धर्मवीर मु पो ठाणे मूवी माहिती

Vikas Jamdade
0
नमस्कार काय आपण धर्मवीर हा मराठी चित्रपट पहिला! जर बघितला नसेल तर जरूर बघा.कारण माननिय कै. आनंद दिघे साहेब यांच्या अलौकिक जीवन प्रवासाबद्दल हा चित्रपट बेतला आहे.आनंद दिघे हे नाव तमाम शिवसैनिक आदराने घेतात.परंतु त्याची माहिती सर्वार्थाने तमाम महाराष्ट्रा ला देण्याचे कामं हा चित्रपट करेल.अभिनेता प्रसाद ओक यांनी जीव ओतून मा.दिघे साहेबांची भूमिका जिवंत केली आहे.चित्रपट बयोपिक प्रकारात मोडतो.आज पर्यंत अनेक बयोपिक आपण पहिले असतील पण हा चित्रपट उजवा ठरला आहे.हा चित्रपट गिते साहेबांची कारकीर्द दाखवतो.ठाणे शहराने गिते सहेबाचा झंझावात पहिला आहे.तळागाळातील लोकांचा,आदिवासी,गरीब लोकांचा कैवार गिते साहेबांनी घेतला होता.माता भगिनी महिलाचा आदर करणे.त्याची रक्षा करणे.अन्याय करणाऱ्यावर जबर बसवन्याचे कामं गिते साहेबांनी केले.हा सिनेमा कथानकावर आधारित नसून गिते साहेबांच्या आयुष्यांतील ठळक घडामोडी वर आधारित आहे.गिते साहेब म्हणजे संघटना वाढी करता दिवस रात्र एक करून आपले जीवन समाज सेवा करण्यात वाहून घेतलेले असामान्य व्यतिमत्व.दिघेसाहेबांच्या पुण्यतिथीचं कव्हरेज करायला आलेल्या एका न्यूज चॅनेलच्या महिला रिपोर्टरचं ठाण्यात पाऊल पडतं आणि इथूनच सिनेमाची सुरुवात होते. या कार्यक्रमाबद्दलची तिची उदासीनता तिला दिवसभर भेटणा-या प्रत्येक व्यक्तिरेखांमधून उत्सुकतेमध्ये कशी बदलते हे सिनेमात पाहायला मिळतं. वर्तमानकाळातून भूतकाळात दिग्दर्शक अलगद प्रेक्षकांची ने-आण करतो, हे विशेष. एन्ट्रीपासून ते शेवटापर्यंत प्रसाद ओक आपल्या धारदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चालणं-बोलणं, हात कमरेवर ठेवणं, दाढीवरुन हात फिरवणं आणि राग अनावर झाला की ओठांची एक विशेष हालचाल करणं  हा  दिघेसाहेंबाचा लहेजा त्याने अचूक पकडलाय. आपल्या कार्यकर्त्यांबद्दलची आत्मियता,त्यांची जपणूक  शिवसेना पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठीचं खंबीर नेतृत्व आणि माणुसकी हे दिघेसाहेबांचें सगळे गुण त्याने आत्मसात केले आहेत . त्याचा  पडद्यावरचा वावर आपल्याला अवाक करुन टाकतो. सिनेमाभर सतत प्रसाद नाही तर खरेखुरे दिघे साहेबच आहेत, असा भास झाल्यावाचून राहत नाही. यात रंगभूषाकार विध्याधर भट्टे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रसादच्या कारकिर्दीतला हा बायोपिक माईलस्टोन ठरलाय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.दिग्दर्शक  प्रवीण तरडे यांनी दिघेसाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांचे बारकावे पडद्यावर सिनेरुपात मांडले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सहवासातील अनेक व्यक्तिरेखांचं अगदी बारकाईने चित्रण केलं आहे. त्यांनी केलेला आनंद दिघे या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, जीवनाचा घेतलेला वेध, त्यांच्या जुन्या-जाणत्या सहका-यांशी बोलून त्यांना जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न या सर्वांतून त्यांना दिघे साहेब गवसले आहेत, हे पडद्यावर पाहताना लक्षात येतं. एकापेक्षा एक दमदार संवादांनी सिनेमा जिवंत होतो. गद्दारांना क्षमा नाही.., जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं असे अनेक संवाद हे प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय ठरले आआहेत.सिनेमातले अनेक प्रसंग आपल्या आ वासून टाकतात. ठाण्याच्या शिवसेना महिला आघाडीप्रमुख बिरजे बाईंच्या घरावर मुसलमानांनी केलेला हल्ला आणि या हल्ल्याचा बिरजे बाईंनी (स्नेहल तरडे)  या शिवसेनेच्या वाघीणीने केलेल्या एकटीने सामना..तिच्या मुलानं आनंद काकांना बोलाव ना... अशी केलेली आर्त केविलवाणी  विनवणी व त्याचक्षणी आनंद दिघेंचं तिथे त्यांना वाचवण्यासाठी येण हे प्रसंग मनाला स्पर्शून जातात. कार्यकर्त्यापेक्षा आपला सोबती म्हणून त्याला जपणं हा दिघेंच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाने जगणं विसरलेल्या एकनाथ शिंदेंच्या (क्षितीश दाते) खांद्यावर मी सोबत आहे, असा  विश्वास देऊन त्यांना दिघे साहेबांनी पुन्हा उभं केलं. बलात्का-याची कोर्टाने पुराव्याअभावी मुक्तता केली खरी पण दिघेंच्या न्यायालयात त्याला कठोर शिक्षेला सामोरं जावं लागलं.  कधी कायद्याच्या चौकटीत राहून तर कधी कायद्याच्या चौकटीबाहेर राहून दिघे साहेबांनी मिळवून दिलेला न्याय कुणीच विसरु शकणार नाही. त्यांच्या दरबारात आलेला कुठलाच व्यक्ती निराश होऊन परतणार नाही. हे सगळेच प्रसंग दिग्दर्शकाने उत्कृष्ट मांडले. तसाहेबांसाठी हॉस्पिटलबाहेर आणि कोर्टाबाहेर दिवसरात्र तात्कळत उभा असलेला शिवसैनिक, त्यांचा सच्चा भक्त असा अथांग जनसमुदाय पाहून अचंबित व्हायला होतं.सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने आपली छाप सोडलीय. या सिनेमाची आणखी एक अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे सिनेमाचं पार्श्वसंगीत. दमदार पार्श्वसंगीतासोबत हा जीवनपट पाहणं खुपच रंजक होऊन जातो. सिनेमातील गुरुपोर्णिमा, आनंद हरपला, अष्टमी ही गाणी सिनेमाला चार-चॉंद लावतात. बारकावे टिपण्याच्या नादात सिनेमाची लांबी जास्त वाटत असली तरी तो परिपूर्ण ठरतो. प्रत्येक फ्रेम, ड्रोन्सने घेतलेले सगळे शॉर्ट्स अप्रतिम आहेत.तरी तमाम. मराठी लोकांनी हा चित्रपत जरूर पाहावा व अनुभाववा.
🙏धन्यवाद 🙏
सिनेमा माहिती 
नाव - धर्मवीर मु पो ठाणे
कथा दिग्दर्शक -प्रवीण तरदे
निर्माते -मंगेश देसाई zee स्टुडिओ
कलाकार - प्रसाद ओक,गिरिश्म महाजन, श्रुती मराठे
रिलीज तारीख -13 मे 2022

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*