अल्लूच्या पुष्पा- द राइज चित्रपटानं स्पायडरमँन नो वे होम, सूर्यवंशी, मास्टर आणि वकील साब चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. गेल्या शुक्रवारी अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट देशभरात तीन भाषांमध्ये 1400 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर केवळ तीन दिवसात 173 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे.
Pushpa Box Office : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरदेखील धमाका केला आहे.
Pushpa Box Office : बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. दाक्षिणात्य चित्रपटातील अॅक्शन सिन्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरदेखील धमाका केला आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे.लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पा राजची ही कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली असून हा चित्रपट शेवट पर्यंत प्रेक्श्कना खीळवून ठेवतो.रश्मिका मन्दना च्या नैसर्गिक अभिनय लोकांना आवडत आहे. प्रेक्षकांना याच्या दुसऱ्या भागाची उत्कंठा आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक रेड सँडलवुड स्मगलर्सच्या जीवनावर आधारित आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.