नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला हा एक पर्यटन करण्याकरता चांगला पिकनिक स्पॉट ठरत आहे.हा किल्ला भुइकोट प्रकारात मोडतो.या किल्ल्याचा घेर 3 किलोमिटर परिसरात पसरला आहे किल्ल्यातुन बोरी नदी वाहते.
🔴 ऐतिहासिक पार्श्वभूमी
या किल्ल्याचा संबंध पुरणकाळातील नलदमयंती यांच्याशी जोडला जातो. हा किल्ला राजा नल याने आपल्या मुलासाठी बांधला असे मानले जाते. त्यावरून या किल्ल्याला नळदुर्ग असे नाव पडले.नळदूर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संस्मरणीय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या दुर्गाची नोंद इ.स. ५६७ पासून सापडते. चालुक्य राजा कीर्तीवर्मन याने इ.स. ५६७ मध्ये हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता. त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. इ.स. १३५१ मध्ये नळदूर्ग किल्ला बहामनी राज्याच्या ताब्यात गेला. इ.स. १३५१ ते १४८० या काळात मातीच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले.
🔴 किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे
A)पाणी महल
मुख्य किल्ला आणि रणमंडख हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे. हे धरण व महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे.पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरुन पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते. हे दोन धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात. यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे. धरण बांधून बोरी नदी अडविल्यामुळे पाणी अडून या पाण्याचा उपयोग किल्ल्यात पाणी पुरविण्यासाठीही करुन घेतल्याचे दिसते.याठिकाणी असणारा पाणी महाल कठीण अशा काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला आहे. हे धरण त्याकाळातील अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या धरणाची लांबी ५७२ फुट इतकी आहे. दस्ताऐवजातील नोंदीनुसार हे धरण पाणी महाल इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या काळात हिजरी १०२२ इ.स. १६१३ मध्ये बांधण्यात आले. याठिकाणी एक संगमरवरी दगडात चार ओळींचा शिलालेख आहे.
B)बुरुज
नळदूर्ग किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे. या तटबंदीत एकूण ११४ बुरुज आहेत. या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज आण्णाराव बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज इत्यादी नावे आहेत. परांडा बुरुज हे किल्ल्याच्या उत्तर-पूर्व बाजूस असून परांडा किल्ल्याच्या दिशेस आहे. या बुरुजावरुन त्याकाळी मोठा झेंडा किंवा मशालीच्या सहाय्याने परांडा येथील किल्ल्यातील लोकांना संदेश दिला जाई असे म्हणतात. बंदा नवाज हे या बुरुजाच नाव कशावरुन दिले गेले याविषयी माहिती मिळत नाही. हा बुरुज दक्षिण-पश्चिम बाजूच्या कोपऱ्यात आहे.
नवबुरुज हा स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. या बुरुजास नऊ छोटे-छोटे कंगोरे अशी रचना केलेली आहे, म्हणून या बुरुजास नवबुरुज म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या अगदी दक्षिण-पूर्व बाजूस एक बुरुज असून तो आण्णाराव बुरुज या नावाने ओळखला जातो. नळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूच्या तटबंदीत तुर्ऱ्या बुरुज असून येथून मच्छली तटकडे जाण्यासाठी पायऱ्यांची योजना केलेली आहे, त्याचप्रमाणे किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूच्या तटबंदीत संग्राम बुरुज नावाचा एक बुरुज आहे.
