मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय कादंबर्या

Vikas Jamdade
0
मराठी साहित्य विश्व अनेक प्रकारच्या कादंबर्यानी समृद्ध आहे.मराठी साहित्य नानाविध प्रकारच्या लेखकांनी त्यांच्या लेखणीने बहरलेले आहे.संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वरांनी भगवत गीता या संस्कृत ग्रंथाचे सार ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जनसामान्य लोकांना कळवा म्हणून मराठी भाषेत लिहला.संत तुकाराम महाराजांनी अभंग हा काव्यप्रकार लिहून हजारो वर्ष लोटले तरी आजही तुकारामांचे अभंग अखिल भारतात लोकांना मुखोद्गत आहेत.महराष्ट्राचे छावा छत्रपती श्री.संभाजी महाराजांनी बुद्ध भूषण ग्रंथ लिहला.अशी मराठी भाषा वघिनेचे दूध समजली जाते.समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहून लोकांना कसे वागावे याचे विवेचन केले. ध्यन्य आपण जे बोलतो मराठी वाचतो मराठी.मराठी साहित्य पू.ल.देशपांडे,द.मा.मिराजदार,लोक.शाहीर अण्णाभाऊ साठे,तसेच मराठी कवी,BC मर्ढेकर,शांता शेळके,बहीणाबाइ,कवी ग्रेस,यांनी साहित्यांत मोलाची भर घातली.मराठी सहित्यातिल काही आवर्जून वाचाव्यात अश्या कादंबर्या 

1)श्रीमान योगी -

छत्रपती शिवाजी महाराज‌ म्हणजे महराष्ट्रातील लखलखता ज्वलंत इतिहास आहेत.त्यांचे चरित्र कालातित आहे.इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे अवघड आहे.पुरंदरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे.शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे.मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते.रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.

2)छावा-

लेखक-डॉ.शिवाजी सावंत
संभाजीराजांचे हे स्फूर्तिदायक चरित्र. लेखक शिवाजी सावंत यांच्या या पुस्तकानं मराठी मनाला वेड लावलं. १९७९ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून समजते. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर सजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती सजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.

3)बाजींद -

‘बाजिंद'ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे.धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन
सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे
रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी
नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरीत्या
झालेली त्यांची भेट. या दोघांना रायगडावर प्रवेश
मिळवून द्यायचं त्यानं दिलेलं आश्वासन. खंडोजी आणि
सावित्रीची प्रेमकथा. शिर्क्याचे वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्षांची भाषा, मृत्युसमयी त्याने आपल्या वंशजाला ‘बाजिंद’ला त्या भाषेचा दिलेला वारसा इ थरारक धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत. रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून
धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची
साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं.
याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार,भावनांची गुंतागुंत
आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी.

4)एक होता कार्व्हर -

लेखक-वीणा गवाणकर
गुलामगिरीत जगणार्या कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं.

5)फकीरा-

लेखक-अण्णा भाऊ साठे
थोर साहित्यिक विचारवंत कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांनी या महानायकाचा विचार,लढा,संघर्ष जगासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न 'फकीरा' या अजरामर साहित्यकृतीच्या माध्यमातून केला आहे. फकिराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 'फकीरा' ही कादंबरी लिहिली आहे. फकीरा या नायकाचा जो काही इतिहास आहे तो तसाच्या तसा अण्णाभाऊ साठे आणि रेखाटला आहे. फकिराच्या सोबत राहून संघर्ष केलेले एकूण एक पात्र त्या मातीत खेळलेले आहे, बागडलेले आहे, लढलेले आहे आणि त्याच मातीत एकरूप झालेलं आहे. अण्णाभाऊंनी जी पात्र रेखाटलेली आहेत त्यापैकी विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील, रावसाहेब पाटील, बापु खोत, उमा चौगुला, बाजीबा खोत, सावळा, मुरा, घमंडी, बळी, चिंचणीकर, साजूरकर, धोंचीकर, सत्तू भोसला, दुलारी मांग, राधा, राही, दौलती, सहदेव, भैरू रामोशी, गजा सुतार, नाना डोंगरा, पांडू नांगरा अशी जी काही पात्र आहेत ती सर्वच्या सर्व वारणामाईचं पाणी पिऊन आणि वारणेच्या खोऱ्यात वास्तव्य करून राहिलेली आहेत.

