फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करो फ्युचर सेफ करो.

Vikas Jamdade
0
फ्यूचर आणि ऑप्शन बद्दल ज्ञान देणे कठीण आहे एका छोट्या उत्तरामध्ये. पण तरीही सांगण्याचा प्रयत्न करतो.फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग हा स्टॉक मार्केटमध्ये झटपट पैसे कमवण्यासाठी किंवा गमावण्यासाठी यासाठी खूप सोपा मार्ग आहे. हे एक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, ज्यात आपल्याला एखादा ठराविक शेयर महिनाभरासाठी घेऊन ठेवता येऊ शकतो. इथे फक्त एकच बदल असतो की जसे तुम्ही १ किंवा २ शेयर घेता, तसं इथे अजिबात करता येत नाही. इथे तुम्हाला नेमून दिलेली ठराविक प्रमाणात घ्यावे लागतात.यांना डेरीव्हेटीव असेही म्हणतात कारण यांना स्वतःची अशी काही किंमत नसते, त्यांची किंमत त्यांच्या स्टॉक च्या किंमतीनुसार ठरलेली असते. जर स्टॉक वाढला तर फ्युचर ऑप्शन पण वाढणार, कमी झाला तर ते सुद्धा कमी होणार.त्यांची किंमत त्या फ्युचर ऑप्शन संबधित स्टॉक सोबत जोडली गेलेली असते, याला इंग्रजीत डीराईव्हड व्हॅल्यू असेही म्हणतात. डीराईव्हड म्हणजे मिळवणे असा इथे अर्थ होतो, फ्युचर किंवा ऑप्शन ची किंमत मिळते आपल्याला त्याच्या संबंधित स्टॉकपासून. 

🛑फ्यूचर म्हणजे काय? 

फ्यूचर मध्ये पण धोका असतो आणि ऑप्शन मध्ये पण धोका असतो, आपल्याकडे असलेले सर्व पैसे शून्य होण्यासाठी. फ्यूचर हे खरंतर मोठ्या लोकांसाठी जास्त उपयुक्त ज्यांनी एखाद्या स्टॉक मध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केलेली असेल. ते याचा वापर स्वतःची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी करतात. फ्यूचर मध्ये जो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही खरेदी किंवा विक्री केलेला आहे, तो तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टची वैधता ज्यादिवशी संपते त्यादिवशी विक्री किंवा खरेदी करणे अनिवार्य आहे, पण जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या शेवटच्या दिवसाच्या आधी तुमची मार्केट मधील स्क्वेर ऑफ म्हणजेच, तुम्ही तुमची पोजिशन काढली असेल तर तुम्हाला शेवटच्या दिवशी अनिवार्य असते ते करावे लागणार नाही.फ्यूचर मध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की स्टॉक मध्ये जसे तुम्ही आज तुमच्याकडे नसलेला एखादा स्टॉक विकला असेल तर आजच तुम्हाला परत खरेदी करावा लागतो, पण फ्यूचर मध्ये तुम्ही तुमची विक्री पोजिशन कमीत कमी महिन्याच्या शेवटच्या गुरुवार पर्यंत ठेवू शकता.

🛑ऑप्शन opction म्हणजे काय?

Opction‌ trading म्हणजे snsex जर वर जात असेल तर put करतातं ऑप्शन एक प्रकारचे फ्यूचर सारखे महिन्याभरासाठी किंवा आठवड्याभरासाठी विकत घेता किंवा विकता येणारे कॉन्ट्रॅक्ट असतात. स्टॉक मध्ये तुम्हाला महिन्याभराचे कॉन्ट्रॅक्ट असतात, तर ऑप्शन मध्ये तुम्ही एक महिना किंवा आठवड्याचे कॉन्ट्रॅक्ट विकत घेऊ शकता किंवा विकू शकता.

🕐 मध्ये दोन प्रकार येतात, कॉल ऑप्शन आणि पूट ऑप्शन.

 
⬆️कॉल ऑप्शन - कॉल ऑप्शन जर तुम्ही खरेदी केले आणि स्टॉक जर वर गेला तर तुम्हाला प्रॉफिट होते आणि जर स्टॉक जास्त वाढला नाही किंवा पडला, आणि महिन्याअखेरीस जर तुम्ही तो काढला नसेल तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते.कॉल ऑप्शन जर तुम्ही विकला आणि जर स्टॉक खाली गेला किंवा विशेष नाही वाढला तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते. पण जर तो उलट फिरला आणि तो चांगलाच वर गेला तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते, त्यामुळे ऑप्शन विकणाऱ्यांनी शक्यतो स्टॉप लॉस लावून ठेवावा, जेणेकरून जर उलट फिरलच एखाद्या बातमीमुळे तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
⬇️पूट ऑप्शन - पूट ऑप्शन जर तुम्ही खरेदी केले आणि स्टॉक जर पडला तर तुम्हाला प्रॉफिट होते आणि जर स्टॉक जास्त पडला नाही किंवा वाढला, आणि महिन्याअखेरीस जर तुम्ही तो काढला नसेल तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता असते.पूट ऑप्शन जर तुम्ही विकला आणि जर स्टॉक वर गेला किंवा विशेष नाही पडला तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते. पण जर तो उलट फिरला आणि तो चांगलाच खाली गेला तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते, त्यामुळे पूट ऑप्शन विकणाऱ्यांनी सुद्धा शक्यतो स्टॉप लॉस लावून ठेवावा.यामध्ये एक प्रकार असा आहे की "इन दी मनी ऑप्शन" आणि "आउट ऑफ दी मनी ऑप्शन".

