस्य कळले.12 व्या शतकात थोर संत सिद्धराम यांनी श्रीशैल येथून आल्यावर या मंदिराची स्थापना केली.
*भुइकोट किल्ल्यतील उथ्खनन केलेले मंदिर सद्य परिस्थितीत आहे.संत सिद्धरामेश्वर ज्या दैवतांची पूजा करीत ते दैवत म्हणजे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन .सोलपुरात दर श्रावण मासात मल्लिकार्जुन मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.हे मंदिर पूर्वी किल्ल्यात होते परंतु किल्ला ब्रिटिश राजवटीत गेल्यावर भाविकांना किल्ल्यात जाऊन दर्शन घेणे गैरसोइचे होईल म्हणून तत्कलिक समाजधुरानींनी हे मंदिर शहरात मध्य वस्तीत बाळीवेस भागात स्थलांतरित केले व भव्य अशे मंदिर बेसाल्ट खडकातील पाषाणावर कोरण्यात आलेले सुबक नक्षीकाम व उत्कृष्ट बांधकाम शैली या मंदिराला लाभली आहे. मंदिराचे महाद्वार भक्कम दगडी उंच गोपुरांनी सजलेले आहे. भक्कम व देखणे असे हे मंदिर आहे. मंदिराच्या आत कोरीव खांबांवरील सभागृह, गर्भगृह व अनेक उपदेवतांची मंदिरे आहेत. सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 65 वे लिंग हे श्री मल्लिार्जुन लिंग आहे. याबरोबरच श्री आयलेश्वर लिंग, श्री आनंदेश्वर लिंग व श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग हे याच मंदिराच्या आवारात आहेत. 68 लिंगांपैकी सिद्धेश्वर मंदिरापाठोपाठ सर्वाधिक लिंग या मंदिरात आहेत. कसे जाल? सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून केवळ 800 मीटर अंतरावर पूर्वेस बाळीवेस या ठिकाणी हे मंदिर आहे. जवळील प्रक्षणीय स्थळे आजोबा गणपती, कसबा गणपती, हिप्परगा येथील तळ्यातला गणपती व हिप्परगा तलाव तसेच रूपाभवानी मंदिर उपदेवता मंदिराच्या आत 68 लिंगांपैकी चार लिंग आहेत. याशिवाय वीरभद्रेश्वर, गणपती, नागनाथ, नवग्रह व इतर देवी-देवता आहेत दर डिसेंबर महिन्यात गड्डा यात्रा भरते यात्रा महिनाभर चालते.हि यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
*बाळीवेस सोलापूर मुख्य चोैंकातील मंदिर
👉रामलिंग मंदिर उस्मानाबाद माहितीकरता क्लिक करा