टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) चे मालक एलोन मस्क (Elon Musk), अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा (Jack Ma), मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स (Bill Gates) तसेच आपल्या आरबीआय चे गव्हर्नर रघुराम राजन यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींनी क्रिप्टोकरन्सीला भविष्यातील चलन म्हणून संबोधले
याचाच अर्थ की भविष्यामध्ये कदाचित जगभरातील नोटा आणि नाण्यांचे बाजारातील स्थान संपून त्याजागी नवीन उदयास आलेल्या क्रिप्टोकरन्सीला मान्यता प्राप्त होईल.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? Cryptocurrency Meaning In Marathi
आज ज्याला पहावं तो या क्रिप्टोकरन्सीच्या पाठीमागे धावत आहे. अगदी कमी काळात या क्रिप्टोकरन्सीने आर्थिक बाजारात आपली जागा बनवली आहे.क्रिप्टोकरन्सीला आभासी ( Virtual Money ) किंवा डिजिटल ( Digital Money ) देखील म्हटले जाते. कारण ही क्रिप्टोकरन्सी फक्त online उपलब्ध आहे. म्हणजेच या क्रिप्टोकरन्सीचा आपण दुसऱ्या चालना प्रमाणे म्हणजेच भारताच्या रुपयाप्रमाणे, अमेरिकेच्या डॉलरप्रमाणे तसेच युरोपच्या युरो सारखे व्यवहारासाठी शारीरिकदृष्ट्या वापर नाही करू शकत.
क्रिप्टोकरन्सी ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे जिचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून नेहमीच्या साधारण चलनाऐवजी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.
सोप्या शब्दात मांडायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता आहे. ज्याच्यावर rbi किंवा कोणत्याही इतर आर्थिक संस्थांचे कोणतेच नियंत्रण नसते.