🛑 दी मनी ऑप्शन - 

हे ऑप्शन खरेदी करणाऱ्यांसाठी काही प्रमाणात सुरक्षित असतात, पण पूर्णपणे सुरक्षित असतात असं म्हणता येणार नाही, कारण जर तुमच्या विचाराच्या विरुद्ध दिशेने स्टॉक गेला तर हाच ऑप्शन महिन्याच्या अखेरीस आउट ऑफ दी मनी ऑप्शन होऊ शकतो. दोन्ही बाजूला पिवळ्या रंगात जे ऑप्शन येतात त्यांना इन दी मनी ऑप्शन असे म्हणतात. इन दी मनी ऑप्शन हे महिन्या अखेरीस काही अंशी त्याची किंमत टिकवून ठेवतात समजा औरो फर्मा आता 668 रुपयांना ट्रेड होत आहे. त्यात 640 चा कॉल ऑप्शन हा सध्या 42 रुपयांना ट्रेड होत आहे, पण समजा महिन्याअखेरीस ऑरो फार्मा हा 668 रुपयेच राहिला तर हा स्टॉक ऑप्शन तुम्हाला 668-640=28/- म्हणजेच 28 रुपये झालेला दिसेल.आउट ऑफ दी मनी ऑप्शन - ऑप्शन विक्रेते शक्यतो जास्तीत जास्त ह्या प्रकारचे ऑप्शन विकणे पसंद करतात कारण स्टॉक एखाद्या ठराविक लेवल पर्यंत जाण्याची शक्यता कमी असते. मोठे मोठे लोक, आउट ऑफ दी मनी ऑप्शन हेजिंग करण्यासाठी वापरतात, आउट ऑफ दी मनी ऑप्शन विकण्यामध्ये सुद्धा तितकीच जोखीम असते जितकी इन दी मनी ऑप्शन विकण्यामध्ये असते, पण हे ऑप्शन, आउट ऑफ दी मनी ऑप्शन पेक्षा कमी वेगाने वाढणारे असतात, त्यामुळे जरा थोडे जास्त आउट ऑफ दी मनी ऑप्शन विकले तर नफा होण्याची शक्यता जास्त असते, जर तो स्टॉक तुम्हाला जसं वाटतंय की फिरणार तसा फिरला तर. दोन्ही बाजूला सफेद रंगात जे ऑप्शन येतात त्यांना आउट ऑफ दी मनी ऑप्शन असे म्हणतात. आउट ऑफ दी मनी ऑप्शन महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी शून्य होतात.तसं पाहायला गेलं तर कोणत्याही साईडचे खरेदी करणारे किंवा विक्रेते सेफ नसतात, कधी कधी असं एकतर्फी मार्केट फिरतं की एका बाजूला खरेदी करणारे जिंकतात तर त्याच ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध खरेदी केलेले हरतात, तसेच मार्केट ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने विकणारे लॉस मध्ये जातात तर त्याच्या विरुद्ध दिशेने विकणारे कमी प्रॉफिट कमवतात, पण पैसे कमवतात हे नक्की. आणि अश्यावेळेस आउट ऑफ दी मनी ऑप्शन विकणारे जास्त नुकसान मध्ये जातात. टीप - Zerodha ने चांगली वेबसाईट बनवली आहे स्टॉक मार्केट बद्दल माहिती देण्यासाठ 🏹फ्यूचर द्वारे गुंतवणूक कशी सुरक्षित करतात? समजा, तुम्ही १०० रुपयांना टाटा मोटर्स घेतले असतील, पण १०० रुपयानंतर तो परत कधी अजून तरी १०० रुपयांना या महिन्यात जाईल असे तुम्हाला वाटत नाही, अश्यावेळी तुम्ही याचा एक फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट विकाल. आता फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला ९८ रुपयांत मिळत आहे, म्हणजे २ रुपये अजून तरी लॉस मध्ये आहात, पण समजा महिन्या अखेरीस टाटा मोटर्स ८० रुपये झालं, तर हा फ्यूचर सुद्धा जवळपास तितक्याच किंमतीत तुम्हाला मिळेल. आणि शेअर्स खरेदी करून झालेले नुकसान टाळता येऊ शकते. आणि समजा जर इथून तो पुन्हा वर गेलाच, तर तुम्ही तुमचं विकलेला फ्यूचर परत खरेदी करू शकता आणि स्टॉप लॉस घेऊन थोड्या लॉस मध्ये एक्जिट मारू शकता, याला हेजिंग(Hedging) असे म्हणतात.
📌शेअर मार्केट मधील गुंतवणूक हि जोखीमीच्या अधीन असते.
धन्यवाद।

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*