नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी शेअर खरेदी या विषयावर ब्लॉग लिहीत आहे.जसा आपण अनुभव घेतो तसें शिकत जातो.कारण कोणीच अचानक काही माहिती घेऊन लगेंच ट्रेडिंग करू शकत नाही.कारण ट्रेडिंग हा विषय आपण स्वत शेअर खरेदी किंवा विक्री केल्या शिवाय कळणारा नाही.काही युट्युब चॅनल किंवा व्हिडीओ पाहून ट्रेडिंग करू शकत नाही.मी गेल्या एक वर्षा पासून ट्रेडिंग करत आहे.मी सध्या मार्केट ट्रेडिंग करत आहे कारण नवीन ट्रेडर्स स्वःत शिकेपर्यंत मार्केट ट्रेडिंग करणे मला योग्य वाटते.कारण रिस्क कमी असते व जास्त धोका नसतो.आपल्या माहिती करता मी स्वःत ट्रेड केलेले शेअर बद्दल आपल्याला माहिती देतो.
1) मी जय प्रकाश पॉवर ली चे 2715 शेअर रुपये 8.20 पैसे या प्रमाणे खरेदी केले.
2) त्याची किंमत चार्जेस कट होऊन 22263 रुपये झाली.
3) हा शेअर खरेदी रेगुलर डिलेव्हरी प्रकारात खरेदी केला.
4) हा शेअर मी 8 ऑगस्ट 2022 रोजी खरेदी केला. व त्या शेअर मध्ये वाढ करत शेअर संख्या विक्री करेपर्यंत 3459 इतकी होती नंतर 1 सप्टेंबर 2022 दिवशी हे शेअर विकून टाकले . 23 दिवसात या शेअर चा फायदा किती झाला हे आपणाला पुढे कळेल.
5) आता आपण जय प्रकाश पॉवर व्हेचर ली बद्दल माहिती घेऊ.
6) जय प्रकाश पॉवर व्हेंचर ली. हि एक भारतातील वीज निर्मिती क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे.
जी सन 1994 साली स्थापन केली गेली होती.सध्या पॉवर सेक्टर तेजीत आहे.
7) जय प्रकाश पॉवर व्हेंचर ली. याचा मार्केट कॅपिटल 5037 करोड रुपये आहे.त्याचा P E रेशो प्रमाण 13.14 आहे.
8) महत्वाचे म्हणजे त्याचा 2022 सालातील नेट वर्थ 10707 करोड रुपये आहे.
9) त्यांनी 2022 साली 1334 करोड रुपये महसूल कमवला व सर्व खर्च वजा जाता कंपनी ने 75 करोड रुपये नफा कमावला.
10) आपण जय प्रकाश पॉवर व्हेंचर ली. चा फंडामेंटल किंवा नफा तोटा ,ताळेबंद पहिला.यात आपल्याला कंपनीचे सध्या काय चालू आहे याची ढोबळ माहिती मिळते.तसेंच आपण यु ट्यूब वर किंवा अन्य मार्गाने या कंपनीची माहिती मिळवू शकतो.आता पाहू मी तो शेअर विक्री केल्यावर मला कसा फायदा झाला कारण मी हि आपल्या सारखा नवीन होतो .मी ही घाबरत नवीन माहिती घेत व्हिडीओ पाहून रिस्क माहिती घेत ट्रेडिंग केली केली.
11) आता आपण जय प्रकाश पॉवर व्हेंचर ली.चे शेेअर विक्री
दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी
विक्री केल्यावर मला किती फायदा झाला हे पाहू.
12) सदर शेअर्स मी 23 दिवसात होल्ड करून विक्री केला.
13) 1 सप्टेंबर 2022 रोजी सदर शेअर्स चे भाव किंमत 8.रुपये 15 पैसे होता.
14) जय प्रकाश पॉवर व्हेंचर ली. शेअर ची विक्री किंमत 28190 रुपये इतकी झाली.
15) मी हे शेअर 22263 रुपये या प्रमाणे खरेदी केले.व 28190 या किमतीने विकले मला 5927 इतका फायदा झाला.
तरी आपणही योग्य अभ्यास करून गुंतवणूक केली तर फायदा निश्चित होतो .मला या शेअर खरेदी विक्री करताना आलेले अनुभव.मी हे शेअर खरेदी करताना प्रथम 100 शेअर खरेदी केले व नंतर त्याचा अभ्यास केला.सदर कंपनीच्या शेअर मध्ये दररोज होणारे चढ उतार पाहिले.भाव कमी असताना शेअर खरेदी केले. व भाव वाढ झाल्यावर शेअर विकले व प्रॉफिट कमावला.नवीन ट्रेडिंग करताना प्रथम कमी रक्कमेने ट्रेडिंग (खरेदी) चालू करावी.व अनुभव घ्यावा.भाव कमी झाल्यावर जास्त पॅनिक होऊ नका.चांगल्या कंपनीत गुंतवणूक करा.चांगली गुंतवणूक प्लॅटफॉर्म निवडा मी सध्या Groww हे ट्रेडिंग अॅप वापरतो.आपण ट्रेडिंग करता दररोज काही वेळ देणे गरजेचे आहे.कारण आपण दररोज मार्केट चार्ट पहिले नाही तर बाजारातील ट्रेंड कळणे अवघड आहे.तर कशी वाटली माझी शेअर खरेदी विक्री या ब्लॉग बद्दल ची माहिती.हा माझा अनुभव आपल्या काही तरी कामास आला तर मला आनंद होईल काही चुकले तर सांभाळून घ्यावे हा लेख कसा वाटला आवडला तर कृपया शेअर करा.धन्यवाद 🙏
टीप - वरील लेख माझा शेअर खरेदिचा स्वःअनुभव आहे.