🙏 नमस्ते मित्रांनो कसे आहत.या दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मनोरंजनासाठी कंतारा हा साऊथ इंडियन चित्रपट आला आहे.सद्या आपल्या सर्वाना बॉलीवूड चित्रपट पाहून फार कंटाळा येत आहे तीच ती कथा त्याच त्याच गोष्टी पाहून सर्वजण कंटाळले आहेत त्याच त्या प्रकारचे तेच हिरो तेच हिरोईन बघाल्यामुळे लोकांनी चित्रपट पाहणे सोडून दिले त्याला अपवाद फक्त साउथ इंडियन मूवी आहेत हे चित्रपट सगळ्या प्रकारच्या कथा विलक्षण कल्पनाशक्ती त्यामुळे हे चित्रपट सुपरहिट ठरत आहेत याच पठडीतला कंतारा चित्रपट आहे.
चित्रपटची कथा
या चित्रपटाची कथा सन 1870 साली सुरू होते एक ग्रामदेवता एक लहान गाव व एक राजा यांच्या संबंधित हा चित्रपट आहे. या राजाकडे सर्व प्रकारची संपत्ती सत्ता असुनही तो मनातून निराश असतो. त्याला दिवस रात्र चैन पडत नसते त्याला शाश्वत सुखाची ओढ लागलेली असते. त्यामुळे तो अनेक दिवस शांतीच्या शोधात भटकत असतो.दान धर्म करतो अनेकांना भेटतो.परंतु त्याला शांती मिळत नाही तो सतत बेचेन असतो. तो त्याचे राज्य सोडून शांतीच्या शोधात जंगलात जातो तिथे त्याला एका दगडाजवळ विलक्षण अनुभूती होते. त्याचे सैरभैरमन शांत होते.तो दगड म्हणजे एका गावची ग्रामदेवता असते.राजा जेव्हा गावकर्यांसमोर देवाला त्याच्या राज महालात घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त करतो.तेव्हा एका गावकर्याच्या अंगात देव शिरून राजाला काही अटी ठेवतो.व राजा आनंदाने अटी मान्य करून देवाला वाजत गाजत घेऊन जातो.पुढे काही वर्षाने राजाचे वारसदार जे नास्तिक असतात ते देवाच्या जत्रेत येतात तिथे देव जो एका नर्तक देवचा पुजारी असतो.त्याला राजाने दिलेली जमीन मागतो.व देवाचा अपमान करतो.देव नाराज होतो व अचानक निघून जातो.दुसऱ्या दिवशी राजाचा वारस अचानक मारतो.यात देवाचा गिर जो नर्तक असतो त्याची भूमिका त्याच्या अंगात येणे,बॅकग्राउंड संगीत आपल्या प्राचीन परंपरा याचे मिश्रण जबरदस्त आहे.खरी कथा पुढे आहे नर्तकचा मुलगा पुढे मोठा झाल्या वर त्याला सतत होणारे भास त्याचे गावातील गुंडा बरोबर होणारे वाद,पोलीस लोकांनी जंगलापासुन लांब राहावे म्हणून केलेल्या युक्त्या पुढे राजचा वारस जमीनदार त्याचे राजकारन त्याचे गावाकर्याकडुन आपली जमीन परत घेण्याकरिता फ़ॉरेस्ट ऑफिसर व पोलीसांविषयी गावकरी लोकांना भडकावने.चित्रपटांच्या शेवटची 20 मिनटांचा क्लायमॅक्स सर्वाना खीळवून ठेवतो.आपल्या भरत देशामधील परंपरा याचे दर्शन हा चित्रपट करतो कुठेही कंटाळा येत नाही त्यामुळे प्लीज हा चित्रपट बघा. आपल्याला कर्नाटकातील त्या लोककलेविषयी किंवा त्यांच्या परंपरेविषयी काही माहिती नसूनही आपण त्या कथेत कधी गुंततो तेच आपल्याला समजत नाही. याचं संपूर्ण श्रेय जातं ते लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी यांना. रिषभ यांनी कथा आणि लोकांच्या श्रद्धास्थानाचं गांभीर्य बाळगून ही कथा सादर केली आहे. रोमान्स, नाट्य, विनोद, थरार या सगळ्या गोष्टी त्यांनी योग्य प्रमाणात आणि योग्य त्याच ठिकाणी पेरल्याने कथा पटकथा तुम्हाला कुठेच भरकटल्यासारखी वाटत नाही. दिग्दर्शन आणि चित्रीकरणात तर या चित्रपटाला पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत. कर्नाटकचं निसर्गरम्य चित्रण, तिथल्या लोकांना मिळालेलं निसर्गाचं वरदान, लोकांच्या प्रथा परंपरा याचं अचूक चित्रण तुम्हाला यात बघायला मिळेल. खासकरून सुरुवातीला म्हशीच्या शर्यतीचं दृश्य फारच अप्रतिमपणे सादर केलं आहे. चित्रपट अगदी गंभीर होऊ नये यासाठी बऱ्याच ठिकाणी विनोद निर्मितीचा वापर केला आहे आणि तो अगदी उत्तम जुळून आला आहे. काही संवाद आणि दाक्षिणात्य चित्रपटात महिलांचं केलं जाणारं चित्रण यावरून कदाचित कुणी आक्षेप घेऊ शकतं, पण ही त्यांची जगण्याची रीत आहे, आणि ती जीवनशैली जशी आहे तशीच मांडल्याने कुठेही त्यात नाटकीपणा तुम्हाला जाणवणार नाही.चित्रपटाची शेवटची २० मिनिटं ही सुन्न करणारी आहेत, त्या २० मिनिटांत आपल्या डोळ्यासमोर घडणारं नाट्य, त्यामागची पार्श्वभूमी, आणि प्रत्येक कलाकाराने केलेला अभिनय पाहून तुम्ही थक्क व्हाल. खासकरून रिषभ शेट्टी याचं शिवा हे पात्र ज्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडतं आणि त्याचं एक वेगळंच रूप आपल्याला या २० मिनिटांत पाहायला मिळतं. यासाठी रिषभ यांनी घेतलेली मेहनत पडद्यावर आपल्याला दिसते. रिषभच्या पात्राचा म्हणजेच ‘शिवा’चा भूतकाळ आणि त्यादिशेने होणारा त्याचा प्रवास अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे.त्या मूळे हा चित्रपट नक्की पहा.
धन्यवाद .🙏
Film -कंतारा
कलाकार - रिषभ शेट्टी,सप्तमि गौडा
डायरेक्टर - रिषभ शेट्टी
रिलीज डेट -30 सप्टेंबर