हयातिचा दाखला
नमस्कार मित्रांनो कसे आहात खूप दिवसांनी भेट झाली आज आपण एक नवीन कथा एक नवीन अनुभव घेणार आहोत हा अनुभव जर आपल्याला थोडा काही कामाला आला तर आनंदच आहे.या कथेतील नायक किंवा व्यक्ती हा आपल्या सारखा एक वैतागलेला माणुस आहे.तो दररोजची कटकट व व्यवहार दुनियादारीला कंटाळलेला कॉमन मॅन आहे.आज ज्याला आपण भले व आपले चाकोरीबद्ध जीवन हेच आपले जीवन आहे हे मानतो व चाकोरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या जबाबदाऱ्या त्याचे पाय ओढून खाली पडतात.तर चला आपण कथेकडे वळू कथा नायकाला त्याच्या 24*7 वर्क लोड मध्ये सुट्टीच्या काळात तो त्याचे छंद सांभाळून जीवनाचा आनंद घेत असतो.त्यात त्याला पुस्तकं वाचन करणे व रिकाम्या वेळात टीव्ही पाहणे हा नाद असतो.जीवन कसे आनंदात चाललेले असते.त्याच्या घरासमोर एक खडूस म्हातारा माणुस राहत असतो ज्याला त्याच्या कर्मामुळे म्हणा किंवा प्रारब्धामुळे तो एकटा राहत असतो मुले सांभाळत नव्हते.त्याची बायको सहा महिन्यापुर्वी देवाघरी गेली होती.तो एकटाच जीवन जगत होता.त्याला लहान मुलांचा आवाज सहन होत नव्हता मुले खेळली की केकाटत असे व मुलांना हुसकावून लावत असे.मुलांच्या आया बाया त्याला शिव्याशाप देत असत.परंतु दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणात त्याला एकाने त्याला पोलीस चौकी दाखवली व पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले त्यामुळे म्हातारा थोडा शांत झाला होता.त्याची किरकिर कमी झाली होती.पण पुन्हा त्याला काही टवाळ लहान मुले खवळत होती.पण तो त्यांना विरोध करत नव्हता किंवा ओरडत नव्हता.गल्लीतील काही लोक लहान मुलांना त्यांना सतावू नको म्हणून रागावत होती.सर्वाना म्हाताऱ्याला विनाकारण पोलीस चौकीत उभे केल्यामुळें वाईट वाटत होते पण सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत होते.पण सुरळीत चालेल ते जीवन कसले.म्हातारा दुपारी त्याचे दैनंदिन कामे करून घरी आल्यावर आराम करत असे. पण दुपारी अचानक कुठून तरी एक मुलगा सायकल वर येऊन लपून त्याच्या दारावर दगड मारत असे .म्हातारा रागाला जाऊन दरवाजा उघडून बाहेर येई पर्यंत तो मुलगा सायकल वर पसार होऊन पळून जात असे.दुपारची वेळ असल्याने त्याच्या गल्लीत तूरळक माणसे असल्याने म्हातार्याची दररोज होणारी तळमळ कोणाला माहित होत नव्हती.त्याच वेळी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने नोकरदार लोकांना सलग सुट्ट्या असल्याने सर्वजण दिवाळी सण एन्जॉय करत होती.लहान मुले आनंदात होती.तसाच तो दुपारी सुट्टीचा दिवस असल्याने घरात टीव्ही पाहून वैताग आल्यामुळे बाहेर बसला होता नेमका तो लहान मुलगा सायकलवरुन येऊन म्हाताऱ्याच्या दारावर दगड भिरकावला व लपून बसला म्हातारा बाहेरयेऊन कोण दगड मारला हे पाहू लागला मुलगा हळूच पळून गेला.हे सर्व तो पाहत होता.त्याला त्या खोडसाळ मुलाचा राग आला होता.त्यांने दुसऱ्या दिवशी त्या मुलाला पकडून त्याला अद्दल शिकवायची ठरवले.त्या प्रमाणे तो दुसऱ्या दिवशी मुलाची वाट पाहत होता.परंतु खूप वेळ झाला तरी तो येत नव्हता कारण गल्लीत लहान मुले खेळत होती.मुले जशी घरी गेली तसा तो पटकन आला व म्हातार्याच्या दारावर दगड मारला.तसा तो त्याला पकडन्या करता धावला मुलाने त्याला पहिले व घाबरून सायकल सोडून तो गल्लीतून जोरात पळाला.त्याने त्याचा पाठलाग केला तो बरोबर अर्धा किलोमीटर पळाला व एका टॉवर मध्ये घुसला तरी त्याने त्याचा पाठलाग सोडला नाही तसा तो एका घरात घुसला व पडद्याआड लपून बसला.त्याने घरात कोणी आहे का असा आवाज दिला तसा एक माणुस बाहेर आला व काय झाले असे विचारले तसें त्याने त्या लहान मुलाचे कारनामे त्या माणसाला सांगितले तसें तो माणुस संतापला व लहान मुलाला पडद्यामागुन रागातच बाहेर ओढले व एक सनसनित रट्टा पाठीवर हाणला.व रागाऊ लागला.आवाजाने त्या मुलाची आई बाहेर आली व तिला हि हा प्रकार समजला पण ती मुलाला मारू नका म्हणून त्याच्या बाबाला विनवत होती.शेवटी तिने मुलगा असे का वागत आहे याचा उलघडा केला.तो म्हातारा तिचा वडील होता तिने प्रेम विवाह केल्यामुळें तो तिच्यावर नाराज होता व तिच्या बरोबर बोलणे व संपर्क करत नव्हता.परंतु तिच्या नवऱ्याची बदली झाल्यावर तिला तिच्या वडीलांचा पत्ता मिळाला व ते तिच्या घरा जवळ सध्या राहत असल्याचे कळाले व वडील एकटेच एकाकी राहत एकाकी असल्याचे कळाले तिला त्यांना भेटण्याची हिम्मत होत नसल्याने ती मुलाला रोज आजोबांच्या दरवाजाला दगड मारून ते ठीक आहेत याची खात्री करत होती.पण आज तिचा मुलगा सापडल्यामुळे तिची वाडीलाबबतची काळजी सर्वाना कळली होती.त्याला आता वाईट वाटत होते.तो तसाच घरी आला .दुसऱ्या दिवशी परत तो त्या ताई कडे गेला तिचा दरवाजा ठोठावला.तिने दरवाजा उघडला व त्याला पाहून तिने मुलाने परत काय केले असा विचार केला.तो पर्यंत त्यांने तिला ताई घरात येऊ का विचारले ती भानावर आली तेव्हा तिने विचारले आज तुम्ही का आलात तर त्याने सांगितले तुमच्या हयातीचा दाखला आणला आहे असे म्हणून तिच्या वडलांना बोलावले.वडिलांना पाहून तिचा कंठ दाटून आला.डोळे पाणावले मुलगा आजोबाकडे पळाला.तिला त्याचे धन्यवाद व्यक्त करायचे होते पण तो तिथून केव्हाच निघून गेला होता.तिच्या वडिलांनी तिला माफ केले होते.व नातंवाला भेटन्याकरता म्हातारा पळत लेकीकडे आला होता.
धन्यवाद 🙏