C) अंबरखाना
अंबरखाना ही इमारत एक मजली असनू ती आयताकृती आकाराची आहे. ही इमारत उत्तराभिमुख आहे. या अंबरखाना इमारतीच्या दर्शनी बाजूस ती कमानीयुक्त प्रवेशद्वार असून त्यापैकी दोन सध्या बांधकाम करुन बंद केलेली दिसतात. याचा हॉल आकाराने मोठा व उंच आहे. या ठिकाणचा वापर हत्तींच्या विश्रांतीसाठी करण्यात येत असे.अंबरखान्याच्या समोरील बाजूस पाण्याचे हौद असून सध्या ते पडझड झालेल्या स्थितीत आहेत. या पाण्याच्या हौदाशिवाय याठिकाणी विहीर पाणी साठविण्याच्या टाकी, पाण्याचे पाट आणि इतर संरचनाही आहेत. या पाणी साठविण्याच्या टाक्यांमधून हे पाणी किल्ल्यात असणारे रहिवाशी घरे, सरकारी कचेऱ्या, किल्ल्यातील बाग इत्यादींना पुरविण्यात येत असे. या सर्व संरचना पडझड झालेल्या अवस्थेत आहेत.
D) रंगमहाल
बारा इमाम इमारतीच्या पुढेच रंग महाल ही इमारत आहे. या रंग महालातही अनेक दालनांचा समावेश आहे. याठिकाणी संगीत, नृत्य इ. कार्यक्रम होत असे. या महालातच गोवळकोंड्याच्या राजकन्येशी दुसरा इब्राहिम आदिलशहाचा विवाह सोहळा थाटात झालेला होता.
E) हत्ती तलाव
हत्ती तलाव हा आयताकृती आकाराचा आहे. या तलावाच्या दक्षिण, पश्चिम व उत्तबाजूची भिंत दगडांनी बांधलेली आहे. पूर्वेकडील बाजूस हत्तींना तलावात उतरण्यासाठी उतार ठेवलेला आहे. पश्चिम बाजूंच्या दगडी भिंतीत पायऱ्यांची योजना केलेली आहे. या हत्ती तलावाचा उपयोग हत्तींना स्नान घालण्यासाठी करीत असत.
🔴नळदुर्ग किल्ल्यात पर्यटकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा
A) वॉटर राईड -नळदुर्ग किल्ला येथे असणाऱ्या बोरी नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच वॉटर स्पोर्टची सोयही उपलब्ध असणार आहे
B) ध्वनी व प्रकाशाचे शो - नळदुर्ग किल्ला व परिसराची ऐतिहासिक माहिती या ध्वनी व प्रकाश शोद्वारे देण्याचे प्रस्तावित आहे.
C) बाग व बगीचा-किल्ल्याच्या आतील भागात बाग-बगीचा तयार करण्यात येणार आहे. यात रोझ गार्डन, मुघल गार्डन इ. चा समावेश आहे.
D) इलेक्ट्रिक बग्गीची सोय-नळदुर्ग किल्ला हा जवळ जवळ १२५ एकर परिसरात पसरलेला असल्यामुळे किल्ला पाहण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गी राईड ही पर्यटकांसाठी उपलब्ध आहे.
E) हॉटेलिंग-नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारची खान-पान सुविधाही उपलब्ध आहे.
🔴 कसे जावे - नळदूर्ग हे सोलापूर पासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रं. २११ या रस्त्याने धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर मार्गे नळदुर्ग येथे जाता येते. हैद्राबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गानेही हैद्राबाद-उमरगा-नळदुर्ग असेही नळदूर्ग येथे पोहचता येते. सोलापूर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाद्वारेही कर्नाटकातून येणाऱ्या लोकांना विजापूर-सोलापूर-नळदुर्ग मार्गाद्वारे नळदूर्ग येथे पोहचता येते. नळदूर्ग हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग इत्यादीद्वारे विविध शहरांशी जोडलेले आहे. जवळचे रेल्वेस्थानक सोलापूर आहे. नळदूर्ग येथे असणारा ऐतिहासिक नळदूर्ग किल्ला हा स्थानिक बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून किल्ल्यात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.तसेंच जवळच्या ठिकाणांत अक्कलकोट, व तुळजापूर हि प्रसिद्द मंदिरे भेट देता येतात.👉हे हि वाचा श्री क्षेत्र रामलिंग माहिती
शेवटी धन्यवाद 🙏 आवडले तर like व शेअर करा.