पावनखिंड एक ऐतिहासिक थरारक लढा
महराष्ट्राचे जनक परम पूज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक रोमांचकरी प्रसंग जो प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर कोरले गेलेल्या अनेक प्रसंग आहेत.ते ऐकून प्रत्येक मराठी माणुस जय शिवाजी जय भवानी सहज उच्चारतो.त्यावर अनेक मालिका व चित्रपट निघाले.सध्या पावन खिंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला आहे.
चित्रपटाचे नाव - पावनखिंड
निर्माता -दिग्पाल लांजेकर
चित्रपट कलाकार -मृणाल कुलकर्णी,चिन्मय मांडलेकर,समीर धर्माधिकारी,माधवी निमकर,अक्षय वाघमारे,अजय पूरकर,आस्ताद काळे,अंकित मोहन,प्राजक्ता माळी ई.
‘पावनखिंड’ची कथा आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. बाजीप्रभू, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पडद्यावर साकारणाऱ्या या चित्रपटाची सुरूवात होते ती महाराजांच्या एका दृश्यापासून. राज्याभिषेकापूर्वी महाराज आपल्या काही मावळ्यांसह शंभूराजांना कासारी नदीकाठी घेऊन येतात आणि या पवित्र नदीला वंदन करतात. कारण याच नदीच्या पाण्यात बांदल सेनेनं रक्त सांडलं होतंं. महाराज शंभूराजांना सांगू लागतात आणि महाराजांच्या स्मृतीतून चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांसमोर उभं राहतं. पाठोपाठ बाजीप्रभू देशपांडे, त्यांच्यासोबत प्राणप्रणाने लढणारे रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या शिलेदारांची ओळखही आपल्याला होते.पावनखिंड हा चित्रपट निर्माते दिग्पाल लांजेकर यांनी या पूर्वी फर्जद आणि फत्तेशिकस्त हे लोकप्रिय चित्रपट निर्माण केले आहेत.या चित्रपटात शिवाजी महाराजांचा पराक्रम, मर्द मावळे,राजांची रणनीती,व या रणसंग्रामाची प्रचिती देणारा चित्रपट म्हणजे पावन खिंड बांदल सेनेने दिलेला थरारक लढा म्हणजे इतिहासातील सुवर्णपान हे क्षण हा चित्रपटात जिवंत होतात.पावन खिंड नाव घेतले कि बाजीप्रभू देशपांडे याचे नाव समोर येते त्यांचा पराक्रम आठवतो.त्या काळ रात्री महाराजांना गनिमाच्या वेढा तोडून बाहेर काढणे.व महाराज गडावर पोहोचण्या पर्यंत गनीम (शत्रूला) खिंडीत अडवून ठेवणे.बाजीप्रभू देशपांडे,फुलाजी देशपांडे व 300 बांदल सैनिक यांनी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यन्त घोड खिंड अडवून धरली.महाराज गडावर पोहचल्या वर तोफेच्या आवाज ऐकल्यावर बाजीप्रभू प्राण सोडतात.या कथेवर हा चित्रपट इतिहास उभा करतो.शिवकालीन गढ,किल्ले,मावळे,भर पावसात होणारे युद्ध प्रसंग,थरारक अनुभव देतात.मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊ मा साहेबांची भूमिका साकारली आहे.अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराज ताकतीने उभे केले आहेत.अभिनेता अजय पूरचूर यांनी बाजीप्रभू देशपांडे याची भूमिका दमदारपने उभी केली आहे.पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडलेला असताना हा वेढा फोडण्यासाठी बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना, ही योजना यशस्वी व्हावी आणि शत्रू बेसावध होऊन महाराजांना पन्हाळ्यावरुन निसटता यावे म्हणून हसतहसत मृत्यूच्या दारी जाणारे शिवा काशीद, महाराजांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणारे रायाजी बांदल आणि बांदल सेना, तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत पावनखिंडीत आपले प्राण रोखून धरत शत्रूशी लढणारे बाजीप्रभू देशपांडे या सर्वांच्या पराक्रमांचे जिवंत स्वरूप म्हणजेच पावनखिंड हा चित्रपट.