गुवाहाटी काय डोंगार काय झाडी
तसा तो दहावीतील हुशार मुलगा होता.पण त्याची परिस्थिति हलाखिची म्हणजे गरिबीची होती.आई बापाने त्याला कोणत्या दिव्यातुन वाढवले होते ते त्यांनाच माहित.तो पार्ट टाइम कामं करून शिकत होता यांचे शिक्षक व शाळेतील लोकांना कौतुक होते.तो एक चांगला खेळाडू होता रोज सकाळी लवकर उठून शाळेतील मैदानावर सराव करत असे त्याला गोळा फेक या क्रीडा प्रकारात विशेष प्रविन्य होते.त्याचे क्रीडाशिक्षक त्याच्या कडून रोज सराव करून घेत होते.अशी त्याची जिंदगी चालली होती.त्याने जिल्हा स्तरावर अनेक स्पर्धात भाग घेतला होता.व चांगले यश प्राप्त केले होते त्याचे ध्येय आपल्या आई वडिलांनी ज्या कष्टाच्या झळा सोसून त्याला वाढवले होते त्याचे पांग फेडता यावे या करता कितीही कष्ट करावे लागेल तरी त्याची तयारी होती.त्या करता त्याने वेळेचे नियोजन केले होते.पण त्याच्या घरच्या दैनंदिन खर्चाचे नियोजन कोलमडत होते.जिथे दररोजच्या हाता तोंडा ची गाठ पडण्याची भ्रांत तिथे चैन करण्याचा विचार म्हणजे पाप केल्या सारखे आहे.त्याला अजूनही त्याच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो.शाळेने जिल्हा स्तरीय स्पर्धात भाग घेतला होता त्यात त्याची निवड झाली होती परंतु स्पर्धा दुसऱ्या जिल्ह्यात होत्या.त्याला इतर मुला प्रमाणे स्पर्धा म्हणजे एक ट्रिप मौज करण्याकरता केलेला प्रवास.त्याची परिस्थिती पाहून त्याच्या येण्याजान्याची व खाण्यापिन्याची सोय केली होती.परंतु इतर सामान खरेदी करता त्याला त्याचा खर्च स्वतः करायचा होता.त्याचा वाडीलाकडे पैसे मागितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आलेली आगतिकता परंतु त्याने व त्याच्या आई वडिलांनी त्यावरही मात करत कसेतरी उसनवारी करत काही रक्कम जमवली.व त्याचा पुढचा प्रवास सुरु झाला त्यानेहि त्याच्या कष्टाचे चीज केले व स्पर्धेत चांगले प्रविन्य मिळवले व मेडल व प्रमाणपत्र मिळवले.ते त्याच्या आई वडिलांना दाखवले पण त्यांना मेडल व प्रमाणपत्रा पेक्षा त्याच्या कडून वेगळ्या अपेक्षा होत्या.त्यांना गोल्ड मेडल म्हणजे सोन्याचे पदक मिळवले का असे वाटले परंतु ते नकली आणले का म्हणून त्याला आईने विचारले त्याने गोल्ड मेडल म्हणजे खरे सोने नसते हे समजावून सांगितले.पुढे काही दिवस गेल्यावर परत एक नवे वळण आले राज्यात नवे सरकार आले व ते पण काही आमदार एका पक्षाने पळवले व त्यांना वेगवेगळ्या राज्यात फिरवत फिरवत गुवाहाटीत पोचले.व टीव्ही वर बातम्याचा पूर आला.रोज नवीन बातम्या येऊ लागल्या आमदार काय खातात काय पितात,कसे नाचतात,गाणे गातात चौंका चौकात आमदार कितीला विकले विकत घेतले यावर चर्चा झडत होत्या.आमदार पक्ष सोडून गेले कि त्याची चर्चा होत होती.यात 2 महिने कसे गेले कुणाला कळले नाही मात्र आमदाराची ट्रिप जोमात होती.जनतेला काय रोजचा दिवस सारखाच पण आपण म्हणाल यात काय नवीन हाच तर खरा ट्वीस्ट आहे.त्याची निवड राष्ट्रीय स्तरिय स्पर्धात झाली व स्पर्धा ठिकाण होते गुवाहाटी संपूर्ण देशातील निवडक शाळेतील मुले मुली या स्पर्धे आपल्या शाळेचे प्रतिनिदित्व करणार होती.परंतु याचा खर्च ज्याने त्याने स्वत करायचा होता.आणि खर्च रक्कम होती 40000 रुपये त्याला हे काळाल्यावर धक्का बसला.त्याने हि रक्कम जमावने आपल्या अवाक्याबाहेर आहे हे जाणले व शिक्षकांना माझ्या घरच्या कडून एवढी रक्कम गोळा करणे जमणार नाही हे स्पष्ट संगितले.तरी त्याच्या शिक्षकांनी त्याच्या वडिलांना हि बाब कळवली वडिलांनी हि इतकी रक्कम गोळा करण्यास असमर्थता दर्शवली शेवटी शिक्षकांनी शेवटचा प्रयत्न म्हणून वर्गणी गोळा केली परंतु तेवढी रक्कम जमा झाली नाही.त्यांना कोणी तरी आपल्या भागातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी यांना भेटण्यास सांगितले तेव्हा आमदार तर गुवाहाटीत होते व सरकारी मदत तर सरकार तळ्यात मळ्यात असल्याने मिळाली नाही शेवटी सर्व जण हतबल झाल्याने त्याची स्पर्धेत भाग घेण्याची संधी अपूर्ण राहिली.त्यातच देशाचे भविष्य असणाऱ्या गुवाहाटीतील कोणी लोक प्रतिनीधीचा एक क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती जो तो व्हाट्स अप ,फेसबुक,टीव्ही वर पहात व शेअर करत होता. परंतु त्याला मात्र संधी अभावी आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही.त्याला कोणताही डोंगर झाडी पाहायची नव्हती.व इच्छाही नव्हती तो निघाला पुढे नवीन संधीच्या शोधात?
टीप- वरील लघु कथा हि कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नाही आवडली तर कृपया शेअर करा धन्यवाद 🙏