श्री.स्वामी विवेकानन्द आधुनिक भारताचे आलोैकिक व्यक्तिमत्त्व

Vikas Jamdade
0
#आजच्या_दिवशी_१२८वर्षापुर्वी
#माझ्या_अमेरिकेतील_बंधू_आणि_भगिनीनो…  !! #स्वामीजींनि_हे_वाक्य_उच्चारले  
आणि सर्व सभेने उभे राहून टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला . हि घटना ११ सप्टेंबर १ ८ ९ ३ धर्मपरिषदे मधील . 
यावेळी हिंदू धर्म, सरस्वती आणि शिवमहिमा स्तोत्रातील दोन महत्वाचे संदर्भांचे त्यांनी दाखले देत सभेवर पक्कड घेतली . 
हिंदू धर्माकडे काहीशा तुच्छतेनेच पाहणाऱ्या पाश्चात्य जगातील लोकांना स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची महती पटवून दिली आणि हिंदू धर्माची पताका जागतिक क्षितिजावर फडकत ठेवली. शालेय वयात खरेतर स्वामी विवेकानंदांवर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. महाविद्यालयीन जीवनात ते ब्राम्हो समाजाकडे आकृष्ट झाले होते. मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. परंतु 1880 साली ते ""रामकृष्ण परमहंस"" या सिद्ध योगीपुरुषाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे विचार संपूर्णतः पालटले. ते सनातन हिंदू धर्म व अद्वैत तत्वज्ञानाचे आजन्म समर्थक बनले. 1887 साली त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली व सर्व भारतभर प्रवास करून आपल्या देशबांधवांची एकूण स्थिती समजावून घेतली. काही काळ हिमालयात जाऊन त्यांनी योगसाधनाही केली. 1893 साली जेव्हा ते शिकागोमधील धर्म परिषदेत सामील झाले त्यांनतर त्यांना जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली. 
स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य देशातील भौतिकवादाचा अध्यात्मवादाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ""खऱ्या सुखप्राप्तीसाठी भौतिकवादाला अध्यात्माची जोड मिळणे आवश्यक आहे आणि अध्यात्माची शिकवण जगाला केवळ भारतच देऊ शकतो"" असे स्वामी विवेकानंद कायम म्हणत.
अमेरिकेत त्यांचे अनेक शिष्य निर्माण झाले. 'मार्गारेट नोबेल' या,'भगिनी निवेदिता' बनून भारतात आल्या.
१२६ वर्षांपूर्वी हि घटना घडली 
धर्मपरिशदेतिल फोटो
शिकागो परिषद "

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*