चिंता मिटविणारे झाड
कविता नावची एक महिला होती.जसा आज प्रत्येक जण तणावात आहे.तिच्याही आयुष्यात तणाव होता.कविता ही कमावती वर्किंग वूमन होती ती व तिचा नवरा दररोज कामावर जात.दिवसभर नवरा टार्गेट पूर्ण करण्यासाठी आकडे माणसाबरोबर झगडत असे.व ऑफीसात सहकार्याबरोबर टार्गेट पूर्ण करण्याची शर्यत करत असे.जर टार्गेट पूर्ण झाले नाही तर बॉसची तिखट आलोचना टोमणे सहन करत असे.तिकडे कविताही प्रायव्हेट जॉब करत अडचणींचा सामना सहन करीत होती. अश्याच दैनंदिन रुटीन पूर्ण करून सविता घरी येऊन सायंकाळी स्वयंपाक करण्याची तयारी करत होती.त्यात तिचा नवरा घरी आल्यावर दोघेही आपल्या मुलांना नालायक ठरवत रागावत होते.कविता मुले व नवरा यांच्या दररोजच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थ करून देन्याच्या मागण्या पूर्ण करता करता व घर आवरताना वैतागून गेली होती.ती त्यामुळे फटकळ व चीडचीडी झाली होती.घरातील व ऑफिस कामं यामुळे ती अतिश निराश व तणावात राहत होती.तिकडे नवरा रागीट होत चालला होता व. मुले विद्रोही होत होती घरात कायम नकारात्मक वातावरण होते.यात एक दिवस कवितच्या घरातील नळ खराब झाला व ती नवऱ्याजवळ नळ कनेक्शन दुरुस्त करण्याचा तगादा लावत होती त्याला कामाच्या व्यापामुळे त्याला प्लमंबर शोधून नळ ठीक करणे जमत नव्हते.तो तीला प्लम्बर शोधण्यास सांगत होता कविताने तिच्या भावाच्या ओळखीच्या घराजवळच्या एका प्लंबरला बोलावले नंबर ठरल्या दिवशी जवळ जवळ एक तासाने ऊशीरा आला . कविता ला कामाला उशीर झाल्यामुळे ती प्लंबर वर जवळजवळ रागातच होती. तिने प्लंबरला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा प्लंबर ने सांगितलं सायकल पंचर झाल्यामुळे येण्यास उशिरा झाला तसेच येण्याच्या घाईत सायकल वरून खाली पडलो व माझा खाण्याचा डबा व नळदुरुस्ती सामानाची पिशवी सर्व खाली पडले. त्यातील ड्रिल मशीन फुटली व माझे पैशाचे पाकीट हरवले. अशाप्रकारे प्लंबरवर अडचणींचा डोंगर कोसळला होता तरी तो हसतमुख होता व त्याने थोड्याच वेळात त्याचे काम पूर्ण केले व नळ दुरुस्त करून दिला. थोड्यावेळाने कविता चा नवरा घरी आला त्याने प्लंबर चे पेमेंट दिले कविताने तिच्या नवऱ्याला प्लंबर बरोबर आज त्याच्यावर झालेल्या अडचणी सांगितल्या व नंबरला त्यांच्या गाडीवर घरी सोडण्याकरता सांगितले कविताचा नवरा प्लंबर ला सोडण्याकरता त्याच्या घरी गेला रस्त्यात त्याचे प्लंबर बरोबर संभाषण झाले प्लंबर चे घर जवळ आले नंबरने त्यांना चहा पिण्याकरता घरी येण्याची विनंती केली. त्यांनी मान्य केले व तो त्याच्या घरी चहा पिण्याकरता गेला त्याच्या दारात मोठे आंब्याचे झाड होते प्लंबर ने प्रथम त्याची पिशवी आंब्याच्या झाडाला टांगली व तो त्याच्या घरात गेला घरी गेल्यावर तो त्याच्या दोन मुलांनी जवळ येऊन त्याला मिठी मारली त्याने त्याच्या डोक्यावर हात फिरवला व त्याच्या पत्नीकडे स्मित हास्य करून पहिले व त्याने तिला चहा ठेवण्याकरता सांगितले नंबरच्या आई-वडिलांन कविताच्या नवऱ्याची चौकशी केली. हे सर्व पाहून कविता चा नवरा हैराण झाला होता व त्यांच्या घरातील प्रसन्न वातावरण पाहून थक्क झाला होता चहा पिऊन झाल्यावर तो जाण्याकरता निघाला प्लंबर त्याला सोडण्याकरता घराच्या बाहेर आला .त्याने त्याला एवढ्या अडचणी असून आनंदी असण्याच रहस्य विचारले तेव्हा त्याने सांगितले माझ्याकडे अडचणी व चिंता दूर करण्याचे झाड आहे त्याला नवल वाटले त्याने अधिक चौकशी केली नंबर म्हणाला प्रत्येकाच्या जीवनात अडचणी अपयश येत असते माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी चिंता दररोज रात्रभर या झाडावर माझ्या पिशवी बरोबर अडकवतो घरी गेल्यावर पूर्ण चिंता मुक्त होऊन घरात जातो. घरात पाय ठेवल्यावर एकही चिंता माझ्याबरोबर घरात येत नाही .समाधानाने घरात जातो सकाळी जेव्हा कामावर जातो तेव्हा पिशवी घेतली असता मला चिंता अडचणींचे ओझं फारच हलकं झाल्यासारखे वाटतं नव्या जोमाने कामास लागतो. मला जीवनात कितीही अडचणी येऊ द्या अडचणी पासून आई वडील मुले व पत्नी यांना दूर ठेवूनच घरात समाधान राहावी ही माझी इच्छा असते देवाजवळ प्रार्थना करतो की माझ्या अडचणी कमी करून माझ्या पत्नी मुलांना सुखी ठेव. अशा रीतीने अडचण मुक्त होण्याकरता असा जबरदस्त उपाय त्याने निर्माण केला होता .कविता चा नवरा भारावलेल्या अवस्थेत घरी आला. कविताला घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यांनी त्यांच्या घराबाहेर असलेला वृक्षावर आता दररोजचा ताण व चिंता अडकवून घरात चिंता मुक्त होऊन प्रवेश करण्याचा निश्चय केला याप्रकारे आपणही आपल्या करता एका चिंतामुक्त होण्याचे झाड शोधण्याची गरज आहे. धन्यवाद कथा आवडली तर शेअर व लाईक करा.
हा लेख तुम्हाला आवडेल 👉हायातीचा दाखला