6)बनगरवाडी-

लेखक-श्री. व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी,अंजी,दादू,आयाबू,आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको.या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत,तशी स्वभाववैशिष्ट्ये.
प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे.हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले.

6)पानिपत-

लेखक-डॉ.विश्वास पाटील.
पानिपतचा इतिहास हा पराजयाचा आहे, असं म्हंटलं जातं. मात्र डॉ.विश्वास पाटील यांनी या पुस्तकात पानिपतचा विजय वर्णिला आहे. जाधव यांनी पुस्तकाची सुरुवात पानिपत गावाच्या इतिहासापासून केली आहे. अब्दाली, अब्दालीची स्वारी, कुंभेरची लढाई, दिल्लीची गादी, अटकेपार दांडे,दत्ताजी शिंदे,बुरांडी घाटाची नाकेबंदी, बंडाची लाट,दिल्लीवर हल्ला,पहिला विजय, अखेरचा रणसंग्राम,होळकर,इब्राहीम खान,हताश अब्दाली अशा क्रमाने इतिहास पुढे सरकत रहातो.पानिपतच्या युद्धात जसं मराठ्यांचं नुकसान झालं, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचही झालं, असे लेखक सांगतात. या युद्धात मराठ्यांना मागे फिरावे लागले, तरी हा निर्णय दूरगामी दृष्टीने योग्य ठरला. असं सांगून त्याचं विस्तृत स्पष्टीकरणही त्यांनी पुस्तकातून केलं आहे.या युद्धात जसे मराठ्यांचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचेही झाले. विजय म्हणावा तसा अब्दालीला या युद्धातून ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मग विजय तो कसला आणि कशाचा? या युद्धातून मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दुरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दीर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला.या युद्धानंतर ३५ वर्षे दिल्लीवर भगवा फडकला. मराठ्यांचा या सार्थ पराक्रमामुळे पंजाबातील शिखांनाही परकीय आक्रामकांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. स्वातंत्र्यासाठी अनेक दशके लढणाऱ्या शिखांच्या स्वातंत्र्याची पायरी मराठ्यांनी बसविली हे विसरून कसे चालेल. अब्दाली स्वतःच्या अटीवर नव्हे तर मराठ्यांना हवा तसा तह करून या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू इच्छित होता ते याच कारणामुळे. मराठ्यांनी अब्दालीला दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की खुद्द अफगाणिस्थानात अब्दाली जिवंत राहील का? असा प्रश्न लोकांना पडला. कांदाहारात अनेक प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या. त्यात अब्दालीचा दारूण पराभव झाल्याची बातमी सराव मोठी होती.आता हिंदुस्थानात तर काही मिळाले नव्हते. आणी तिकडे दोन वर्षे अब्दाली भारतातच अडकल्यामुळे त्याच्या प्रभावाची बातमी तिकडे पोहोचल्यामुळे तिथले तख्तही बुडण्याच्या भीतीने अब्दालीला पाळणे भागच होते, तो जिवंत राहिला होता हेच त्याचे नशीब आणि हाही इतिहास जाणून होता की सिकंदर सारख्या जगजेत्याला हिंदुस्थानातील लोकांनी तांगडून मारला होता आणि बेबीलोनला तो जिवंत पोहचू दिला नव्हता. आपलाही मराठे सिकंदर करतील या भीतीने गाळण उडालेल्या अब्दालीने असेल तशा परिस्थितीत मोकळ्या हातांनी खिन्नावस्थेत हिंदुस्थान सोडला.🙏





एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*