Un-Paused naya safar movie review

Vikas Jamdade
0




Un Pused Movie

अमेझॉन प्राइमवर un paused नया सफर हि वेब सिरीज आपण बघीतली का? covid 19 च्या लॉक डाऊन मधे जन सामान्य लोकांना तसेच नोकरदार,निवृत्त,व कामगार वर्ग यांना आलेल्या अडचणीवर हि सिरीज बेतलेली आहे.यात 4 विविध वर्गातिल लोकांची कहाणी आहे.यात एक गोष्टं कॉमन आहे ती म्हणजे कितीही अडचणी आल्या तरी त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाने पुन्हा नवीन सुरवात केली जाऊ शकते.विशेष म्हणजे या मूवी मध्ये महराष्ट्रातील सैराट चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी भूमिका केली आहे.

1)Movie Review - Un-Paused the Naya Safar

2)Star Cast- नागराज मंजुळे,रसिका आगाशे,अर्जुन कर्चन्ड,सकिब सलीम,आशिष वर्मा,सॅम मोहन,श्रेया धन्वन्तरि,दर्शना राजेंद्र,अक्श्वर्म सिंग,नीना कुलकर्णी

3) निर्मता-Amezon

4)OTT-amezon prime

A) भाग 1 - The  Coupal

the coupal चे निर्माता दिग्दर्शक दिग्दर्शक नुपूर अस्थना यांनी केले आहे. यात श्रेया धन्वन्तरि व प्रियांशु यांनी नवरा बायकोची भूमिका केली आहे.यात नवरा बायको दोघेही मोठ्या corporet कंपनीत कामास असतात.त्याचे जीवन सुरळीत चालू असते.परंतु लॉक डाऊन लागल्यामुळें बायकोचा जॉब गेल्यावर खर्च यामुळे दोघात आलेला दुरावा परंतु काही काळाने दोघांचे मतभेद मीटतात व कथा संपते.

B) भाग 2-तीन तिघाडा
तीन तिगड़ा की कथा लिटिल थिंग्स फ्रेम अरुण रुचिर यानी दिग्दर्शित केले आहे ही कथा तीन चोरांची आहे जे एका सुनसान फॅक्टरीमध्ये त्यांचा चोरीचा माल ठेवतात.हा चोरीचा माल विके पर्यंत तिथेच थांबन्याचा आदेश त्यांचा बॉस त्यांना देतो.लॉक डाऊन मूळे त्यांचा खाण्या पिण्या चा होणारा संघर्ष,मास्क नसल्याने अधिकार्यानि केलेला दंड.वडापाव घेण्याकरिता पोलिसाला देऊ केलेली लाच.तिघांत होणारे कलह शिवीगाळ व शेवटी बोसला न जुमानता केलेले पलायन यावर हि कथा आहे.

C) भाग-3 -वॉर रूम 
अय्यपा km यांनी या कथेचे दिग्दर्शन केले आहे.संगीता नावाची स्कूल टीचर असते तिची बदली covid मदत कक्षात टेलिफोन ऑपरेटर म्हणून असते.या कथेत शिक्षकावर अतिरिक्त कामाचा असणारा ताण.त्यांची घुसमट,राजकारणी लोकांची चमको गिरी यात संगिताला एक कॉल येतो परंतु हा कॉल आल्यावर तिची होणारी तगमग तिच्यावर covid bed देताना लाच घेतला असा झालेले आरोप तिची आरोपी प्रमाने होणारी चोैकशी तिचे निर्दोष सूटने शेवटी त्या पेशंटला बेड उपलब्ध होणे.यात पेशंट संगीताचा कोण लागतो हा तिडा सुटत नाही.
D) भाग-4 गोंद के लड्डू
क्षीखा माखन दिग्दर्शित् हि कथा खूप छान आहे.यात नीना कुलकर्णी यांनी भूमिका केली आहे.हि कथा कुरियर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तिभोवति सदर फिरते डिलिव्हरी बॉय ला झटपट डिलिव्हरी करून 5 स्टार रेटिंग घेऊन आपली नोकरीं वाचवायची असते.त्या नादात त्याचा accident होतो व् एक पार्सल खराब होते.हे पार्सल एक डब्बा असून त्यात गोंद् के लड्डू असतात.हे पार्सल आईने आपल्या मुलीला पाठवले असते.सदर पार्सल देण्या करता सदर मुलगा व् त्याची पत्नी काय काय करतात हे बघन्यासारखे आहे.कथेचा शेवट ह्द्यस्पर्शि आहे.
E)भाग -5- वैकुंठ
या भागात महराष्ट्राचे सैराट फेम नागराज मंजुळे यानि स्वतः भूमिका केली आहे.हि कथा वैकुंठ नावच्या स्मशानात मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करणाऱ्या व्यक्ती भोवती फिरते.स्मशानात येणाऱ्या प्रेतावर corona काळात अंतिम संस्कार करण्यास त्याच्या घरचे घाबरत होते तिथे कामं करणाऱ्या व्यक्तीच्या घरात राहणाऱ्या लोकांना काय त्रास सहन करावा लागतो.त्याचा घरमालक त्याला रूम खाली करण्यास सांगतो कोणी रूम देत नाही तेव्हा त्याला स्मशानात राहण्याची पाळी येते.तसेंच त्याचे वृद्ध वडील पॉझिटिव्ह निघाल्यामुळे दवखन्यात ऍडमिट असतात.नागराज मंजुळे यांच्या नेहमीच्या शेैलीत ते शेवटी प्रेक्षकांना सुखद धक्का देतात.
धन्यवाद वरील पोस्ट आवडली तर शेअर करा 🙏

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*